बाबा
बाबा रिटायर झाले तरी त्यांची सकाळी ६ वाजता उठायची सवय काही बदलली नाही. त्यामुळे नंतर मग सकाळी बाबा आधी उठून चहा करणार हा अलिखित नियमच झाला होता. बाबा आधी एकटेच चहा घ्यायचे. चहा घेता घेता कुत्र्याला बाहेर फिरायला सोडायचे. रामदेव बाबा बघायचे. मग ७ वाजता सगळ्यांना उठवून परत चहाचा दुसरा राउंड. अशी त्यांची सकाळ व्हायची.
शाळेची १० वर्ष चिपळूण शहरात घालवल्यानंतर आम्ही परत आमच्या मूळ गावी घर बांधलं आणि तिकडे राहायला गेलो. मूळ गाव चिपळूण पासून २५ किमी अंतरावर आहे. त्यामुळे पुढे कॉलेजचे शिक्षण घेण्यासाठी तिथून चिपळूण पर्यंत ये-जा करावी लागायची. अर्थातच एस.टी. ने.
मिसळपाव
( दुत्त दुत्त!