लालीची गोष्ट भाग १
भाग १
रोज कचऱ्याच्या पेटीच्या मागच्या रिकाम्या जागेत झोपताना लालीच्या मनात एकच विचार यायचा..... अजून किती दिवस? माईला विचारून विचारून लाली थकली होती. माईच एकाच उत्तर होत; "एक दिवस नक्की लाली बेटा; एक दिवस नक्की! मी पण वाट बघते आहे.!"
जेव्हापासून लालीला आठवत होत तेव्हापासून तिची माई तिला संध्याकाळी ५-६ च्या सुमाराला त्या कचरा पेटीच्या मागे आणून बसवात असे आणि सकाळी ८ नंतर येऊन घेऊन जात आसे. लालीबरोबर सुखी आणि रंगा पण असत. सुखी तशी मोठी होती. साधारण पाच एक वर्षांनी मोठी असेल लालीपेक्षा. काळी सावली सुखी लालीवर मनापासून प्रेम करायची.
मिसळपाव