Skip to main content

( बाराची बिअर )

लेखक पगला गजोधर यांनी गुरुवार, 15/10/2015 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
आमुची प्रेर्ना ऑक्टोबरमासी जो कोणी होरपळतो एव्हरी इअर ..... बैठकीत दोस्तांबरोबर होऊन-देतो तो एक बिअर बाराची बिअर थंडगार असते, बाटलीच्या बुचाला उचाकावलं कि आपला हात मस्तसा भिजवते, चखणा हवा काय म्हणून मिश्कीलपणे विचारते ! बाराची बिअर सोनेरी सुंदरी असते गळ्याखाली उतरताना, पोळलेल्या शरीराचा, रोम न् रोम थंडावते जिभेवर माल्टचा स्वाद पसरवते, लिंबाची फोड हवी होती का? म्हणून खोडीलपणे विचारते! बाराची बिअर कॅालेजची आठवण असते ! मनाचा एकदम रिट्रोस्कोप करते पण हातातला ग्लास हातातच ठेवते ............