Skip to main content

निरोप दे आता

लेखक बहुगुणी यांनी सोमवार, 28/09/2015 16:49 या दिवशी प्रकाशित केले.
या आधी मी मला आवडलेल्या काही इंग्लिश कवितांच्या/ गीतांच्या मराठी रुपांतराचे प्रयत्न केले होते.

पूर्वेच्या समुद्रात ६

लेखक सुबोध खरे यांनी सोमवार, 28/09/2015 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
महाबली पूरम ला जातानाचा पूर्व किनारा रस्ता (EAST COAST ROAD) यावर तेथल्या राजकारणी आणी चित्रपट अभिनेते यांचे प्रासादतुल्य बंगले त्याच्या बाजूच्या मोठ्या मोठ्या बागा त्यातील हिरवळी हे पाहून आपण भारतात आहो

श्रीगणेश लेखमाला : एक सिंहावलोकनात्मक चिंतन

लेखक सुधांशुनूलकर यांनी सोमवार, 28/09/2015 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
सार्वजनिक श्रीगणेशोत्सव म्हणजे गेल्या शतकभरापासून चालत आलेली महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपराच. या उत्सवाच्या तीन-चार महिने आधीपासूनच सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते उत्सवाच्या तयारीला सुरुवात करतात. मिपाच्या संपादक आणि साहित्य संपादक मंडळाचंही तसंच काहीसं झालं. १२ जून २०१५ ला आदूबाळनी मंडळापुढे श्रीगणेशोत्सवानिमित्त एका करियर विषयक लेखमालेचा प्रस्ताव मांडला. तिचं आयोजन, लेखक, याविषयी बरीच चर्चा झाली. सं.मं.च्या आणि सा.सं.मं.च्या सर्वच सदस्यांनी चर्चेत भाग घेऊन आपली मतं मांडली, मोलाच्या सूचना केल्या आणि ही लेखमाला करायची असं ठरलं.

रांगडी रात्र

लेखक जव्हेरगंज यांनी सोमवार, 28/09/2015 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रीचे नऊ वाजत आलेत. बेडवर ती 'इनसाईड मॅडेलाइन' वाचत पडलीय. छकुलीचा पण होमवर्क झालाय, तसाही उद्या संडे होता. तिच्या रुममध्ये एव्हाना ती झोपलीही असेल. किचन ही आवरले होते. काही वेळापुर्वीच तिचे मिस्टर दुर कुठेतरी दोन दिवसांच्या अॉफिसटुरला गेले होते. तिने अगदी फोन करुन ट्रॅव्हल भेटल्याची खात्री करुन घेतली. दिवस तसा धावपळीतच गेला होता. एक अनामिक हुरहुर तिला लागुन राहीलेली. घड्याळाकडे वारंवार नजर चालली. तसही करण्यासारखं काही काम नव्हतं. रोजचा छंद म्हणुन बेडटाईम स्टोरीज वाचत पडली होती. तेवढ्यात बेल वाजली. दार उघडुन तिने त्याला लगबगीने आत घेतलं. आज त्यानं चक्क बियरचं आणलीये.

श्रीगणेश लेखमाला, सगळे लेख एकत्र.....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 28/09/2015 07:10 या दिवशी प्रकाशित केले.
काही गुणी मिपाकरांचे लेख ह्या "गणेशोत्सवात" वाचायला मिळाले, त्यामुळे प्रथमतः संपादक मंडळाचे आभार. काही लेख मित्रांना आणि मुलांना वाचायला द्यायचे होते.आज ते सगळे लेख एकत्र केले आणि परत एकदा वाचून काढले. वाचता-वाचता, काही गोष्टी नव्याने उलगडत गेल्या. हे लेख एकत्र केले तर उत्तम असे वाटल्याने, सगळे लेख एकत्र करत आहे. तसे हे सगळे लेख माझ्या कडे साठवून ठेवले आहेत. पण ज्ञान सगळ्यांना वाटावे, असे वाटल्याने, हा वेगळा धागा काढत आहे. उगाच १० वाचनखूणा साठवण्यापेक्षा, हा एकच लेख साठवला की झाले.

रूपगर्विता

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 27/09/2015 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
जवळपास चार वाजता एस. टी. भेटली. मधल्या शिटावर बसुन माझा प्रवास सुरू झाला. खिडकीतुन बाहेर बघत बसलो. कंटाळा आला. हेडफोन कानात घालुन मस्त ताणुन दिली. "फुल मांगुना बहार मांगु......" वाह! काय मस्त गाणं आहे अगदी तिनचं गायल्यासारखं. गाडीने वेग घेतला. हायवेवरचा वेग. तुफान. तासाभरानं एक गाव आलं. तिथ उतरायचचं होतं. कसलं हे गाव 'थिरडी'. अजुन इथनं आठ-दहा किलोमीटर लांब होतं म्हणे. एकतर संध्याकाळची वेळ. तिथं काही खायला भेटणं अवघडचं. एका गाड्यावर भुर्जी-पाव हाणली, डब्बल. एक पार्सल पण घेतली. मग टमटमनं निघालो 'थिरडी' कडं. महामार्गापासुन आत जाणारा गावठी रस्ता आता सुरु झाला.

श्श..... सांभाळून बोला! भाग ३ (शेवटचा)

लेखक ज्योति अळवणी यांनी रविवार, 27/09/2015 15:39 या दिवशी प्रकाशित केले.
भाग 3 रामुकाकानी दिलेलं तांब्या भांड घेऊन अवनीच्या हातात देत खाली पडलेल्या मैथिलीला त्याने उचलल. मैथिली बेशुद्ध पडली होती. तिला त्याने पलंगावर ठेवल. पाणी देऊन रामुकाका गेले होते. अवनीने दरवाजा लावून घेतला. सगळेच मैठीलीच्या भोवती जमले. अभिने मैथिलीच्या चेहऱ्यावर पाणि शिपडल. मैथिली पाण्याच्या स्पर्शने जागी झाली. क्षणभर तिला लक्षात नाही आल ती कुठे आहे; पण पूर्ण जागी झाली आणि तिचा चेहेरा भितीने गोठुन गेला. ती दचकुन पलंगावरून उठली. "चला आधीच्या आधी आपण या वाड्यातून बाहेर पडूया या." सामान उचलत ती म्हणाली. "मैथिलि काय झाल? तू अशी एकदम का ओरडलिस? का निघायच आपण? अग आता साधारण 3 वाजले आहेत.

बाप्पाचा निरोप घेताना....

लेखक सुमित_सौन्देकर यांनी रविवार, 27/09/2015 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
निरोप घेऊन जाता जाता क्षणभर बाप्पा मागे फिरला खांद्यावरती हात ठेऊन मनामधल सार बोलला गड्या मला घरी सोडून मंडळामध्ये शोधतोस नावावरल्या व्यापाराला तुही चालना देतोस वाटल होत जोडीन गप्पा मारत दिवस काढू नैवेद्याच्या जोडीने तुझ माझ ताट वाढू सोडून वेड्या घरात मला चौकामध्ये फिरतोस मनामधल मागण्यासाठी बाहेर नवस बोलतोस? नको मला हार-तुरे नकोत असल्या सजावटी भक्त मिळावा साख्यासारखा नकोत चेहरे बनावटी विचार तुमच्या सुखाचाच रे लाच कशाला घेऊ मी नारळ, पैसे घेऊन तुमचे कुठे नेउनि ठेऊ मी चल माझी वेळ झाली जाता जाता इतकच सांगतो मंडपात मूर्ती सुरेख असली तरी मी तुमच्या घरात थांबतो
काव्यरस

श्श..... सांभाळून बोला! भाग २

लेखक ज्योति अळवणी यांनी रविवार, 27/09/2015 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
भाग 2 "रामुकाका... ओ.. रामुकाका..... काय झाल? काय पडल?" वर्धाने जोरात हाक मारत रामुकाकाना विचारले. "काही नाही जी. तुम्ही म्हणाल तस जी." खालून उत्तर आले. एकमेकांकडे बघत परत खोलीकडे वळले. पण जिन्याच्या उजव्या बाजूकडे खोलीच दारच नव्हत. समोर एक आणि डावीकडे दोन अशी एकूण अरेन्ज्मेंट होती. सगळेच गोंधळले. "अरे आपण उजवीकडच्या खोलीकडे गेलो होतो न?" मंजूने विचारले. अभी डावीकडे वाळला आणि एका खोलीच्या दारात उभ रहात म्हणाला,"अरे आपल सामान इथे आहे. उजवी डावी सोडा... या जेवण तयार होईपर्यंत जरा फ्रेश होऊया." सगळे अभिच्या मागे डावीकडच्या खोलीकडे वळले. अवनीला मात्र हे थोड विचित्र वाटल.

तिला काट्यात घर सापडले

लेखक सिध्दार्थ यांनी रविवार, 27/09/2015 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
तिला काट्यात घर सापडले बाभळ तिथे गवसतो म्हणे... गिधाडांची काळी ज्वाला सतत असतो लचक्याचा घाला.... तिचा आत्मा गुहेत अडकून राहिला काळ सरून देऊळ पडून गेला... तिने हाती मग फुल उजळले त्यात आत्मीक अत्तर गवसले… सोडविना तो गंध नेई चंद्रापलीकडे तेथे असतो राणा सांगती सगळे…. ती निघाली लाटेच्या हाकेवरती जो घेऊन गेला कमळ डोईवरती… तिच्यात आला निघून काळ आडोश्याला पाझर फुटला चंद्र माखला आज वसुंधरेला…
काव्यरस