Skip to main content

अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: ४ जोशीमठ दर्शन

लेखक मार्गी यांनी शनिवार, 10/10/2015 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवर वाचकांना मन:पूर्वक अभिवादन! डिसेंबर २०१२ मध्ये उत्तराखंडमध्ये केलेल्या प्रवासाच्या आणि ट्रेकिंगच्या आठवणी इथे शेअर करत आहे. थंडीच्या दिवसांमध्ये जिथपर्यंत रस्ता सुरू असेल, तिथपर्यंत फिरायला जावं ह्या विचाराने हा प्रवास केला. उत्तराखंडमध्ये हिवाळ्यामध्ये बद्रिनाथच्या जवळ भ्रमंती करताना अपूर्व असा रमणीय भाग बघता आला. त्याचं हे प्रत्यक्ष वर्णन. .

माझ्या कविता

लेखक माहीराज यांनी शनिवार, 10/10/2015 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या कविता. .    काही शब्दांनी सजलेल्या . .    काही स्वप्नांनी भिजलेल्या. .    कधी भासांमधे अडकून    काही क्षणांमधे रुजलेल्या. . माझ्या कविता. .     कळत नकळत मनामध्ये विरलेल्या..     कधी कधी तर भावनाच विखुरलेल्या ..     कधी ओझरत्या आशेने खुललेल्या ..     तर कधी विखुरत्या रंगात फुललेल्या.. माझ्या कविता.
काव्यरस

स्वराज्य

लेखक माहीराज यांनी शनिवार, 10/10/2015 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
माझे विचार.. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच " असे लोकमान्य टिळकांनी इंग्रज सरकारला ठणकावून सांगितले आणि 1949 साली आपल्याला स्वातंत्र मिळाले, पण आज खरचं आपल्याला स्वातंत्र मिळाले आहे का? खरचं आपल्याला स्वातंत्र्याचा अर्थ माहीत आहे का? या स्वातंत्र्याने काय दिले हे माहीत आहे का ?        संविधानाने आपल्याला काही अधिकार दिलेत ते तरी माहीत आहे का?  हां FC च्या टीचर सांगतात म्हणून आपल्याला काहीही बोलण्याचा ,आपले मत मांडण्याचा अधिकार आहे हे माहित आहे.      पण बोलणं म्हणजे नक्की काय? मत कधी व कुठे  मांडावे ?

सुखद श्रावणसरी

लेखक माहीराज यांनी शनिवार, 10/10/2015 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
गर्दी दाटून आली नव्याने काळ्या मेघांची अंबरात,, व्हावी धरणीवरी सुखाने ओल्या थेंबाची बरसात.. आतुरली ही घरणी, आतुरले सारे पक्षी आस लावी मनाला निळ्या आभाळाची नक्षी, भरलेले आकाश दवाने पुन्हा बसरु दे निमिषात , व्हावी धरणीवरी सुखाने ओल्या थेंबांची ब़रसात.. पंख पसरुनी मयुर हा जणु गातो मनी गाणे गंध दाटला मातीचा सुर छेडीले चातकाने ओढे,नाले,सरिता,डबके पुन्हा भरावी क्षणात व्हावी धरणी वरी सुखाने ओल्या थेंबाची बरसात..
काव्यरस

धन्यवाद

लेखक सन्जोप राव यांनी शनिवार, 10/10/2015 06:33 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी, खरे तर वर्षांपूर्वी,'मिसळपाव' वरील माझ्या परिचित-अपरिचित मित्रांना मी माझ्या संशोधन प्रकल्पामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्याला मला उदंड प्रतिसाद मिळाला. त्या प्रतिसादांचे विश्लेषण करुन काही महिन्यांपूर्वी मी माझा प्रबंध सादर केला. या प्रबंधाबद्दल नुकतीच मला पुणे विद्यापीठाकडून ‘विद्यावाचस्पती’ (पी.एच.डी.) ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. या प्रकल्पामध्ये मला मदत करणाऱ्या सर्वांचे मी मन:पूर्वक आभार मानतो. यथावकाश या संशोधन प्रकल्पावर अधिक काही लिहिण्याचा माझा मानस आहे. पुन्हा एकदा धन्यवाद!

संदर्भांचा विसर आणि भुलाबाईंचा उत्सव

लेखक माहितगार यांनी शनिवार, 10/10/2015 00:29 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी विकिपीडियावर भोंडला या लेखास कुणीतरी हात घालेल आणि सुधारणा करेल या आशेवर अल्पसे लेखन करून लेख सोडून दिला होता. पण गेल्या तब्बल नऊ वर्षात तसा मुहुर्त येणे कदाचित त्या लेखाच्या नशिबी नसावे. मराठी विकिपीडियावर १५ ऑक्टोबर पासून वाचक प्रेरणा सप्ताह साजरा करावा असा मानस असल्यामुळे ऑप्टोबर महिन्यातील उत्सव विषयक लेखांच्या सुधारणेची हालचाल करावी म्हणून भोंडला हा लेख पुन्हा संपादनासाठी घेतला.

शेवग्याच्या शेंगा

लेखक जव्हेरगंज यांनी शुक्रवार, 09/10/2015 21:45 या दिवशी प्रकाशित केले.
कडुसं पडत आलं तरीबी पारुबाय कुडाला पोतारा देत बसली व्हती. आता पतुर म्हागची दोन घरं पोतारुन झालती. म्होरलं वट्यापसलं भिताड तेवढं राहीलेलं. भाभीनं बादलीत पाणी आणुन पाटीत वतलं. "पारे, जायच्या आगुदर तीवडी भांडीपण घास बरका" एखादं लालुच दाखवल्यासारखं भाभी म्हणाली. "पल्लीला आणलं आसतं तर बर झालं आसतं आवं, तीवडीच भांडी घासु लागली आसती". पारुबायनं एक खडा टाकुन बघितला. "नगं ग बया, बर झालं न्हाय आणली, नस्ती ब्याद नकु आमाला" भाभी फणकाऱ्यानं म्हणत घरात शिरली. पारुबायनं आपलं हिरमुसलेपण लपवुन ठिवलं. आताशा पारुबायला आसली कामं व्हत न्हवती. ऊन्हातान्हात जिवाला तरास व्हायचा. पल्लीला घरी यीवुन म्हैना झाला.

जपान, जपानी आणि मी! ....भाग १

लेखक पद्मावति यांनी शुक्रवार, 09/10/2015 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
'' पमीचान, यु आर अ बेरी गुड कूकर''.....माझ्या हातचा खतरर्नाक स्वयंपाक खाउन सुद्धा मला " गुड कूकर" म्हणणार्या बाईकडे मी थक्क होऊन पहात होते. पुढे हळूहळू जपानी लोकांच्या या अती नम्रपणाची इतकी सवय झाली की मग त्यांनी मला 'यू आर बेरी स्मार्त' किंवा अगदी 'यू आर बेरी थीन' वगैरे म्हटले तरी मी अजिबात दचकायचे नाही. खरंच कौतुक करताहेत का टोमणा मारताहेत असलं फालतू टेन्शन न घेता बेधडकपणे थॅंक यू ..आरिगातो गोझाईमास म्हणून टाकायचे.

सांज वेडी रंगताना

लेखक माहीराज यांनी शुक्रवार, 09/10/2015 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
सांज वेडी रंगताना याद यावी का तुझी आस वेडी या मनाची दाट होते त्या क्षणी..।। राग जुळता या मनाचे दुर होती अंतरे गीत फुलवी जिवनाचे सुर देती पाखरे स्वप्न फुलता हे उद्याचे रात वाटे पाहुणी आस वेडी या मनाची दाट होते त्या क्षणी..।। चिञ माझे अंतरीचे रंग भरती ही फुले गंध ओले चंदनाचे अंतरंगी दरवळे याचवेळी ही अबोली प्रित दाटे या मनी आस वेडी या मनाची दाट होते त्या क्षणी..।। सांज वेडी रंगताना याद यावी का तुझी आस वेडी या मनाची दाट होते त्या क्षणी..।।
काव्यरस

माझी पत्रकारिता : पाडगावकरी शब्द मैफल

लेखक pradnya deshpande यांनी शुक्रवार, 09/10/2015 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
माझी पत्रकारिता : पाडगावकरी शब्द मैफल पाडगावकर फेब्रुवारी २०१३ मधील पंधरा सोळा तारिख असेल. रात्रीचे सात साडेसात झालेले. दुसऱ्या दिवशी विकली ऑफ असल्याने आज कुठल्याही परिस्थितीत साडेनऊपर्यंत कार्यालयाच्या बाहेर पडायचेच असे ठरवून संगणकासमोर नेहमीप्रमाणे तबला बडवणे सुरु झाले. (पत्रकारितेत की बोर्डला तबला म्हणतो आम्ही पत्रकार). हातावर बऱ्याच बातम्या असल्याने आज तरी ब्युरो चिफने ऐनवेळी नवी असाईनमेन्ट देऊ नये अशी मनोमन प्रार्थना करत होते.