प्रेरणा: http://www.misalpav.com/node/33189
शब्दांचा पसारा सारा,
शब्दांचाच आसरा,
शब्द भुलवून नेतात,
शब्द झुलवत ठेवतात,
शब्द दिलासा देतात,
शब्द अंतही पाहतात,
शब्द मने तोडतात,
शब्द नाती जोडतात,
शब्द वार करतात,
शब्द घायाळ करतात,
शब्दांच्या जखमा सलतात,
मनात निरंतर उरतात,
जखमा ज्या कधी न भरतात,
जखमा त्या वेदना देत जगतात,
कायमस्वरूपी....
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1168
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
आमचा धागा ही प्रेरणा????
आवडली.
आवडली!