"थिबॉ मीन" मयन्मारचा (ब्रह्मदेश) शेवटच्या सम्राट आणि राजघराण्याचा शेवट का अभ्यासावा ?
आपल्या पुर्वेचा देश मयन्मारमधून बर्याच मोठ्या कालखंडानंतर तिथे लोकशाही सरकारची स्थापना झाल्याची बातमी आली. त्या सरकारमध्ये अजूनही मयन्मारी लष्कराचा (भारताच्या दृष्टीने, चीनला अप्रत्यक्षपणे भारता विरुद्धा काड्या चालू ठेवण्याची सोयीचा) सहभाग असणार आहे. मयन्मारमध्ये लोकशाही आली म्हणजे लगेच भारताचे मयन्मार सोबतचे संबंध सुधारतील का उर्वरीत आशियान देशांशी दळणवळण व्यापार सुलभ होण्यास काही मदत होईल का हे काळच सांगेल. पण तो आपल्या या धागा लेखाचा विषय नाही. धागा लेखाचा विषय आहे "थिबॉ मीन" या मयन्मारच्या (ब्रह्मदेश) शेवटच्या सम्राट आणि राजघराण्याचा शेवट.
मिसळपाव
छायाचित्र जालावरून साभार
भिंतीपल्याड जग असतं, निरखावं की
कड्या काढून दार सताड उघडावं की
पुढे जायचा वसा कधी टाकू नये
ठेच लागली जराशी तर लंगडावं की
आहे त्यातच समाधानी रहावं, पण
इच्छित साध्य करण्या थोडं झगडावं की
घेऊ द्यावा मनालाही निर्णय त्याचा
मनाला जे आवडतं ते, निवडावं की
सदासर्वदा चांगुलपणा अळणी होतो
अधनं मधनं जरा जरासं बिघडावं की
निसटून जातो काळ हातून तरीसुद्धा
जमेल तितकं आपण घट्ट पकडावं की
भिंतीपल्याड जग असतं निरखावं की
कड्या काढून दार सताड उघडावं की
- अपूर्व ओक