Skip to main content

नवविधवेचे नवर्‍यास पत्र

लेखक विवेक ठाकूर यांनी बुधवार, 10/02/2016 00:31 या दिवशी प्रकाशित केले.
तू गेलास... बरं झालं. आणि लवकर गेलास ते आणखीन बरं झालं. नाही तरी रात्री पिऊन पडायचास.....काय उपयोग होता तुझा? लग्नानंतर तुझं पिणं कमी होईल या आशेनं आई-वडीलांनी मला घरात आणलं. पण आधी बाहेर पिणारा तू , घरीच बाटली घेऊन बसायला लागलास, का तर म्हणे चखण्याचा खर्च कमी होतो. मुलं तुला घाबरायची पण एकदाच मी, तुझी पोलीसात तक्रार करुन, इन्स्पेक्टर बोक्यांना घरी बोलावलं. त्यांनी तुला असा काही झोडला आणि म्हणाले ‘फोकलीच्या, पोराबाळांवर आणि बायकोवर हात टाकशिल तर गोमूत्र पाजीन !’ तेंव्हापासनं तू फक्त शून्यात नजर लावून प्यायला लागलास.

लदाख सायकल ने : तंगलंग-ला ते उप्शी (भाग ११)

लेखक राजकुमार१२३४५६ यांनी मंगळवार, 09/02/2016 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
लद्दाखी गुराखी ते पण घेऊन जातील. मी नको म्हटले. मनात म्हटले कि, साले तुम्हीच चोर आहात आणि दुसऱ्याच सांगता. ते तर डोंगर भागातले आहेत. त्यांना चोरी करता येत नाही. आयुष्यात पहिल्यांदाच ५१३० मीटर उंचा वरती झोपत होतो. तुमच्या पैकी तर ९०% लोक एवढ्या उंचावर गेले पण नसतील. ह्या भागात फोटो कमी आहेत. कारण हि तसेच आहे सकाळ पासून जितका चाललोय तेवड्या बर्फाच्या थंड हवेतच चाललोय. हाथ मौजे काढून,कैमेरा चालू करण्याचा प्रश्नच नाही. आज फक्त १९ किमी सायकल चालवली.

दिवस तेरावा

सकाळी ७ ला आवाज ऐकून जाग आली.

एका विधवेच नव-याला पत्र

लेखक धुरंधर यांनी मंगळवार, 09/02/2016 17:20 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या सरांनी FB टाकलेलं हेे पत्र.... एका विधवेचे नवऱ्याला पत्र. प्रिय ----- काल तुझा अकाली मृत्यू झाला. वय 41 फक्त. म्हणजे आयुष्यात स्थिरस्थावर होऊन आनंद उपभोगण्याचे , मुलांबरोबर फिरण्याचे, खेळण्याचे ,बायकोबरोबर गप्पगोष्टी, थट्टामस्करी करण्याचे वय. परंतु त्या सुखाला तू मुकालासच पण या आनंदाला तुझी बायको मुलंही पारखी झाली. काय कारण होतं या सगळ्याचं? तू खोट्या आनंदात रममाण झाला होतास. त्यामुळे खऱ्या आनंदाला तू मुकतो आहेस याचे तुला भानच राहिले नाही. लग्न झाल्यापासून पाहतेय, तू कायम मित्रांच्याच गराड्यात cheers करत असायचास.

राजाच्या रंगम्हाली

लेखक शरद यांनी मंगळवार, 09/02/2016 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
राजाच्या रंगम्हाली, सोन्याचा बाई पलंग रुप्याचा खांब, तेला मोत्याची झालर राजाच्या रंगम्हाली, पराची मऊ गादी जरीचा चांदवा, रेशमी शिणगार गडनी, सजनी, गडनी सजनी गं राजाच्या रंगम्हाली, रानी ती रुसली बोलना, हसना, उदास नजर राजाच्या रंगम्हाली, राजानं पुशिलं डोळयाची कमळं उघडा, व्हठाची डाळिंबं गडनी, सजनी, गडनी सजनी गं राजाच्या रंगम्हाली, रानी वो सांगिते सुना सोन्याईन म्हाल, कशाला बडिवार मायेच्या पूतापायी, रानी गं रडीते असवांची गंगा व्हाते, भिजीला पदोर गडनी, सजनी, गडनी सजनी गंs गडनी-- गढनी..मैत्रीण कवी योगेश यांची ही निनांत सुंदर रचना "साधी माणसे" या १९६५ सालच्या सिनेमात लता व उषा मंगेशकर यांनी गायिल

मामलेदार मिसळ पंढरी

लेखक मीउमेश यांनी मंगळवार, 09/02/2016 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूवी रविवारी सकाळी प्रिय पत्नीने नेहमी प्रमाणे स्वयंपाक या विषयाला फाटा दिल्याचे अधिकृत जाहीर केले. गेल्या काही दिवसांपासून मामलेदार मिसळ मंदिराला भेट न दिल्याने मनाला रुखरुख लागून राहिले होती,(पूर्वी बी पी ओ मध्ये काम करताना सकाळी पाच वाजता सुटून , आम्ही सकाळी साडे पाचला मामलेदार मिसळ मंदिरात हजेरी लावत असू ) या घटने मुळे योग जुळून आला. रविवारी मामलेदार मिसळ मिळत नसे, काही दिवसांपासून रविवारी सुद्धा पूर्ण दिवस हाटेल उघडे असते.

मी आणि शाळेचे Reunion - (भाग ४)

लेखक Anand More यांनी मंगळवार, 09/02/2016 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ भाग ३ _________________________________________________ सकाळी अलार्म व्हायच्या आधी उठू लागलो. अंगात एक वेगळाच उत्साह संचारला होता. एक नवीन कारण मिळाले होते. जिमला जाण्यासाठी. घाम गाळण्यासाठी. ट्रेडमिलवर धावण्यासाठी. जास्तीची वजने उचलण्यासाठी. सिट अप्स मारण्यासाठी. Reunion - फुलराणी. जिममधून बाहेर पडून समोरच्या कबुतरखान्याजवळ लावलेल्या अॅक्टीव्हाला किक मारताना जेंव्हा कबुतरे उडायची तेंव्हा मला मी बाहुबली असल्याचा भास होऊ लागला. आणि कानात “धीवरा” गाणे घुमू लागले.

गुजरान

लेखक हरिदास यांनी मंगळवार, 09/02/2016 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
गुजरान माझी होईल कशी गुजरान,कंठाशी आला प्राण कोण देईल आम्हाला दान,वणव्यात अडकल रान डोक्यावर कसले भार,कोणी देईना जीवा आधार फक्त उरल्या घटका चार,लांबला प्रवास फार चार घासांचे हे दुखणे,पोटात तिडिक उठणे काट्यावर सदैव निजणे,अश्रुंनी रातभर भिजणे धीर करुनी पसरीला हात,केविलवाणे बोल तोंडात लाज सुटली होती आघात,भीक मागतो माणसात कटोऱ्यात पडती नाणे,मुखात देवाजीचे गाणे असे जीवन लाजिरवाणे,श्वानापरी काय राहाणे पोटाला मिळे भाकर,साऱ्या जगाचा मी चाकर झोप नसते रात्रभर,श्वास माझे तुमचे आभार कुठल्या कर्माची ही शिक्षा,दारोदारी मागतो भिक्षा शरीराची होते रक्षा,मनास देई काही दीक्षा कप
काव्यरस

कुत्री पालन ---- भाग १ ---- निवड, कुत्र्यांची काळजी, शिक्षण आणि लॅब्रेडॉरचे अनुभव.....

लेखक मुक्त विहारि यांनी मंगळवार, 09/02/2016 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
कुत्री पालन ---- भाग १ ---- निवड, कुत्र्यांची काळजी, शिक्षण आणि लॅब्रेडॉरचे अनुभव.....

मिपात जरा ऊदासच वाटलं...

लेखक अभिदेश यांनी मंगळवार, 09/02/2016 06:59 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा मिपात जरा ऊदासच वाटलं लाटकरांची लाटी आणि जिलेबी नाही डांगे ह्यांचा स्कॉर्पियो चा प्रवास संपत नाही गुरुजींचा एक वर्ष पूर्तीचा धागा संपत नाही ट. का. चं लग्न जमल्याची बातमी नाही बरेच दिवसांत आस्तिक नास्तिक वाद नाही कोणाची छायाचित्र स्पर्धेतला पुरस्कार वापसी नाही दीपक कुवेतची पनीर रेसिपी नाही छ्या … पूर्वीचं मि .पा. आता राहिलं नाही मिपात आल्यावर जरा ऊदासच वाटलं

एका गावातिल बस - रुपक कथा

लेखक सुज्ञ यांनी मंगळवार, 09/02/2016 01:06 या दिवशी प्रकाशित केले.
एक गाव होते , त्या गावात एक खुप मोठी बस होती. बस मधे वर जाण्यासाठी ( त्या गावातील बाकीच्या लोकांच्या दृष्टीने वर जाण्यासाठी किंवा प्रगती करण्यासाठी म्हणा ) एक शिडी लावलेली असून अनेक लोक प्रयत्न करून ती शिडी चढुन बस मधे जागा मिळवत असत. अडचण ही होती की लुळ्या लोकांना ती शिडी चढ़ण्यास धडधाकट लोक मदत करण्याऐवजी कायम त्रास देत (गंमत ही होती की ते लुळे नसत फक्त धडधाकट लोकांनी त्यांना मानसिक दृष्ट्या तसे बनवले होते. आपल्याला वर जायला मिळावे म्हणून हो ! ही त्या धडधाकट लोकांनी चूकच) .