Skip to main content

चौकस

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 14/02/2016 05:16 या दिवशी प्रकाशित केले.
निवेदक : तेंव्हा मंडळी .............. अपराध पोटात घाला चुकलं माकलं माफ करा. ( एक लहान मुलगा हेल्मेट घालून स्टेजवर येतो.) अरे हे कोण आले. ए बाळा काय हवय तुला. आणि इथं कसा आलास? ए बाळा...... अरे ए बाळा. मुलगा : ( हेल्मेट काढतो ) काय म्हणालात ओ काका अज्जिबात ऐकू आलं नाही. हेल्मेटमुळे काही ऐकूच येत नाही बघा. निवेदक: अरे मी विचारले कोण आहेस तू. इथे काय करतोयेस? ते हेल्मेट का घातले आहेस. मुलगा: ओ काका मी मीच आहे. माझी आई म्हणते की उगाच नसत्या चौकशा करणार्‍या चहाडबुचक्या माणसाना अज्जिब्बात नाव सांगायचे नाही. निवेदक: काय?

छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १६: फूल: निकाल

लेखक साहित्य संपादक यांनी रविवार, 14/02/2016 00:24 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, यंदाच्या छायाचित्रणकला स्पर्धेला दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद. ज्या निकालाच्या धाग्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता तो प्रकाशित करताना आम्हाला आनंद होत आहे. निकाल जाणून घेऊया, स्पर्धेचे परीक्षक श्री सर्वसाक्षी यांच्या शब्दांत. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सप्रेम नमस्कार,

मोबाइलसाठी तरी चाला...!

लेखक पी महेश००७ यांनी शनिवार, 13/02/2016 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
मोबाइलसाठी तरी चाला...! तुम्ही चालले की मोबाइल चालेल... काय भन्नाट आयडिया आहे ना? आजच एक बातमी वाचली. ‘अवनि’ नव्हे अवनिमो या मूलभूत गरजांमधील एक म्हणजे मोबाइल. अवनिमो म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा आणि मोबाइल. तर हा मोबाइल रिचार्ज करण्यासाठी जवळ पॉवर बँक बाळगणारे अनेक असतील. पण आता या पॉवर बँकला छान पर्याय निघालाय. तो म्हणजे तुम्ही चाला, म्हणजे मोबाइलही चार्ज होईल. अर्थात, त्यासाठी विशिष्ट बूट तयार करण्यात आले आहेत. ‘एनर्जी हॉर्वेस्टिंग अँड स्टोअरेज टेक्नॉलॉजी’ची संकल्पना यात वापरली आहे. तुम्ही जितके चालाल तेवढा मोबाइल चार्ज होईल.

रुग्णालयांशी संलग्न दुकानातून औषध खरेदीची सक्ती करता येणार नाही -------

लेखक पुणे मुंग्रापं यांनी शनिवार, 13/02/2016 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
सुमारे सात वर्षांपूर्वी जानेवारी महिन्यात आमचा नातू चि. इशान याला व्हायरल इन्फेक्शनमुळे ताप आला. पुढे ते इन्फेक्शन मेंदूपर्यंत पोहोचले व त्यामुळे तो अत्यवस्थ झाला. ताबडतोब त्याला सह्याद्री हॉस्पिटल मध्ये प्रवेश घ्यावा लागला. त्याला ADEM नावाचा दुर्मिळ रोग झाला आहे ,असे मेंदूविकाराचे तज्ञ डॉ. दिवटे यांनी निदान केले. त्यावर एकमेव इलाज म्हणून Iviglob या आयात केलेल्या औषधाची इंजेक्शन्स रोज तीन वेळा याप्रमाणे पाच दिवस देण्यात आली. तो ९ जानेवारी ते १३ फ़ेब्रुवारी या मुदतीत सह्याद्री हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात होता. औषधोपचार लागू पडून तो बरा झाला याबद्दल आम्ही हॉस्पिटलचे मनापासून आभारी आहोत.

राशोमोन (भाग - २) चित्रपट

लेखक Anand More यांनी शनिवार, 13/02/2016 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ ---------------------- मी चित्रपट पाहणार नव्हतो. आणि न पाहताच जर त्यावर काही लिहिले असते तर माझ्या मतावर तुमच्या मताची दाट छाया पडली असती किंवा माझे मत परप्रकाशित राहिले असते. याचा अर्थ असा नव्हे की मला जाणवलेला चित्रपटाचा अर्थ तुम्हाला जाणवलेल्या अर्थाच्या पूर्ण विरुद्ध आहे.

"द सिक्रेट" : विचारांना कंपने असतात!

लेखक चेक आणि मेट यांनी शुक्रवार, 12/02/2016 20:11 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, धाग्याच्या शिर्षकाबद्दल थोडं सांगतो, 'द सिक्रेट' हे नुकतच वाचनात आलेलं Rhonda Byrne या लेखकाचं पुस्तक. बरं आता इथे मिपावर असणार्यांपैकी काही जणांनी ते पुस्तक वाचलय,नाही वाचलय ते मला माहित नाही. तर सुरूवात लेखक कशी करतात पहा- "A year ago,my life had collapsed around me.I'd worked myself into exhaustion,.......

भोजन : रसपरिपोष आणि उत्सव !

लेखक विवेक ठाकूर यांनी शुक्रवार, 12/02/2016 20:00 या दिवशी प्रकाशित केले.
१. देहभार भोजन हा देहभाराशी कमालीचा निगडीत पैलू आहे. त्या नित्यक्रमाचा उत्सव कसा करावा, याविषयी लेखमालेतला हा दुसरा लेख सादर करत आहे. आहार, विहार, निद्रा, उत्सर्ग आणि प्रणय हे निसर्गानं सर्वांना बहाल केलेले पाच आनंद आहेत. नैसर्गिक याचा अर्थ, ते मिळवायला कोणत्याही शिक्षणाची किंवा कौशल्याची गरज नाही. ते आपल्याला जन्मतःच प्राप्त आहेत आणि सदैव उपलब्ध आहेत. हे सर्व आनंद एकमेकांशी निगडित आहेत. विहारानं शरीर दमलं नाही तर आहाराचा आनंद मिळणार नाही. मनसोक्त विहार आणि तृप्त करणारा आहार यात निद्रेचं सौख्य लपलंय.

मुळ्याचे मुठीया

लेखक अनन्न्या यांनी शुक्रवार, 12/02/2016 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
सानिकाच्या दुधीच्या मुठीयाच्या कृतीप्रमाणे केलेली पाकृ. साहित्य: दोन वाट्या मुळ्याचा पाला बारीक चिरून दीड वाटी कणिक एक वाटी रवा एक वाटी बेसन एक टीस्पून धने पूड एक टीस्पून जीरे पूड एक टेस्पून आलेलसूण पेस्ट अर्धा टीस्पून मिरची पेस्ट ( तिखट्पणानुसार कमी जास्त) एक टीस्पून आमचूर पाव टी स्पून खायचा सोडा मीठ चवीनुसार अर्धा टीस्पून मोहरी, एक टीस्पून पांढरे तीळ, चिमुट्भर हिंग अर्धी वाटी तेल बारीक चेरलेली कोथिंबीर, ओले खोबरे (ऐच्छीक) कृती: एक चमचाभर तेल कढईत घेऊन मुळ्याचा बारीक चिरलेला पाला परतून घ्यावा.

लदाख सायकल ने : ससपोल ते फोतूला (भाग १४)

लेखक राजकुमार१२३४५६ यांनी शुक्रवार, 12/02/2016 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा ससपोलला पोहोचलो तेव्हा मी ६२ किलोमीटर सायकल चालवली होती. खूप थकलो होतो. टैण्ट लावायचे अजिबात मन नव्हते. ससपोल मध्ये घुसल्यावर एक गेस्ट हाउस दिसलं. भाडे पांचशे रुपये. मी मोलभाव केलं तर शंभर रुपये खाली आला. चारशे रुपये. घरात दोनच व्यक्ती होत्या. दोन्ही पण महिला. एक आई आणि तिची मुलगी. मी जेवणाचे विचारले तर त्यांच्या बरोबरच माझे जेवण बनवले. भात आणि भाजी. ससपोल सिन्धु नदीच्या किनारी आहे आणि नदीच्या दुसऱ्या बाजूला प्रसिद्ध गोम्पा अल्ची आहे. इथून अल्ची गोम्पा दिसतो. पण गेस्ट हाउस मधून दिसत नव्हता.

राशोमोन (भाग - १) प्रास्ताविक

लेखक Anand More यांनी शुक्रवार, 12/02/2016 17:35 या दिवशी प्रकाशित केले.
ही लेखमाला वाटली, तरी प्रत्यक्षात ३ आणि ४ ऑक्टोबर २०१५ रोजी मंदार काळे ऊर्फ रमताराम आणि माझी फेसबुकवर जे साद प्रतिसाद झाले त्यांची तीन भागातील मालिका आहे. यातील संदर्भ समजून घ्यायचा असेल तर रमतारामांची मिपावर पूर्वी प्रसिद्ध झालेली राशोमोनवरची जंगलवाटांवरचे कवडसे ही आठ भागांची लेखमाला वाचायला हवी. संदर्भ सोडून वाचल्यास कदाचित फक्त पहिला भाग थोडा कठीण जाईल पण किंचित प्रयत्नाने दुसरा आणि तिसरा भाग मात्र समजू शकेल.