Skip to main content

रामा मेघ दे.......प्रत्यक्ष प्रयोग

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 15/02/2016 06:28 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा http://www.misalpav.com/node/34751
संदेश गायकवाडच्या उत्तम दिग्दर्शनाने बहरलेल्या, चंदर पाटीलच्या अस्सल हजरजबाबी विनोदी अभिनयाने रंगलेल्या, नामांतर कांबळे , श्रीकांत हांडे कल्पना कदम, श्रुती चव्हाण या कलाकारांच्या उत्तम अभिनयाने सजवलेल्या , लोक संगीताने नटलेल्या अशा माझ्या "रामा मेघ दे " या विनोदी नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग ................ नेहमी लक्षात राहील अशी एक आनंदी, हास्य विनोदाने बहरलेली संध्याकाळ साजरी करण्यासाठी एक मिपाकर म्हणून मी तुम्हा सर्वाना आमंत्रीत करतोय. आपला विजुभाऊ ( चकोर शाह)
आज शुक्रवा

सेकंड ओपिनीयन

लेखक सतिश गावडे यांनी रविवार, 14/02/2016 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
वाकडेवाडीचा जुन्या मुंबई पुणे रस्त्यावरचा भुयारी मार्ग दृष्टीपथात येताच मी गाडी डाव्या मार्गिकेत वळवली. वेग कमी करत करत भुयारी मार्गाच्या तोंडाच्या थोडंसं अलिकडे थांबलो. "सर, या सबवेतून पलिकडच्या बाजूला निघा. दोनेक मिनिटे चालत राहिलात की चौकात अ‍ॅग्रिक्ल्चरल कॉलेजचं मागचं गेट लागेल. तिथून डावीकडे वळलात की लगेच बस स्टँड आहे", मी प्रा. डॉ. ना शिवाजीनगर बस स्टँडला कसे जायचे ते हातवारे करून सांगितले. "धन्याशेठ, नक्की खाजगी डॉक्टरला दाखवून घ्या बरं. टाळाटाळ करू नका.", सरांनी गाडीतून उतरत असतानाच पुन्हा एकदा मला कळकळीनं सांगितलं.

आपल्याकडे बुवा असलेच काही तरी असते..

लेखक पिके से पिके तक.. यांनी रविवार, 14/02/2016 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याकडे बुवा असलेच काही तरी असते, स्वतावरच विश्वास ठेवून बेण स्वताच फसते... आपल्या "माँ" ची सेवा सोडून याले "राधे माँ" लागते, फक्त "माँ" च काहून तर मग सोबत "बापू" पण लागते, याचा डोक्यातले दही डोक्यातच कसे नासते, स्वतावरच विश्वास ठेवून बेण स्वताच फसते आपल्याकडे बुवा असलेच काही तरी असते.... प्रेमिकेला प्रियकरापेक्षा आजकाल कांदा जास्त रडवते, नाते संबंध आजकाल फक्त "Whats App" घडवते, नोटांचा काल खंड गेला, आता खरेदी "card" वरच असते, स्वतावरच विश्वास ठेवून बेण स्वताच फसते आपल्याकडे बुवा असलेच काही तरी असते.... नुसती माणसेच नाय तर Technology पण smart झाली, "मन कि बात" करायला redio ची गरज आज आली,
काव्यरस

तृप्ती

लेखक स्वामी संकेतानंद यांनी रविवार, 14/02/2016 21:42 या दिवशी प्रकाशित केले.
(कवितेत टाकू की कथेत कळले नाही तर कवितेतच टाकून मोकळा होतो...) काम्पिल्य नगरात राहणारा गरीब, पापभीरु, ईश्वर साधनेत रमलेला.. स्टिरिओटाईप्ड एक 'क्ष', दंडकारण्यात राहणाऱ्या काळ्याकभिन्न, राकट, हिंस्र.. स्टिरिओटाईप्ड एका 'य' ला पम्पा सरोवराकाठी भेटला.
काव्यरस

लदाख सायकल ने : फोतूला ते मुलबेक (भाग १५)

लेखक राजकुमार१२३४५६ यांनी रविवार, 14/02/2016 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
मला अश्या ठिकाणी भूतांची भीती वाटते. काळोखात बाहेर येउन बघितलं तर लांब लांब पर्यंत कोणीच नव्हते. अश्या वेळेस तर मला चारी बाजूनी भूतेच दिसू लागतात. मनाला माहिती आहे कि, भूत भीत काही नसतं. पण अशी वेळ आली कि चांगलीच फाटते. दिवसा मी सिद्ध करू शकतो कि, भूत भीत काही नसते. पण अश्या शांत रात्री एकटे असताना.... सिद्ध करायचे तर बाजूलाच राहिले. विचार करूनच भीती वाटते. तंबू लावल्या नंतर जे मी स्लीपिंग बैग मध्ये घुसलो. सकाळ होई पर्यंत डोळे उघडलेच नाही. आज 70 किलोमीटर सायकल चालवली.

जंटलमन्स गेम - ९ - किम ह्यूज.. द गोल्डन बॉय

लेखक स्पार्टाकस यांनी रविवार, 14/02/2016 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
क्रिकेटच्या खेळात वैयक्तिक कौशल्याला महत्वं असलं तरी अखेर क्रिकेटचा खेळ हा सांघिक खेळ आहे असं नेहमी म्हटलं जातं. अनेकदा वैयक्तीक कामगिरीपेक्षाही संघातील सर्वांची मिळून कामगिरी कशी होते यावर मॅचच्या जयापराजयाचं पारडं झुकत असतं. अर्थात यालाही अपवाद आहेतच! चटकन आठवणारं उदाहरण म्हणजे १९७५ च्या वर्ल्डकपमधली 'गॅरी गिल्मोर मॅच' म्हणून ओळखली जाणारी ऑस्ट्रेलिया-इंग्लंड सेमी-फायनल! एखादा खेळाडू एकहाती मॅच कशी जिंकतो याचं हे उत्कृष्टं उदाहरण! आणखीन एक उदाहरण म्हणजे १९८३ च्या वर्ल्डकपमधली भारत-झिंबाब्वे मॅच आणि त्यातली कपिलदेवची १७५ रन्सची इनिंग्ज!

एक व्हॅलेन्टाईन

लेखक सुरवंट यांनी रविवार, 14/02/2016 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
काल : स्मशानात जाऊन मी बसतो. नेहमीच बसतो. आजही बसलो होतो. थडग्यावर बसून तंबाखू खायला फार बरं वाटतं. एकदा किक बसली का तुझ्या आठवणीत शिरता येतं. तुझ्या केसातला मोगऱ्याचा गजरा आणि त्याचा तो गंध, बांगड्यांची किणकीण आणि छमछम ते पैंजण, ढळढळीत दुपार आणि ऊसाचं रान. तुझ्या वैभवाचा मला स्पर्श झाला... काय पण व्हॅलेन्टाईन, मी इथं वर बसलोय बार भरत, आणि तू थडग्यात.. आज: मी व्हिस्की पीत नाही पण हा ग्लास फक्त तुझ्यासाठी. मला आवडतात म्हणून ही गुलाबाची फुलंही सोबत. तुलाही आवडतील याची खात्री आहे. काल रॉजर म्हणत होता, वील यू बी माय व्हॅलेन्टाईन? हाऊ क्यन आय डिल विथ धिस्?

दिल से सलूट....

लेखक dipak bhutekar यांनी रविवार, 14/02/2016 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच 26 जानेवारीला गणराज्य दिना निमित्त झालेल्या पुरस्कार सोहळ्या मध्ये महाराष्ट्राच्या चार शुर मुलाना "भारत पुरस्कार" या सर्वोच्य राष्ट्रिय बाल शौर्य पुरस्कार साठी गौरवण्यात आले त्यात वैभव घंगारे (वर्धा) , नीलेश भिल्ल (जळगाव), मोहित दळवी (मुंबई) ह्याची शौर्य पुरस्कार साठी निवड करण्यात आली आहे. तर, नागपुरच्या गौरव सहस्त्रबुध्दे (वय15) ह्याला मरणोत्तर शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे गौरवने आपल्या जीवाची काळजी न करता आपल्या चार मित्रांना वाचवन्या साठी आपला जिव धोक्यात घातला मित्राचे प्राण तर त्याने वाचवले पण स्वतःचा जिव मात्र त्याला गमवावा लागला.

राशोमोन (भाग - ३) भिक्षू

लेखक Anand More यांनी रविवार, 14/02/2016 10:01 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ ------------------ Mandar Kale's Response तुम्ही 'हरण्याऐवजी' ,'गमावणे' हा शब्द सुचवला आणि माझ्या मनातले विचार अजून स्पष्ट होण्यास मदत झाली म्हणून जे लेखन मी काल संपवले होते त्याचा अजून एक धागा लिहावासा वाटला.

मला कुठे मरायचं आहे?

लेखक एनिग्मा यांनी रविवार, 14/02/2016 07:08 या दिवशी प्रकाशित केले.
मला कुठे मरायचं आहे? जिवंतपणी आपण नेहमी हा विचार करत असतो कि मला कुठे जायचं आहे? मला कस जगायचं आहे? मला काय हवा आहे? पण कुठे मारायचं आहे हा विचार फार क्वचितच आपल्या मनात येतो. तसही आजकालच्या ददागीच्या जमान्यात जगायला फुरसत मिळत नाही, तर मारायची चिंता पडलीये कुणाला. आपला दिवस जातो तो काम, कष्ट आणि फावल्या वेळात करमणूक ह्यामध्ये, त्यात आपण आपल्या मनाला थोडं शांत करेल असा काही शोधतच असतो. त्यासाठी कित्येकदा आपण सहलीला जातो आणि रोजचा तणावातून मुक्त होता येते का हे पाहतो. पण ती चीर्र्शांती आपल्याला सापडेलच असा नसत.