Skip to main content

अपूर्ण कविता .....

लेखक मयुरMK यांनी बुधवार, 10/02/2016 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
येण्यास जन्मा थोडा उशीर झाला अन जीवनी सगळाच गोंधळ झाला ! उशीर का झाला ? गोंधळ का झाला ? पूर्वजन्मीच्या जीवनाच्या जगण्याचा करता करता हिशोब पाप-पुण्याचा शोधताना चुका मागच्या जन्मांच्या वेळ खूप गेला अन थोडा उशीर झाला....! आता हिशेबात चुका नाहीत करायच्या असा प्रामाणिक निश्चय मनाशीच केला - मंदिरात जायला थोडा उशीर झाला अन मंदिराचा दरवाजाच बंद झाला ! उशीर का झाला ? दरवाजा बंद का झाला ? देवाच्या देवळात जाताना देवपुजेआधी माझ्यासाठी व माझ्याच स्वकियांसाठी काय मागावे ,काय नको ?
काव्यरस

मी आणि शाळेचे Reunion - (भाग ५)

लेखक Anand More यांनी बुधवार, 10/02/2016 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ _________________________________________________ शाळेसमोर उभा होतो. Reunion चौथ्या मजल्यावरील सभागृहामध्ये होतं. मी जिममध्ये केलेल्या सरावाचे स्मरण करत जिना चढून वर गेलो. मुलींनी छान रांगोळी वगैरे काढली होती. खुर्च्या मांडल्या होत्या. स्टेजच्या मागे पडद्यावर Reunion चा फ्लेक्स लावला होता. काही जण माझ्या आधीच येउन बसले होते. हुबळी वरून किरण, पुण्यावरून स्वाती, राज, सारंग, अनघा, मीनल, मुंबई वरून ओंकार असे कोण कोण कुठून कुठून आले होते. मुली साड्या नेसून तर मुलं झब्बे बिब्बे घालून, सगळे छान दिसत होते. त्यांच्या सगळ्यात, सुटलेले पोट दिसू नये म्हणून ढगळ टी शर्ट घातलेला मी वेगळा दिसतोय असे मला वाटू लागले. पण मग माझे लक्ष जरा बारीक झाले. अनेकांची पोटे माझ्यापेक्षा जास्त सुटली आहेत, कित्येकांच्या केसावर काळाने आपला हात फिरवला आहे हे दिसू लागले. मला थोडे माणसात आल्यासारखे वाटू लागले. ग दि मांच्या "प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट" या उक्तीचा प्रत्यय येऊ लागला. मी तिला शोधत होतो. अजून कुठे दिसत नव्हती.

नवर्‍याचे नवविधवेस पत्र

लेखक तर्राट जोकर यांनी बुधवार, 10/02/2016 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
तुझं पत्र मिळालं, कसं कुठे ते विचारु नको... सांगतो सावकाश. मी गेलो आणि त्याचा तुला आनंद झाला हे ऐकून माझ्या काळजाला चिरा पडतील असं का वाटलं तुला? त्या आधीच पाडल्यात, माझ्या लाडक्या दारूने. रात्री माझा काही उपयोग नव्हता म्हणालीस का..? आता सर्व स्पष्टच करतो. तुझ्याजवळ आलं की तू सतराशेसाठ कारणं द्यायचीस, आज काय तर एकादशी, मग काय चतुर्थी, कधी अंगारकी, मंगळवार, शिवरात्र, अगदी काहीच कारण सापडलं नाही तर तुझं डोकं तरी दुखायचं. आता मी दारू नाय पिणार तर काय करणार. दारू मला नशा देतांना असली कुठली कारणं देत नव्हती गं. पोटात गेली की सरळ ढगात.

कोहोज गडावरील भटकंती

लेखक sagarshinde यांनी बुधवार, 10/02/2016 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
1 नमस्कार मित्रांनो माझ नाव सागर, मला ट्रेकिंगचं खुप वेड, सह्याद्रीच्या डोंगररांगा भटकायला शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात बांधलेल्या गडांना भेटी द्यायला आवडते, त्यामुळे सारखा मी कुठेना कुठेतरी ट्रेक ला जात असतोच नुकताच मी हारिहार गड हा ट्रेक केला, या वीकेंडला कुठे जायचं असा विचार करत होतो, कामावर असताना अचानक मुकुंद चा कॉल आला "सागर या रविवारी ट्रेक ला जावू, वन डे चा ट्रेक करू जवळपासचा गड शोध आपण तिकडे जावूया." मग मी गडांबद्दल माहिती पाहायला लागलो, माहिती शोध

पूर्वेच्या समुद्रात --१६

लेखक सुबोध खरे यांनी बुधवार, 10/02/2016 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वेच्या समुद्रात -- १५ अंदमानमध्ये असताना एक गोष्ट लिहायची राहून गेली ती येथे लिहीत आहे. पोर्ट ब्लेअर च्या आसपास गस्त घालत असताना आमच्या जहाजाच्या हेलीकॉप्टरची माणसे/ सामान वर खेचायची मोटर आणि कप्पी याची चाचणी करायची होती.म्हणून पायलट आणि इंजिनियर यांची चर्चा चालू होती. त्यासाठी त्यांना ज्याला चांगले पोहता येत होते असा कोणी तरी सडपातळ माणूस हवा होता . मी तेथेच उभा होतो आणि म्हणालो,"चला मीच येतो." त्यावर दोघे पायलट म्हणाले, "सर, तुम्ही"?

To मितवा, (पत्रास कारण की)

लेखक लाडू. यांनी बुधवार, 10/02/2016 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
आज आरती याचं “राधे… . सृजन…” वाचनात आलं. आणि मग स्वत:ला थांबवताच आलं नाही. एकतर राधा-कृष्ण आवडतात मला. त्यात इतक सुंदर लिहिलेलं.खरच त्या सगळ्या भागांमध्ये रंगून गेले अगदी. लेख तर निव्वळ अप्रतिम. सगळच्या सगळ तस्स डोळ्यासमोर आलं. वाचून झाल्यावर नेहमीप्रमाणे तुला पाठवली लिंक. मला आवडलेलं साहित्य तुला आवडतच कायम. काही गोष्टींबाबत मतभेद असले [सगळ्यात आधी धुक्यातल चांदण] तरीही राधे आवडेल तुला याची खात्रीच होती. ५ मिनिटात तुझा मेसेज अपेक्षित होता. आणि तू केलासही. पण लेखाबद्दल काहीच न बोलता तू मला अचानकच विचारलस, ‘तुला कोमल रिषभ कळतो?’ आणि मला एक क्षण खरच काही कळल नाही. [कोमल रिषभ कळतो मला.

काटा हालेना, काटा चालेना

लेखक बाजीप्रभू यांनी बुधवार, 10/02/2016 08:41 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो!! तुमच्या सगळ्या शिव्या-शाप मंजुर पण माझ्या ह्या पापात जरा सहकार्य करा. लवकरच आमच्या माजी विद्यार्थ्यांचा योगा कॅम्प होऊ घातलाय. कॅम्प उत्तर काही मनोरंजन कार्यक्रम आहेत त्यात मला 'चाफा बोलेना' ह्या कवितेचे विडंबन सादर करायचं आहे.… काही यमक चालीत बसत नाहीयेत… वेळ कमी आहे म्हणून मिपादारी गाऱ्हाणं घालायला आलोय. कृपया मदत करावी.
काव्यरस