Skip to main content

वेताळकथा: तर त्यांचे नाते काय असावे?

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 13/03/2016 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव.कॉम वरील वाचकाने आपला हट्ट सोडला नाही. नेहमीसारखाच नविन काय वाचायला आले आहे ते पाहण्यासाठी तो पुन्हा ऑनलाईन आला. ते पाहून वेताळ त्याला म्हटला, "हे वाचका, असाही तू वेळ घालवण्यासाठी येथे आला आहेस. या जगात मानवप्राणी अगदी वेगळा आहे. थोडा विचित्र आहे असे म्हटले तरी चालेल. तर मग मी अशाच प्रकारातील एक सत्यकहाणी सांगतो ती तू ऐक म्हणजे तुझा वेळ मजेत जाईल." असे म्हणून वेताळ सत्यकहाणी सांगू लागला----- पाषाणभेदने क्लायंटला आपले बोलणे पटवून दिले. क्लायंटसमोरील काम संपल्यानंतर आपल्या कामाच्या धोपटीत आपली नेहमीची कागदपत्रे ठेवली अन ती आपल्या खांद्यावर अडकवली.

पाण्यासाठी दाही दिशा !!

लेखक अनिकेत एस जोशी यांनी रविवार, 13/03/2016 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
राज्यात दुष्काळाचे सलग चौथे वर्ष सध्या आपण भोगतो आहोत. अनेक शहरांमध्ये आत्ताच पाण्याची बोंब उडालेली आहे. पुण्यासारख्या आणि नाशिकसारख्या, ठाण्यासारख्या एरवी पाण्याच्या बाबतीत सुखी राहिलेल्या शहरांमध्येही आठवड्यांतून दोन दिवस कधी तीन दिवस पाणी येणार नाही अशी स्थिती उद्भवलेली आहे. आणि आत्ता आपण फक्त मार्चच्य मध्यावर आलो आहोत! पुढचा पाऊस सुरु होऊन तलाव धरणांतील पाणी साठा उचावण्यासाठी अद्याप तीन महिन्यांचा किमान अवधी आहे. काळ तर मोठा कठीण आला अशीच ही स्थिती आहे.... अशा वेळी पाण्याच्या साऱ्या नव्या जुन्या योजना आठवल्या तर नवल नाही.

अधिकारी व लोकप्रतिनिधींमध्ये सुसंवाद हवा विसंवाद नको

लेखक अनिकेत एस जोशी यांनी शनिवार, 12/03/2016 20:44 या दिवशी प्रकाशित केले.
राज्य विधीमंडळाच्या अंदाजपत्रकी अधिवेशनाचा पहिला आठवडा तीन दिवसातच समाप्त झाला. 9 मार्चला सुरु झालेल्या या अधिवेशनाचे कामकाज 17 एप्रिलपर्यंत दाखवण्यात आले आहे. तसे पाहिले तर हे अधिवेशन चक्क चाळीस दिवस चालेल असे म्हणावे लागेल. पण प्रत्यक्षात कमाचे दिवस आहेत फक्त तेवीस!! दि. 17 एप्रिल पर्यंतचे अधिवेशन असे दाखवलेले आहे, पण त्यात दि. 13 एप्रिल नंतर साऱ्या सुट्याच आहेत. पहिला आठवडा तीन दिवसातच संपल्या नंतर पुढचा, म्हणजे दुसरा सप्ताह, हा कामाकजाच्या पूर्ण पाच दिवसांचा आठवडा आहे. त्या नंतरचा तिसरा आठवडा पुन्हा तीन दिवसांचा आहे.

अशी कबुतरे येती...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 12/03/2016 18:34 या दिवशी प्रकाशित केले.
सध्य:स्थितीत रहात असलेल्या जागेत ह्या कबुतरांनी ग्यालरीत जे डांबरी'करण सुरु केलय..त्याला तोड नाही.खरच नाही. कारण घासून काढायला पत्रा किंवा फावडं जरी वापरलं तरी "ते वाळलेले" तुटत काहि नाही. मेलं इथे उद्वेगानी "श्शी!" पण म्हणता येत नाही! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif त्यामुळे त्याच सदर उद्-वेगातून ह्ये वेगवान विडंबन बाहेर पडलेले आहे. ते त्याच भावनेनी वेचावे...सॉरी, वाचावे!

सायकलीशी जडले नाते १९: उत्साह वाढवाणा-या राईडस

लेखक मार्गी यांनी शनिवार, 12/03/2016 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

रा.स्व. संघावरील हि वेगळी टिका तुम्हाला पटते का ?

लेखक माहितगार यांनी शनिवार, 12/03/2016 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
जानेवारी २०१६ मध्ये 'ज्ञानयोद्धा' नावाची काही एक व्याख्यानमाला झाली असावी, रमेश ओझा नावाचे कुणि एक गांधीवादी आहेत त्यांचे या व्याख्यानमालेत रास्वसंघाची ९० वर्षे या विषयावर भाषण झाले असावे; ज्याचे महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्राने वृत्तांकन केले होते. , रमेश ओझांनी रा.स्व.

मागे वळून पाहताना

लेखक महासंग्राम यांनी शनिवार, 12/03/2016 10:44 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा स्त्रोत रे मामा गाडी पकडलेली पाहताना त्रास होतो- मागे पळून गाडी पकडू नकोस! आठवून भूतकाळ वाईट वाटतं- नंबरप्लेट तू पाहू नकोस! दिल्या-घेतल्या पावत्यांची फिकिर तू करू नकोस पकडलेल्या गाडीस दया बिलकूल दावू नकोस! गेलास निघुनी गाडीची चाबी घेउनी आता पैसे नाकारु नकोस या चौकात भेटलास , कृपया पुढल्या चौकात भेटू नकोस!! (ताजी कविता- आताच 9/10वाजता हाफिसात येताना केली होती.)
काव्यरस