युटा आणि अरिझोनाचे वाळवंट - भाग १
नोकरीच्या निमित्ताने सध्या आम्ही अमेरिकेतील युटा राज्यात राहत आहोत. निसर्गसौंदर्य म्हणजे घनदाट झाडी, डोंगर-दऱ्या आणि हिरवा रंग हा माझा आपला उगाचच (गैर)समज होता. युटा हे खरेतर वाळवंट, त्यामुळे मला इथे आल्यानंतर फार काही निसर्गसौंदर्य वैगेरे पहायला मिळेल अशी अपेक्षा नव्हती.
पण इथे आल्यानंतर ग्रैंड कॅनियनबद्दल ऐकले. ऐकून फार काही नवल असेल असं वाटलं नाही. कॅनियन म्हणजे मोठ्या डोंगरांच्या मधील खोल दरी. बऱ्याच कॅनियनमधून नदी किंवा पाण्याचा प्रवाह वाहताना आढळतो. ग्रैंड कॅनियन या अमेरिकेतील युटा, अरिझोना आणि नेवाडा या ३ राज्यांमध्ये पसरल्या आहेत.
मिसळपाव
.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------