Skip to main content

मोसाद - भाग ९

लेखक बोका-ए-आझम यांनी शुक्रवार, 18/03/2016 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
. मोसाद - भाग ८ मोसाद - भाग ९ २७ फेब्रुवारी १९६५. पश्चिम जर्मनीमधल्या der Spiegel या नामवंत नियतकालिकाच्या ऑफिसमध्ये एक निनावी फोन आला. फोन करणाऱ्याने दिलेली बातमी विचित्र होती – एका नाझी युद्धगुन्हेगाराचा ‘ जे कधीही विसरणार नाहीत ’ अशा लोकांनी दक्षिण अमेरिकेतील उरुग्वे देशाची राजधानी माँटेव्हिडिओ येथे काटा काढला होता.

(कूणास ठाऊक ?)

लेखक टवाळ कार्टा यांनी शुक्रवार, 18/03/2016 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्ना कूणास ठाऊक ? काय घेण्यासाठी काय वेचण्यासाठी या मॉलमध्ये आलोय आम्ही कूणास ठाऊक ? काय चापण्यासाठी काय गिळण्यासाठी या मॉलमध्ये आलोय आम्ही कूणास ठाऊक ? काय टापण्यासाठी काय हुंगण्यासाठी या मॉलमध्ये आलोय आम्ही कूणास ठाऊक ? काय करण्यासाठी का नूसतेच खर्चण्यासाठी या मॉलमध्ये आलोय आम्ही पाकिटशोध (दिव्यसंग्रह)

(छटाक)

लेखक नाखु यांनी शुक्रवार, 18/03/2016 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
"अरे सम्जता कोण तुम्ही स्वतःला ?" असला प्रश्न तू मिपाकर साहित्यीकांना विचारतोस. अरे असें विचारावं कसं वाटल तुला. फार धाडसी रे बुवा तू.अरे मिसा होणे म्हणजे काय गुट़का खायची गोष्ट वाटली काय तुला? उघडली पुडी लावली तोंडाला. आँ म्हणे काय समजता स्वतःला.

नमस्कार

लेखक दिपुडी यांनी शुक्रवार, 18/03/2016 09:20 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी मी मिपाची नवीन सदस्य नि बऱ्यापैकी जुनी वाचक आहे.खरे म्हणजे माझी लेखनात फार गती नाही पण वाचन मात्र मला भरपुर, खुप ,अतिशय आवडते.पण बरेच दिवस मी वाचनापासून बरीच लांब गेले होते .मला पुन्हा खुप छान छान वाचनीय धागे दिल्याबद्दल मिपाकरांचे आभार

कुणास ठाऊक ?

लेखक gsjendra यांनी गुरुवार, 17/03/2016 22:55 या दिवशी प्रकाशित केले.
कुणास ठाऊक ? काय शोधण्यासाठी काय साधण्यासाठी या जगात आलोय आम्ही कुणास ठाऊक ? काय जाणण्यासाठी काय गणण्यासाठी या जगात आलोय आम्ही कुणास ठाऊक ? काय जिंकण्यासाठी काय थुंकण्यासाठी या जगात आलोय आम्ही कुणास ठाऊक ? काय करण्यासाठी का नुसतेच मरण्यासाठी या जगात आलोय आम्ही आत्मशोध (काव्यसंग्रह)
काव्यरस

हिवाळ्यातला लदाख - जांस्कर घाटीमध्ये बर्फवृष्टी (भाग ३)

लेखक राजकुमार१२३४५६ यांनी गुरुवार, 17/03/2016 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
1 . --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

हिवाळ्यातला लदाख - जांस्कर घाटीमध्ये बर्फवृष्टी (भाग ३)

मागील पानावरून ............ निम्मू मध्ये सिन्धु आणि जांस्कर या नद्यांचा संगम आहे. आम्हाला आता श्रीनगर रोड सोडून जांस्कर किनार्यावरून जाणारा रस्ता पकडायचा होता.

काटा वजनाचा --५

लेखक सुबोध खरे यांनी गुरुवार, 17/03/2016 21:37 या दिवशी प्रकाशित केले.
काटा वजनाचा --४ मागच्या चार भागात आपण पाहिले कि वजन का वाढ्ते? adipostat म्हणजे काय आणि वजन थोडे कमी होऊन परत का वाढते? यात एक मूळ विचार मी अंतर्भूत करू इच्छितो कि कोणते अन्न आहे ज्याने वजन पटकन वाढते. आपल्याला २४ तास उर्जेची गरज भासत असते आणि हि उर्जा ग्लुकोज जाळून मिळवली जाते. आपल्या मेंदूला चोवीस तास ग्लुकोज चा पुरवठा लागतो मग तो जागा असो कि झोपेत. झोपेत मेंदूचे वेगवेगळे भाग वेगवेगळ्या वेळी कार्यरत होत असतात.