Skip to main content

कोकोनट चिकन मसाला

लेखक निशांत_खाडे यांनी गुरुवार, 10/03/2016 01:50 या दिवशी प्रकाशित केले.
चिकन मसाला माझा ऑलटाइम फेवरेट पदार्थ आहे. नेहमीचाच कांदा-टोमाटो पेस्ट मधला चिकन मसाला खायचा कंटाळा आला की त्यावर माझे निरनिराळे प्रयोग चालूच असतात. त्यापैकी हा एक साधलेला प्रकार. यात मसाला बेस म्हणून कांदा-टोमाटो पेस्ट न वापरता ओले नारळ वापरले आहे.

तास केंव्हा सरे?*

लेखक डॉ. एस. पी. दोरुगडे यांनी बुधवार, 09/03/2016 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
पहिला (जांभई देत): ता sss स केंsव्हाss सsरेssss? दुसरा (निःश्वास सोडून): -हाय! केंव्हा रे सरेल? वाटते लिहून-लिहून हात मोडेल! अन पेनही बहुदा झिजेल! फिजिक्स, केमिस्ट्री संपले तास, उरे अजून हा बायोलॉजीचा त्रास! पहिला: -हाय! तास केंव्हा सरे? दूसरा: खरडून-खरडून भुर्ता झाला! शिजून-शिजून बटाटा झाला! तरी का न ये दया सरांना? फूटे न पाझर तयांच्या हृदयाला? (पहिल्याला एकदम काहीतरी आठवते. तो चुटकी वाजवतो. सॅकमध्ये हात घालतो. एक पुस्तक बाहेर काढतो.) पहिला: युक्ति सुचली मजला खाशी वाचत बसतो आता मी सु. शि.^ (पहीला पुस्तक वाचण्यात गुंग होतो. सरांचे लक्ष त्याच्याकडे जाते.

माहिती हवी: ६ महिन्याच्या बाळाचा आहार आणि त्याच्या योग्य वेळा

लेखक उमेश पाटील यांनी बुधवार, 09/03/2016 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
६ महिन्याच्या बाळासाठी कोणता आहार कोणत्या वेळी द्यावा, कृपया मार्गदर्शन करावे सध्या खालील आहार देत आहोत बदामाचे वेढे - १ वेळा भाताची पेज - २ वेळी डाळीचे पाणी - २ वेळी (भाताच्या पेजे ला पर्याय) कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करावे.

< अश्शी सासू असती तर >

लेखक अन्नू यांनी बुधवार, 09/03/2016 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
अश्शी सासू असती तर, आंम्ही असे झालो नसतो भर तारुण्यात बायकोला, असं उठसूट सासुरवाडीला घेऊन गेलो नसतो तिची नसती आली कुणालाच सर अश्शी सासू असती तर आळी सगळी गाजवली असती, मिजास मोठी केली असती, राजा बनून हिंडलो असतो मेव्हणीही म्हणली नसती मेल्या बाजु सर अश्शी सासू असती तर घरातल्या कार्ट्यांजवळ तिला सोडून गेलो असतो आंम्हीसुद्धा नवरा-बायको मग सतत जवळ दिसलो असतो मळ्यातल्या शिदुबाने दिले असते अनेक वर अश्शी सासू असती तर सासुरवाडीतल्या मेव्हण्यांनी ठोकला असता सलाम दहा ते दहा रोज मस्त केला असता आराम सासर्‍यांनी माझं ऐकून वेळेअगोदर भरले असते लार्ज पेग अश्शी सासू असती तर मिपाबंधुंनी रम डिलेवरी केली असती म

सायकलीशी जडले नाते १८: तोरणमाळ सायकल ट्रेक

लेखक मार्गी यांनी बुधवार, 09/03/2016 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

का?, का?, का?, का?, का?, का?

लेखक माहितगार यांनी बुधवार, 09/03/2016 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
समदी पतंग सुताया लागली पुरुस हुसकाया लागलं, बाय नाडाया लागली; का?, का?, का?, का?, का?, का?, समदी लंगडाया लागली गाय हसाया लागली लोमडी नाचाया लागली का?, का?, का?, का?, का?, का?, पाव वातड होवाये लागलं मिसळ इटाया लागली राजकारण कुथाईने लागलं का?, का?, का?, का?, का?, का?

फुलदाणी

लेखक माहितगार यांनी बुधवार, 09/03/2016 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
निशा आर्त ओली रात गंधात रमली चढे मोगर्‍याची वेली चाफे खेळूनी आली फुले पान्हवली सांडे पारिजात अवेली पहाट खुलली फुलदाणी भरली चित्रकारः लुडवीग नॉस ,चित्र सौजन्य विकिमिडीया कॉमन्स flower basket
काव्यरस

(असा नवरा असता तर..)

लेखक नीलमोहर यांनी बुधवार, 09/03/2016 10:19 या दिवशी प्रकाशित केले.
असा नवरा असता तर, आम्ही असे झालो नसतो भर उन्हात रिक्षावाला शोधत हापिसला पायी निघालो नसतो त्याच्या नखाची कुणाला आली नसती सर असा नवरा असता तर घरदार काय जग गाजवले असते शॉपिंग हॉटेलिंग ऐश केली असती आएम द क्वीन ऑफ द वर्ल्ड म्हणत मिरवले असते पीसीएमसीत छोटसं आमचं असतं घर असा नवरा असता तर तळजाईच्या जंगलात निवांत हिंडलो असतो आम्ही झेड ब्रिजवर तुम्हाला कधीच दिसलो नसतो ओंकारेश्वराची कृपा झाली असती आम्हावर असा नवरा असता तर सेंट्रलच्या वॉचमनने केला असता सलाम रोज दुपारी ताणून देऊन केला असता आराम नवऱ्याने माझे न ऐकता वेळेअगोदर रेडी ठेवले असते ब्रेकफास्ट लंच अन डिनर असा नवरा असता तर गाडगीळांनीही होम डिलिव

कॉंग्रेस सरकार च्या आत्ताच्या काही योजना

लेखक सुज्ञ यांनी बुधवार, 09/03/2016 01:24 या दिवशी प्रकाशित केले.
खान्ग्रेसीजन व त्यांचे समर्थक , मित्र यांनी विरोधक असूनही काही चांगल्या योजना चालू केल्या आहेत त्यातील काही आपल्यासाठी .. जळजळ / मळमळ ओकू योजना या योजनेअंतर्गत आपण निवडणुकीत हरल्यामुळे सरकारविरोधातील आपली होणारी जळजळ कुठेही ओकण्याची मुभा दिली जाईल. त्यासाठी सरकारविरोधात जास्तीत जास्त फालतू विधाने कशी करावी याचे खास प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जातील. माननिय युवराजांच्या अभ्यासपूर्ण भाषणाच्या सीडी व केसेट सवलतीच्या दारात उपलब्ध . संसद रोको कमअक्कल योजना : या योजनेअंतर्गत कोणत्याही क्षुल्लक कारणावरून संसद बंद पाडण्यात येईल.

महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक सागरी तटीय भ्रमंती

लेखक योगेश आलेकरी यांनी मंगळवार, 08/03/2016 23:21 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, कळविण्यास आनंद होत आहे कि, आम्ही महाराष्ट्र गोवा,कर्नाटक मधिल सागरी तटावरील किल्ले आभ्यास/ भटकंतीला बाईक वरून जाउन आलो. यामध्ये ५0 किल्ल्यांचा समावेश करता आला.. एकंदरीत भन्नाट झालं सर्व..