शेवटी बाप हाय म्या-3
तुला बुलट घिवुन द्यायची आपली ऐपत नवती अण एवढंच काय हे बी कबुल हई म्या तुला कधी खेळायची मोटर बी नै घिउ शकलो. पर तु आठीव अतापोस्तवर तुला कदी बी शाळाची वाट सोडुन रानाची वाट धरा लावली नाय. दोन घास कमी खाल्लं पर तोहया पुस्तकाची सोय लावली.
तु बारवी झालास तवापासुण त्याट छाती काडुन गावात फिरायचु. आपुण लावलेलं झाड़ आता गार गार सावली देणार म्हणायचु.
मस लोकं मनली, तोहं पोरगं कालेज सोडुन गावांत उंडरतय, पाटलाच्या लेकिवर् उडतय. पर आपला भरुसा होता. म्या म्हणायचु, आपलं रघत हाय फुकट जाणार नाय. पर महा शिक्का खोटा निघला. म्या पिरमात आंधळा झालतु.
मिसळपाव