तो प्रवाही प्रवास…!
नदीकिनारी चालत जाताना उन्हाची ऊब जरा जास्तच जाणवत होती. तळपायांना थोडा गारवा मिळावा म्हणून किनाऱ्यावर लांबच लांब पसरलेल्या हिरव्या, थंडगार लुसलुशीत गालिच्यावर शूज काढून पाय टेकवत एका झाडाखाली बसले. तिथल्या नीरव शांततेचाही एक वेगळाच आवाज कानांना जाणवत होता.
थोड्यावेळाने सहजच लक्ष गेलं. माझ्यापासून अगदी दोन पावलांवरच मुंग्याची चाललेली एक लांबच लांब रांग दिसली…एक एक मुंगी अगदी ओळीने पुढचीच्या बरोबर मागे जात होती…मध्ये येणारे छोटे छोटे दगड, खळगे एका मागोमाग एक सहज ओलांडून पुढे चालली होती.
मिसळपाव
रविवारी "किल्ला" (२०१५) पाहिला. अतिशय सुंदर अनुभव देणारा चित्रपट. १०/११ वर्षांचा चिनू आणि त्याची आई चिनूचे वडील नुकतेच गेल्यावर आयुष्याशी तडजोड करत आहे ती परिस्थिती स्वीकारायला शिकतात, त्यांच्या आयुष्यातल्या साधारण एका वर्षातल्या घडामोडीं या चित्रपटात आपल्याला बघायला मिळतात.
तुम्ही आंबा कसा खाता?
आंबा घातलेल्या इतक्या पाक्रु बोर्डावर आल्यात की आता पब्लिक नुसता आंबा कसा खातात असे प्रश्न विचारायला लागली.मन एकदम गावच्या आठवणीत रमले आणि जिलबी पाडायचे ठरवले :)
आंबा हे इतके प्रिय फळ आहे की ते वर्षभर का मिळत नाही, ह्याची नेहमी हुरहुर लागून राहते.त्यात आंब्याच्या इतक्या जाती की बघायला नको. कोकणात आंब्याची नावे पण विचित्र असतात.