Skip to main content

काळरात्र (भाग २) आयझँक अँसिमोव्ह

लेखक विचित्रा यांनी गुरुवार, 29/09/2016 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
"आणखी चार तासात आपली संस्कृती नष्ट होणार आहे." अँटन उदासवाणं हसत म्हणाला." तू हे छापू शकतोस. पण वाचणार कोण?" "पण चार तासांत काहीच घडलं नाही तर?" थरमॉन हळूच म्हणाला."सगळंच बदलणार आहे." अँटनचा पारा चढला. तोच बिनीने परत हस्तक्षेप केला."पण सर, ऐकून तर घ्या,तो काय म्हणतोय." अँटनने हताशपणे मान हलवली."ठीक आहे. या तुझ्या मित्रासाठी मी तुला पाच मिनिटं देतो. बोल." "मी एवढंच सांगतोय,कि आता घडून येणार्या घटनांचा साक्षीदार बनण्याची तुम्ही मला संधी द्या. जर या परिस्थितीत तुमची भाकितं खरी ठरणार असतील, तर माझ्या वृत्तांकनामुळे तुमचं काहीच नुकसान नाही.

काळरात्र आयझँक असिमोव्ह

लेखक विचित्रा यांनी गुरुवार, 29/09/2016 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
सारो युनिव्हर्सिटीचा संचालक, अँटन ७७ भडकला होता. समोरच्या तरुण पत्रकाराकडे तो रोखून बघत होता.पण थरमॉन ७६२ ला त्याच्या रागाने काहीच फरक पडला नव्हता.आपल्या उमेदवारीच्या काळात त्याने अशा अनेक अशक्य मुलाखती घेतल्या होत्या आणि बदल्यात शरीरावर जखमा,मोडलेली हाडे नि सुजलेल्या डोळ्याची कमाई केली होती.अर्थात त्यामुळे त्याचा आत्मविश्वास कमालीचा वाढला होता. आता तो फक्त संचालकाचा पारा उतरण्याची वाट बघत होता. त्याच्या मते आधीच हे सगळे अवकाशसंशोधक विक्षिप्त होते,नि हा वृद्ध संचालक त्यांचा शिरोमणी. संचालक रागावर ताबा ठेवत कसाबसा बोलू लागला," तुझ्या धाडसाचं कौतुकच करायला पाहिजे.

ऊरी...

लेखक अर्थहीन यांनी गुरुवार, 29/09/2016 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
पहाटे झोपेत असताना काशमीरात तैनात असलेल्या मराठा लाईट इन्फन्टरीतल्या एका मित्राचा फोन येतो...... आवाज कमालीचा दबलेला... माझा जीव कातरून जातो... . तो म्हणतो- सच्या घरी फोन कर रं माझ्या ---बायको -दोन बारकी लेकरं -कुणीच कशी फोन उचलनायती... आता ड्युटी संपली- पहाटेपासणं करतोय फोन... . . मी त्याच्या घरी फोन करतो... 12-13 वेळात एकदाही फोन उचलला जात नाही... काळजी वाटायला लागते........ . . गावाकडच्या एका मित्राला त्याच्या घरी जाऊन यायला सांगतो... . . परत फोन करतो...

साक्षीदार ....... !

लेखक फिझा यांनी गुरुवार, 29/09/2016 10:05 या दिवशी प्रकाशित केले.
साक्षीदार ....... मी निर्दोष आहे हे कसे सिद्ध करणार..... तो किनारा सगळं पुसून मूक बनून हसतोय, समुद्राच्या लाटा उलटच उत्तरे देतायत, डोळेही हे नजरेला नजर देत नाहीयेत , पारिजातकाची फुलेही गंधांसकट कोमेजून गेलीत ? सगळे साक्षीदार विरोधात जातील कुणास ठाऊक होते , पण मी अजूनही हार मानली नाहीये ...... मला बंदिवासात अडकायचं नाहीये .... प्रेम मी केलंच नाहीये हेच सिद्ध करतीये ... ...... "खरंच " ? ....... .

काजळरेषा

लेखक राजेंद्र देवी यांनी गुरुवार, 29/09/2016 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
काजळरेषा का भिरभिरते नजर तुझी? ओलांडू नको रेषा काजळाची वाटत नाही का भीती कोणा रावणाची ठेव जाणीव लक्ष्मणाच्या वचनांची नको देऊस कष्ट वनवासी रामाला नको देऊस प्रश्न या समाजाला अग्निदिव्य शेवटी तुलाच आहे भूमीत जन्म अन भूमीतच शेवट आहे राजेंद्र देवी

सोनचाफ्याची फुलं आणि तो स्पर्श

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 29/09/2016 09:24 या दिवशी प्रकाशित केले.
सुम्या(सुमती) आणि गुरूनाथ ह्यांच्या इरसाल आंघोळींच्या आठवणी. सुम्या आणि गुरूनाथ हे एकमेकाचे शेजारी.आळीच्या घरात रहायचे.त्यामुळे सामाईक भिंत होती.मागील परीसरात पण सामाईक गडगा होता.दोघांमधे बावही सामाईक होती.बाव घरापासून थोडी दूर होती. टाककरांची सुम्या आणि केसकरांचा गुरूनाथ एकुलती एक मुलं.ल्हानपणी लपंडाव,लंगडी खोखो हे त्यांचे नेहमीचे खेळ असायचे.जवळपासच्या मित्रांना सामील करून खेळायचे.

लंडनवारी - भाग १ - पूर्वतयारी

लेखक वेल्लाभट यांनी गुरुवार, 29/09/2016 07:38 या दिवशी प्रकाशित केले.
लंडनवारी: पूर्वतयारी ब्लॉग दुवे: पूर्वतयारी चला! तयारी होत आलेली आहे. अनेक वर्षांपासूनचा लांबणीवर पडलेला बेत आता प्रत्यक्षात येतोय. लंडनवारी उद्यावर येऊन ठेपलेली आहे... झालं असं, की एप्रिल २०१६ मधे मुलाचा पहिला वाढदिवस होता. टिपिकल गोष्टींशी नेहमीच माझं वावडं असतं त्यामुळे मुलाचा वाढदिवस त्याला अपवाद नव्हताच. मग एक कल्पना मनात आली की वाढदिवसाची भेट म्हणून मुलाला एखादी गोष्ट देण्यापेक्षा एखादा स्प्लेंडिड 'एक्स्पिरियन्स' द्यावा. त्याला कुठेतरी घेऊन जावं असं वाटलं.

शब्द

लेखक अश्विनी वैद्य यांनी गुरुवार, 29/09/2016 03:54 या दिवशी प्रकाशित केले.

शब्द

लिहायचं तर खूप होतं, पण आज शब्दच हरवलेत कुठेतरी… संदर्भ चुकताहेत, अर्थ लागत नाहीयेत, वाक्य सुचत नाहीयेत, जुळवा-जुळव शब्दांची करावी की, त्याला चिकटलेल्या अर्थांची, कि नुसत्याच भाव हरवलेल्या अर्थहिन शब्दांची, काहीच स्पष्ट नाहीये, त्यात समोर असलेली डायरीची ती कोरी पानं स्वस्थ बसूही देत नाहीयेत…!
काव्यरस

ती - ८

लेखक खटपट्या यांनी गुरुवार, 29/09/2016 02:45 या दिवशी प्रकाशित केले.
"ती" "ती" - २ "ती" - ३ "ती" - ४ "ती" - ५ "ती" - ६ "ती" - ७ ती - ८ प्रकाश म्हणाला की, "नेहाचं आणि माझं एकमेकांवर प्रेम आहे. आम्ही लग्न करणार आहोत." बोरीवलीतील साहेब आमच्या तोंडाकडे बघायला लागले. साहेबांनी मला आणि सुशांतला बाहेर नेले आणि सांगीतले की प्रकाशचे वडील त्या भागातील एक प्रतीष्ठीत व्यक्ती आहेत.

रिहॅब चे दिवस (भाग ५ )!!!

लेखक वरुण मोहिते यांनी गुरुवार, 29/09/2016 02:41 या दिवशी प्रकाशित केले.
असेच दिवस जात होते. २६ वा दिवस उजाडला एक फोन करण्याची परवानगी घेतली . वर गेलो ऑफिस मध्ये आईला फोन लावला . एकट्याला बोलण्याची परवानगी नव्हतीच. फोन एकीकडे आणि रिसिव्हर आपल्याकडे असं होतं. मध्ये ग्रील त्यामुळे वैयक्तिक काही बोलता येणं कठीण होतं. तरीही मी नेटाने माझा मुद्दा बोलो मला काय वाटतं आणि मी परत असं करणार नाही या प्रकारचं. आईने एकच प्रश्न केला काय काम आहे . एका क्षणात बहुराष्ट्रिय कंपनी मध्ये असलेली नोकरी, आपला घरचा व्यवसाय त्या जीवावर आपण दाखवलेला माज गळून पडला. मी पुढे बोलो तरी.." ओके ठीक आहे" डॉक्टरांशी बोलते मग बघु हेच उत्तर आलं .