Skip to main content

राया...

लेखक राजेंद्र देवी यांनी शनिवार, 24/09/2016 08:21 या दिवशी प्रकाशित केले.
राया... मखमली मंचकी पसरली, मखमली काया, नका सोडून जाऊ, नका ना जाऊ राया ॥ध्रु॥ करून बसले मंचकी थाट किती दिवस पाहिली वाट उगवेल आता चैत्री पहाट सोनचाफ्याचा सुटेल घमघमाट अत्तराच्या लावल्या या समया नका सोडून जाऊ.... ॥१॥ ल्याले शालू भरजरी देह झाला आज शेवरी ठेवा बाजूला तुम्ही शेला घ्या अलगद कवेत मजला जाईल ज्वानी माझी वाया नका सोडून जाऊ.... ॥२॥ राजेंद्र देवी

परिभ्रमणे कळे कौतुक (भाग १) : रोमांचक रोम

लेखक चित्रगुप्त यांनी शुक्रवार, 23/09/2016 23:52 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही वर्षांत झालेल्या भटकंतीत मला भावलेली, कॅमेऱ्यातून क्लिकलेली काही दृष्ये या लेखमालिकेत देण्याचा विचार आहे. सुरुवात रोम पासून करतो. गेल्या वर्षी नोव्हेंबरात रोम बघायला जायचे ठरल्यावर रोममधील सुप्रसिद्ध ठिकाणांखेरीज काही जुने व्हिलाज , टायबर नदीच्या पलिकडला भाग, जुनी चर्चेस, व्हॅटिकन संग्रहालय , रोममधील जुन्या वस्त्या वगैरे सर्व फिरायला किमान पाच दिवस तरी हवेत असे वाटून airbnb.com मधून रोमच्या मध्यवस्तीतले एक घर आरक्षित करून आम्ही रोमला पहुचलो.

शिंगूळबाबूंची बंबुळभेट

लेखक जव्हेरगंज यांनी शुक्रवार, 23/09/2016 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
"बंबुळ्याला जायची यीश्टी कदी हाय वं?" वायरीची पिशवी हातात घीऊन मी बसलू हुतू. ऊन नुसतं कावत हुतं. येक जीपडं रस्त्यावर नव्हतं. पिपरणीखाली दोन करडं चरत हुती. तिकडंच बघत हुतू. "आत्ताच गीली की तुज्या म्होरनं" भजी तळत त्या आशोक सरापानं सांगितलं. म्हजी ह्यो हाटीलवाला दिसतू आशोक सरापासारखा म्हणूनशान. "आता दिड वाजोस्तोर येश्टी न्हाय रय" आशोक सरापानं यकदम येडझव्यासारखं माज्याकडं बघितलं. मी आपला पिपरणीच्या करडाकडं बघत ऱ्हायलू. तेज्यायचा दाणा येश्टी आपल्या म्होरनं गीली तरी दिसली न्हायी. पाचूट पेटल्यावनी ऊन पोळत हुतं. लय भजी खाव वाटत हुतं. पण न्हायतं खाल्लं. च्या बी लय पीव वाटत हुता. पण न्हाय पिला.

बौद्धधर्मप्रसारक... भाग-५

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 23/09/2016 22:27 या दिवशी प्रकाशित केले.
‘‘ फो ’’ बुद्धाचे चिनीभाषेतील नाव व चिनीलिपीतील त्याचे चिन्ह. Simple, Free Image and File Hosting at MediaFire बौद्धधर्मप्रसारक... भाग-१ बौद्धधर्मप्रसारक... भाग-२ बौद्धधर्मप्रसारक... भाग-३ बौद्धधर्मप्रसारक...

शब्दभूली

लेखक यशोधरा यांनी शुक्रवार, 23/09/2016 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
अचानक कधीतरी, तू उमलून येतेस. काळ वेळ न पाहता, राग लोभ न जाणता. पापणीतल्या पाण्यात कोणाच्या मुग्ध हास्यात, चुकार निवांत क्षणी कोण्या विस्कटल्या मनी. शब्दांचा आधार घेतेस तशी मौनातही बोलतेस उलगडतेस, तरीसुद्धा अलगद मिटू मिटू होतेस... तुझा सूर, तुझा नूर कधी फटकून दूर, गूज जीवाचे सांगण्या शब्द कधी महापूर. सभोवताली वावरत रहा शब्दांची नक्षत्रं पेरत, गावा शब्दभूलीच्या जाईन माग नक्षत्रांचा काढत.

होता का मानूस ?

लेखक पथिक यांनी शुक्रवार, 23/09/2016 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
कोनी म्हन्ते मी मराठा कोनी म्हन्ते मी बामन कोनी म्हन्ते मी हिंदू त कोनी म्हन्ते का मी मुसलमान कोनाले काही व्हाचं आहे त कोनाले काही पन मानूस व्हाचं नाही आहे राजेहो कोनालेच मानूस व्हाले भेतात सगळे काहून का मानूस होनं म्हंजे सोपं काम नाही जाती धर्माच्या मांडीवर बिनधोक बसून दूध पिन्यासारखं मानूस होनं म्हंजे एका बाईची जोखीम घेऊन तरास सहन करून सोतालेच जनम देनं आहे. सांगा आता - होता का मानूस ?

चिबडाची दह्यातली कोशिंबिर

लेखक अनन्न्या यांनी शुक्रवार, 23/09/2016 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाळ्यात कोकणात ठरावीक फळभाज्या मोठ्या प्रमाणात येतात. पडवळ, दुधी, काकडी, भेंडे, भोपळा, शिराळी, पारोशी त्यापैकीच एक चिबूड! ही काही फार वेगळी पाकृ नाहीय. पण ज्यांनी चिबूड पाहिला नसेल त्यांच्यासाठी!

मनाचा एकांत - चिमण्या

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 23/09/2016 08:40 या दिवशी प्रकाशित केले.
डाव्या हाताच्या मुठी एवढ्या चिमण्या हा हा करतात या जीवघेण्या ओसाडीत.... कुठे दाणे टिपत असतील? कुठे पाणी शोधत असतील? घरटे कुठल्या आडोशाला असेल? यांच्यात यांचे दफन कसे करत असतील? कोण करत असेल? चिमण्या निमित्त असतात............ आपल्याच छाटलेल्या मनाचे हे तासनतास भिरभिरणे असते..... . . . दुसरं काय असतो एकांत म्हणजे तरी! ---- शिवकन्या

कधी तरी पुन्हा आपण भेटायला हवं..

लेखक चुकलामाकला यांनी गुरुवार, 22/09/2016 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
कधी तरी पुन्हा आपण भेटायला हवं.. ओळखीचं हसून बोलायला हवं.. किती ती धूळ गैरसमजांची, मनाला स्वच्छ झाडायला हवं.. कुठंतरी आत सलतंय का काही? समजूतीचं मलम तिथं लावायला हवं.. जे झालं ते झालं, ते होणारच होतं अपराधीपणाचं ओझं फेकायला हवं.. पूलाखालून खूप पाणी वाहून गेलंय आनंदानं जीवन आता जगायला हवं.. अर्ध्यावर सोडू नये, गोष्ट किंवा नातं एकदा वेळ काढून ते संपवायला हवं..