Skip to main content

पावन

लेखक निओ यांनी गुरुवार, 29/09/2016 00:32 या दिवशी प्रकाशित केले.
पहाट झाली होती. आभाळ सर्वदूर व्यापून होते. रप् रप् पाऊस झाडा झुडुपात, चिखलात वाजत होता. घोडखिंडीतील पाणी आता लाल होऊन वाहत होतं. वरनं पावसानं आणि खालनं मावळ्यांनी घोडखिंडीत झुंबड उडवली होती. तलवारींच्या खण् खणाटांनी आणि आरोळ्यांनी खिंड दणाणून गेली होती. हबशी सिद्दी मसूद आणि त्याची रानटी फौज पुढे घुसायचा प्रयत्न करीत होती. बांदलसेना हर प्रकारे तो हाणून पाडत होती. मराठयांच्या राजाचा जीव धोक्यात होता. तो वाचवण्यासाठी मावळे पराक्रमाची शर्थ करत होते तर आपल्या सरदाराची अब्रू वाचवण्यासाठी मसूदची फौज झगडत होती. हिरडस मावळातील बांदलसेना जीवावर उदार होऊन लढत होती.

‘व्हॉय वी ट्रीट एनीमल्स लाइक एनीमल्स’-रैक्स हैरिसन

लेखक महामाया यांनी बुधवार, 28/09/2016 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या शतकांत बॉलीवुड प्रमाणेच हॉलीवुड मधे देखील अविस्मरणीय चित्रपट आले. पैकी काही चित्रपट बघतांना वाटलं की आपण हिंदी चित्रपट इंग्रजीत बघताेय की काय...अंतर होता तो सादरीकरणाचा. इथे अशाच काही इंग्रजी चित्रपटांमधील तो अविस्मरणीय प्रसंग, जो त्या इंग्रजी चित्रपटाला आपल्या बाॅलीवुडच्या चित्रपटाहून वेगळा ठरवतो... अविस्मरणीय हाॅलीवुड/ सहा- डॉक्टर डूलिटिल चा सवाल आपण जनावरांसोबत जनावरां सारखं कां वागतो...!

खरा खुरा रंगमंच ..... !

लेखक फिझा यांनी बुधवार, 28/09/2016 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
खरा खुरा रंगमंच ..... ! हुरहूर मनात घेऊन वेशभूषेत मग्न कधी तर कधी चेहऱ्यावर रंग उमटवलेला ! संगीताच्या तालात दंग कधी तर कधी रंगीत छटांचा प्रकाशात रमलेला ! अभिनयास सज्ज कधी तर कधी नुसताच प्रेक्षक बनलेला ! हा रंगमंच !

ठिकरी

लेखक राजेंद्र देवी यांनी बुधवार, 28/09/2016 08:32 या दिवशी प्रकाशित केले.
ठिकरी पडू दे चांगले दान मिळू दे यशाची शिडी नकोत ते सर्प जागोजागी आयुष्याची सापशिडी सापडू दे लगेचच लपलेले सुख नकोच सापडू दे दुःख आयुष्याचा लपंडाव मिळू दे सुखाचा झेल जिंकेन सर्वदा मी जाऊ दे दुःखाची विकेट आयुष्याच्या सामन्यात पडू दे चांगल्या घरात या देहाची ठिकरी नको होऊ दे स्पर्श या दुर्भाग्याच्या रेषांचा राजेंद्र देवी

" कृष्णाकडे असतील का उत्तरे ???....... "

लेखक फिझा यांनी बुधवार, 28/09/2016 06:40 या दिवशी प्रकाशित केले.
" कृष्णाकडे असतील का उत्तरे ???....... " 'त्याच्या' दूर दूर जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे राधा फक्त पाहत राहायची ..... रिकामं केलेलं मन पुन्हा एका नजरेने गच्च भरून जायचा .... तो वेड्या मनाला आता परत कसं सावरावं ? ना तिच्याकडे उत्तर .... ना 'त्याच्या'कडे मनामनांवर राज्य करणारा तो जगाचा रक्षण करणारा तो , प्रत्येक जीवात वास करणारा तो, विश्वविधाता तो , त्यालाही प्रश्न पडावा ? हे कसले 'प्रेम' ? केवळ अढळ विश्वास , जीवाला घोर लावणारी हुरहूर, डोळ्यात प्राण आणून वाट पाहायला लावणारी आस , फक्त एका क्षणाच्या भेटीसाठी ? बस्स!!

पाश्चिमात्य साहित्य

लेखक हेमंत लाटकर यांनी मंगळवार, 27/09/2016 23:33 या दिवशी प्रकाशित केले.
महायुद्ध आणि इतर अनेक युद्धे, संघर्ष, महामंदी अशा अनेक उलथापालथीतून पाश्चिमात्य समाज गेला होता. या पार्श्वभूमीवर डोस्टोव्हस्की, फ्रँझ काफ्का, अल्बर्ट कामू, सार्त्र, अर्नेस्ट हेंमिग्वे, जाॅन स्टाईनबेख, डिकन्स, लाॅरेन्स अशा अनेक पाश्चिमात्य साहित्यिकांनी नीतिमत्ता, कुटुंबव्यवस्था, लैंगिकस्वातंत्र्य यासारख्या जीवनाची अनेक अंगे बघितली होती तसेच यांची स्वत:ची आयुष्य प्रचंड वादळी होती. त्यांचे आयुष्याचे अनुभव जिवंत होते आणि त्यामुळेच त्यांचे साहित्य रसरशीत आणि जिवंत वाटते.

मला आवडलेले शायर २ : दुष्यंतकुमार

लेखक महासंग्राम यांनी मंगळवार, 27/09/2016 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
असं म्हणतात गझल अनुभवण्याची गोष्ट आहे. मानवी मनाचं प्रतिबिंब गझलेत कायम दिसत आलं आहे. मीर तकी मीर, गालिब यांसारख्या कित्येक मोठ्या शायरांनी गझल रुजवली. मुघल काळात गझलेला राजाश्रय लाभला, एवढे भाग्य क्वचितच कोणत्या काव्य प्रकाराला लाभले असेल. पुढे दुष्यन्त कुमार, बशीर बद्र, निदा फाजली यांसारख्या लोकप्रिय शायरांनी हिंदुस्तानी भाषेत गझल लिहून ती अधिकच लोकप्रिय केली.

व्यथा

लेखक राजेंद्र देवी यांनी मंगळवार, 27/09/2016 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
व्यथा भावनेचा कोंडमारा घाव जे जिव्हारा कसा आवरू आता आयुष्याचा पसारा सांगू व्यथा कोणाला आहे कोण ऐकणारा कसा आळवू न कळे सुना सुना देव्हारा गुंतलास कोठे तू कोणास उध्धारा व्याकुळले नयन दे दर्शन परमेश्वरा राजेंद्र देवी

रिहॅब चे दिवस ( भाग ४) !!!

लेखक वरुण मोहिते यांनी सोमवार, 26/09/2016 23:15 या दिवशी प्रकाशित केले.
दुसऱ्या दिवशी उठलो, कानावरती इतनी शक्ती हमे देना दाता मन का विश्वास कमजोर ना होना ..हे गाणं येत होतं. मन भरून आलं. रूम मध्ये पाहिलं तर कोणच नव्हतं. जरा वेळाने सगळे आले. योगा करायला गेले होते खाली. गाण्यामुळे माझे डोळे भरून आले , हुंदकेही येत होते बहुधा . तितक्यात खांद्यावर एक हात पडला . गप बाला गप... हे त्यांचं पहिला वाक्य. हे साहेब पनवेल चे .सिडको एअरपोर्ट अश्या ठिकाणी जमीन गेलेली. काही कोटींचे धनी. मात्र मोहाची दारू, मच्छी ,पनवेल या व्यतिरिक्त जगातील कुठल्याही गोष्टींशी त्यांचा संबंध नव्हता. काही बोलो तरी आमच्या पनवेल ला काय होता हे व्याख्यान परत ऐकावं लागे .

परीकथा - भाग अकरा - फेसबूक स्टेटस २.४ - २.५ वर्षे

लेखक तुमचा अभिषेक यांनी सोमवार, 26/09/2016 23:09 या दिवशी प्रकाशित केले.
९ ऑगस्ट २०१६ हल्ली आम्ही एक नवीन प्रकार सुरू केला आहे. डोळ्यावर हात ठेवून गुडघ्यात डोके खुपसून बसायचे आणि आपण लपलो असे डिक्लेअर करायचे. मग पप्पा उगाचच्या उगाच शोधायचे नाटक करणार आणि ती अचानक भॉ केल्याच्या आवेशात मोठ्याने किंचाळणार.. तर गेल्या रविवारी असाच काहीसा खेळ मॅकडोनाल्डमध्ये चालू होता. दरवाज्याजवळच्या पॅसेजमध्ये अशीच ती स्वत:ला लपवून बसली होती. जवळून दोन अठरा-वीस वर्षांची मुले गेटबाहेर पडत होती. ईतक्यात अचानक बॉम्ब फुटावा तशी ही किंचाळत उसळली. या अनपेक्षित प्रकाराने तिच्या जवळून जात असलेला मुलगा अक्षरश: अंग काढून दचकला.