Skip to main content

लंडनवारी - भाग २ - छोटालं गाव आणि मोठालं शेत

लेखक वेल्लाभट यांनी शनिवार, 01/10/2016 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
लंडनवारी: पूर्वतयारी - छोटालं गाव आणि मोठालं शेत डिस्क्लेमरः लंडनवारीच्या पूर्वतयारीचा भाग वाचून सहाजिक असं मत होताना दिसलं की हा लाईव्ह ब्लॉग आहे आणि प्रवास होत जाईल तसं त्याचं वर्णन येणार आहे. तसा माझा मानस होता खरं तर. आणि म्हणूनच पूर्वतयारीचा भाग मी लगेच लिहिला. परंतु पुढे प्रवासात लिखाणाला वेळ मिळाला नाही त्यामुळे यापुढील भाग हे मी प्रवासानंतर लिहिलेले असतील.

दीपशिखा-१. अग्निपुत्री डॉ. टेसी थॉमस

लेखक स्वाती दिनेश यांनी शनिवार, 01/10/2016 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या आधी- दीपशिखा . इस्टर्न व्हेनिस नावाने प्रसिध्द असलेल्या अलापुडा ह्या केरळमधल्या निसर्गरम्य गावामध्ये, एका रोमन कॅथोलिक कुटुंबात टेसीचा एप्रिल १९६४ मध्ये जन्म झाला. लहानपणापासूनच अभ्यासाबरोबरच खेळात आणि इतर अ‍ॅक्टिव्हिटिज मध्येही ती उत्साहाने भाग घेत असे आणि बक्षिसे, ट्रॉफीज,कप्सही जिंकून आणत असे. उत्तम बॅडमिंटन खेळणार्‍या टेसीला आपण बॅडमिंटन चँपियन व्हावे असेही वाटत असे.

काळरात्र (भाग ४) आयझँक असिमोव्ह

लेखक विचित्रा यांनी शनिवार, 01/10/2016 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
" तुम्ही हे सगळं एवढ्या ठामपणे सांगताय, कि हळूहळू माझाही विश्वास बसायला लागलाय." थरमॉन पुटपुटला. " मी तुझे लेख वाचलेत आणि काही अंशी सहमतसुद्धा आहे." शीरीन म्हणाला. " तसंच तूही आमची बाजू समजून घे." " मग माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या." " जरुर" " इथे नाही." अँटन गुरगुरला."माझ्या निरीक्षकांच्या कामात व्यत्यय नको." ते शेजारच्या कक्षात गेले. सतत भरपूर आणि शुभ्र प्रकाशाची सवय असल्यामुळे दूरवरच्या बीटा तार्याच्या मंद केशरी प्रकाशात उदासवाणं वाटत होतं. शिवाय गारवा वाढला होता. कुडकुडणार्या शीरीनने उत्तेजक पेयाची मागणी केली, पण अँटनने ती नाकारली. तो अजूनही थरमॉनकडे रोखून बघत होता.

किनवा (Quinoa) ढोकळा

लेखक रुपी यांनी शनिवार, 01/10/2016 07:33 या दिवशी प्रकाशित केले.
dhokla किनवा (Quinoa) हे प्रथिनांचे उत्तम स्रोत असलेले धान्य आहे. भरपूर प्रमाणात प्रथिने असलेल्या राजगिर्‍याच्याच कुटुंबातल्या या धान्याला आहारात जमेल तेवढ्या जास्त प्रमाणात समाविष्ट करण्याचा आजकाल बर्‍याच जणांचा कल असतो. आकाराने बाजरीच्या आणि रंग ज्वारीच्या दाण्यासारखा असा याचा दाणा असतो.

(रिहॅब चे दिवस भाग ६ )!!

लेखक वरुण मोहिते यांनी शनिवार, 01/10/2016 01:24 या दिवशी प्रकाशित केले.
बऱ्याच लोकांनी विचारलेलं व्यसनाच्या काळात काय झालं . खरं सांगू काही झालं नव्हतं कारण पैसे होते त्यामुळे काही आयडिया करून पैसे मिळवावे कुठेही बसून प्यावी असंही नव्हतं. पित असतानाही काम चालू होतं. प्रामाणिकपणे ते नोकरीला असो कि व्यवसायात . होणाऱ्या बायकोसोबत इथे आलो कि भारतभर फिरत होतो . व्यसन चालू असतानाही. वैयक्तिक मला काही नुकसान झालं नाही रिहॅब चे २ महिने सोडले तर . पण किती वेळा बायको विचारायची वरुण तू ठीक आहे. नीट वागतो. विश्वासही आहे. पण आमच्या मनात त्यावेळी हि फिरताना किती भीती असते माहित आहे का ? निरुत्तर व्हायचो तेव्हा . वेड्यात काढायचो तिला.

दीपशिखा!

लेखक स्वाती दिनेश यांनी शुक्रवार, 30/09/2016 23:53 या दिवशी प्रकाशित केले.
आजपासून शारदीय नवरात्राला सुरूवात होत आहे. घरोघरी घट बसले असतील. आदिशक्तीची आराधना वेगवेगळ्या पध्दतीने केली जाते. कोणी उपास करतात तर कोणी स्त्रीसूक्ताचे पठण करतात. नवरात्रीचा उत्सव हा आदिशक्तीचा, स्त्रीशक्तीचा उत्सव आहे. कोमल आणि कणखर अशा स्त्रीत्वाच्या दोन टोकांचा उत्सव आहे. नवरात्रात देवीच्या नऊ रुपांची पूजा करतात. असंही म्हणता येईल की ही नऊ रुपे म्हणजे नऊ वेगवेगळी क्षेत्रे, वेगवेगळी क्षितीजे! आज साहित्य, कला, शास्त्र, खेळ, राजकारण, समाजकारण आदि सर्वच क्षेत्रातला स्त्रियांचा सहभाग नुसताच उल्लेखनीय नाही तर त्या त्या क्षेत्रातले एव्हरेस्ट गाठण्याचा पराक्रमही अनेक सौदामिनी करत आहेत.

२ ऑक्टोबर ठाणे-मुंबई कट्टा

लेखक टवाळ कार्टा यांनी शुक्रवार, 30/09/2016 23:47 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या पेठकरकाका मुंबई दौऱ्यावर असल्याने येत्या रविवारी म्हणजे २ ऑक्टोबरला संध्याकाळी कट्टा करण्याचे ठरले आहे कट्ट्याचे ठिकाण - Hotel Ambrocia घोडबंदर रोड, ठाणे व बोरिवलीच्या मध्येच कारण पेठकरकाका दहिसरहुन येणार आहेत कट्ट्याची वेळ - संध्याकाळी ६:३० पासून पुढे अधिक माहितीसाठी कट्टा आयोजक मामालेदारचा पंखा यांच्याशी संपर्क करावा

Isle of Wight

लेखक अश्विनी वैद्य यांनी शुक्रवार, 30/09/2016 21:26 या दिवशी प्रकाशित केले.
Isle of Wight सलगच्या तीन आठवड्याच्या पावसाच्या पिरपिरीने अगदी वैताग आला होता तेव्हा अचानक दोन दिवसांनंतर येणारा विकांत सूर्यदर्शनाने उजळून निघणार आहे असे weather app ने दाखवले, तेव्हा लागलीच बुकिंग केले आणि गेल्या शुक्रवारी संध्याकाळी Isle Of Wight या British Island कडे जायचे पक्के झाले. तसे आम्ही South Of England मध्येच असल्याने राहत्या ठिकाणापासून साधारण तासाभराच्या अंतरावर असलेल्या इंग्लिश खाडीमध्ये दिसणाऱ्या या Island वर जाणे फार काही कष्टाचे नव्हते.

बौद्धधर्मप्रसारक... भाग-६ शेवटचा.

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 30/09/2016 19:10 या दिवशी प्रकाशित केले.
‘‘ फो ’’ बुद्धाचे चिनीभाषेतील नाव व चिनीलिपीतील त्याचे चिन्ह. Simple, Free Image and File Hosting at MediaFire बौद्धधर्मप्रसारक... भाग-१ बौद्धधर्मप्रसारक... भाग-२ बौद्धधर्मप्रसारक... भाग-३ बौद्धधर्मप्रसारक...