Skip to main content

दाब चिकन बिर्याणी

लेखक केडी यांनी बुधवार, 15/06/2016 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
Dab Chicken Biryani दाब चिंगडी (ह्याची रेसिपी इथेच कोणीतरी टाकलेली आहे) हा एक बेंगाली पदर्थ. शहाळ्यात (दाब) च्या आत चिंगडी (श्रिम्प/प्रांन्स) शिजवलेलं हि एक पाककृती . वायझाग/विशाखापट्ण्म जवळील अर्राकू येथील आदिवासी, अश्याच पद्धतीची एक पाककृती बनवतात - बोन्गुलो चिकन. हिरव्या बांबू च्या आत मध्ये मसाला लावलेला चिकन कोळश्यावर भाजून. हे दोन्ही प्रकार एकत्र करून, मी केलेला हा प्रयत्न. अर्थात हि पाककृती कोळश्यावर केली तर अजून चविष्ट होईल. साहित्य २ शहाळी ,आतील पाणी आणि मलई/खोबर काढून (वरचा भाग/झाकण पण ठेवून घेणे. नारळ पाणी सुद्धा जपून ठेवणे) ४०० ग्रॅम चिकन चे तुकडे (बोनलेस सुद्धा चालू शकतील, पण मग ब्रेस्ट ऐवजी थाय घेणे) १०० ते २०० ग्रॅम बासमती तांदूळ (हा भिजवायचा नाहीये) १ ते २ मोठे चमचे गरम मसाला किंवा बिर्याणी मसाला पावडर १ ते २ मोठे चमचे काश्मिरी लाल मिरची पावडर १ मोठा चमचा हळद पावडर २ मोठे चमचे आलं, लसुण, हिरवी मिर्ची ची पेस्ट ३ ते ४ हिरव्या मिरच्या ४ ते ५ मोठे चमचे चिरलेली कोथिंबीर ४ ते ५ मोठे चमचे चिरलेला पुदिना (ताजा नसेल तर वाळलेला चालेल) २ मध्यम आकाराचे कांदे, उभे चिरून २ ते ३ मोठे चमचे तूप (किंवा तेल) ६ ते ८ हिरवे वेलदोडे २ काळे वेलदोडे २ दालचिनी च्या काड्या २ तमालपत्र १ लिंबू मीठ, चवीनुसार मळून घेतलेल्या कणकेचे २ गोळे सजावटीसाठी तळलेला कांदा तळलेले काजू Ingredients कृती आलं, लसुण, हिरवी मिर्ची ची पेस्ट, चिरलेली कोथिंबीर, चिरलेला पुदिना पाणी न वापरता मिक्सर मधून बारीक करून घ्या. चिकन स्वच्छ धुऊन त्याला लिंबाचा रस, १ चमचा मीठ आणि वाटलेला १ चमचा मसाला, १ चमचा गरम मसाला, १ चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा हळद पावडर लावून, चिकनच्या मिश्रणात उभा चिरलेला कांदा आणि १ चमचा तूप घालून सगळ व्यवस्थित कालवून घ्या. साधारण ३० मिनिटे ते १ तास हे मिश्रण मुरत ठेवा. Chicken तांदळाला, उरलेला वाटलेला मसाला, तूप, गरम मसाला, मिरची हळद पावडर, मीठ लावून, व्यवस्थित तांदूळ कालवून घ्या. Rice1 Rice2 चिकन आणि तांदूळ मिश्रणाचे २ भाग करून घ्या. प्रत्येक शहाळ्यात एक भाग चिकन, निम्मा खडा मसाला (वेलदोडे, तमालपत्र, दालचिनी), आणि निम्म्या हिरव्या मिरच्या टाकून, मग एक भाग तांदूळ मिश्रण घालावं. तांदूळ भिजतील इतपत पाणी घालावे. जास्ती दाबून भरू नये! इथे पाण्यात थोडा शहाळ्याच पाणी मिसळून घातलत तर एक वेगळीच चव येते. Coconut1 शहाळी वरच्या तुकड्याने बंद करून, वरून कणकेने शीलबंद करून घ्यावी जेणेकरून वाफ बाहेर पडणार नाही. Coconut2 ओवन १८० ला प्रि -हिट करून, शहाळी ओवन मध्ये ठेवावीत. साधारण एक ते दीड तास शहाळी ओवन मध्ये बेक करावी. (हि वेळ तुमच्या ओवन प्रमाणे ठरेल). अधून मधून चेक करत रहाणे. साधारण ६० ते ८० मिनिटांनी चिकन आणि तांदूळ शिजल्या च्या वासाने कळेल कि पाककृती तयार आहे. Coconut3 शहाळी बाहेर काढून, १० मिनिटे ठेवावी. अलगद हाताने कणिक बाजूला करून, उघडावी (आता वाफ असल्याने जपून उघडावी), आणि बिर्याणी ताटात काढून वरून तळलेला कांदा व काजू पेरून पेश करावी! Coconut4 Coconut5 ओवन ऐवजी, बार्बेक्यू किंवा कोळश्यावर शहाळी ठेवली तर चव अजून छान येईल! पाककृती चवीला छान आहेच, पण दिसते तेवढी अवघड अजिबात नाही! एकदा अवश्य करून बघा!

वाचने 14369
प्रतिक्रिया 28

प्रतिक्रिया

ऐकुन होते ह्या पाकृविषयी. छान चित्ररुपी लिहिली आहे. :)

साहित्य २ शहाळी ,आतील पाणी आणि मलई/खोबर काढून (वरचा भाग/झाकण पण ठेवून घेणे. नारळ पाणी सुद्धा जपून ठेवणे)
पण तुम्ही शहाळ्याचे ओपनिंग १-२ इंच ठेवून आतली मलई काढली कशी ? मलई पाहिजे म्हटल्यावर, आमचे नारळवाले आण्णा, नारळाचे उभे दोन तुकडे करून, मलई काढतात …

In reply to by पगला गजोधर

हाच प्रश्न पडालाय. मागे दाब चिंगडीचे शाकाहारी व्हरजन बनवुन पाहु म्हणुन शहाळे आणायला गेले तर ते म्हणे की मलई हवी असेल तर नारळ फोडावा लागेल. तरी त्या बाईने शाळ्याचे तोंड जरा मोठे करुन दिले आणि म्हणे आता घरी जाऊन करा काय प्रयोग करायचेत ते. (ह्याच्यात मी भाजी करणारे म्हणल्यावर ती आधीच वेडी झाली होती!!) पण रेसेपी मात्र लाजवाब आहे!

In reply to by पिलीयन रायडर

पातळ मलईचं शहाळं घ्यायचं. लांब दांड्याचा चमचा तीनचतुर्थांश लांबीला वाकवून ती मलई काढून घ्यायची.

In reply to by sagarpdy

....चिकन ऐवजी खालील भाज्या वापरा १. मटार २. गाजर, चिरलेला ३. बटाटे, सालं काढून उभे चिरलेले ४. फ्लावर ५. मुश्रूम, आवडत असल्यास भाज्या कच्च्या वापरल्या तरी हरकत नाही, किंवा थोडा वेळ (एक मिनिट) गरम पाण्यातून उकळून (ब्लांच) करून घेणे (मश्रूम सोडून).ओवन मध्ये ५० मिनिटे ते एक तास पेक्षा जास्ती वेळ नाही लागणार. बाकी पाकृ लिहिल्या प्रमाणे. करून बघ.

वो केदार भौ, निस्ती जळजळ झाली.....! आता मी येणार, पुण्याला जरूर येणार.

वो केदार भौ, निस्ती जळजळ झाली.....! आता मी येणार, पुण्याला जरूर येणार.

शाकाहारी बिर्याणी देखील उत्तम होऊ शकेल असे वाटते! (एक सूचना - सगळ्या साहित्याचे फोटो स्वतंत्रपणे काढून पदार्थाच्या पायर्‍यांचे फोटो थोडे नीटनेटके आणि स्वच्छ दिलेत ना तर वाचायला अतिशय सुंदर वाटतं. शेफ गणपाभौंच्या पाककृती या उदाहरण म्हणून बघू शकता. उदा. आंब्याचा बदामी हलवा.)

In reply to by चतुरंग

मी सविस्तर पाककृती माझ्या स्वतःच्या वेबसाइट वर इंग्रजीत टाकलेली आहे. मिपा वर बाहेरील दुवा टाकण्यास मनाई आहे, म्हणून आपल्याला व्यक्तिगत संदेश टाकून दुवा दिलेला आहे.आपल्याला वेळ मिळेल तेव्हा साईट ला भेट जरूर देणे!

In reply to by केडी

नक्कीच बघेन तुमची वेबसाईट! पुढीला पाकृसाठी शुभेच्छा! :)

मला सुरुवातीला हे शीर्षक म्हणजे आज्ञा किंवा आवाहन वाटलं. मग धागा उघडल्यावर उलगडा झाला. मी त्याचा उच्चार 'डाब' असा ऐकला होता. पाकृ खलासच आहे, फोटो बिटो अफाटच. मला कल्पनाच आवडली शहाळ्यात घालून शिजवायची. करून बघणार मी हे.

आपण मृणालिनीच्या धाग्यावरच म्हणलं होतं. ह्येच्यावर भाताचा आयटम खतरी होणार म्हणून. आलीच जबरी डिश. भारीच

.....एकदा हिरवा बांबू आणून त्यात चिकन शिजवून बघायचंय। जमलं तर त्याची पण छायाचित्रे टाकेन इथे।

एकदम मस्त पाकृ. आता हे सुद्धा एकदा करुन बघायला पाहिजे, पण इथे शहाळे मिळत नाही. त्यामुळे पुढच्या भारतवारीची वाट बघायला लागेल. हि माझ्या दाब चिंगरीच्या पाकृची लिंक. - http://misalpav.com/node/35136

मस्त पाकृ! स्वाती