पेला अर्धा भरला आहे.. पेला अर्धा सरला आहे... पाडगावकरांच्या या कवितेतले भाव इतके कालातीत आहेत की बास! आणि क्षणोक्षण त्याचा प्रत्यय येत राहतो. शंभर व्यक्ती भेटतात, शंभर गोष्टी कानावर पडतात. नाव, गाव, चेहरा, व्यवसाय या पलिकडची माणसाची एक ओळख असते ती म्हणजे त्याचा विचार. त्याला दृष्टिकोन म्हणा, स्वभाव म्हणा, किंवा अॅटिट्यूड म्हणा इंग्लिशमधे. हा अॅटिट्यूड माणसाची खरी ओळख करून देतो, तोच माणसाला घडवतो किंवा बिघडवतो. बाकी सगळं दुय्यम असतं.
संकटं, अडचणी सगळ्यांनाच येतात. काही त्यात खचतात, काही त्यातही रचतात, काही विरतात, काही उरतात, काही पडतात, काही घडतात. अॅटिट्यूड. परवा याच अॅटिट्यूडचं एक लाजवाब उदाहरण बघायला मिळालं. बघायलाच नव्हे, त्याच्याशी बोलायला मिळालं. मुलाला टांग्यात बसवायला घेऊन गेलो असता, सवयीनुसार टांगेवाल्याची विचारपूस केली आणि मातीत सहज हात घातल्यावर एखादं रत्न हाती लागावं तसं झालं.
नंदकुमार असं त्या घोडेवाल्यांचं नाव. माणूस तसा वयस्कर आहे. दिवसाला पाच ते सहा फेर्या मिळतात, आणि सहाशे सातशे रुपये घरी नेता येतात. 'इतक्यात भागतो घोड्याचा खर्च बिर्च?' असं विचारल्यावर ते म्हणाले, 'इच्छा असेल ना, तर सगळं शक्य होतं.'
नंदकुमारांकडे एक नाही, दोन घोडे आहेत. एक हा चॉकलेटी आणि एक पांढरा आहे. तो लग्नामुंजीला जातो. ते गेली पस्तीस वर्षं टांगा चालवत आहेत. 'पूर्वी चार आण्यात स्टेशन ते टेंभी नाका आणायचो, आता तुम्हाला चार आणे माहितही नसतील.', असं म्हणत ते आठवणीत रमले. 'मी रेल्वेत कामाला होतो. परिस्थिती अतिशय बेताची. पण रेल्वेची डुटी संपली की उरल्या वेळात टांगा चालवायला लागलो. आता रिटायर्ड आहे. पेन्शन येतंय. पण टांगा चालवतो अजूनही. सवय झालीय, सुटत नाही आणि त्रासही होत नाही. मुलं म्हणतात, कशाला आता हे करताय? आराम करा... पण तरीही करतो. मन रमत नाही याशिवाय.'
मी यातच प्रेरित झालो होतो पण पुढे अजून भारी माहिती कळायची होती. 'मुलं काय करतात?' मी विचारलं. 'एक लंडन ला असतो; आणि दुसरा दुबईला.' हे उत्तर ऐकलं आणि मला पुढे काय विचारावं हेच कळेना. फक्त हँडशेक केला त्यांना. त्यांची ही थक्क करणारी घोडदौड ऐकून मी अवाक झालेलो होतो. त्यांचंच वाक्य घोकत होतो, 'इच्छा असेल ना, तर सगळं शक्य होतं.'
हेच सिद्ध करणारा एक रिक्षावाला मागे भेटला होता. ठाण्याहून अंधेरीला कुठल्याशा मिलमधे कामाला जाणार्या त्याने कर्ज काढून रिक्षा घेतली. दूरदृष्टी वाखाणण्याजोगी होती त्याची. रिक्षामुळे त्याची जायची यायची सोय झाली. ठाण्यावरून सकाळी भाडं घेऊन तो जातो, दिवसभर दुसर्या एकाला रिक्षा भाड्याने चालवायला देतो, आणि येताना पुन्हा भाडं घेऊन ठाण्याला येतो. आहे त्या परिस्थितीत त्याने दुसरा भक्कम उत्पन्नस्त्रोत तयार केला; हो तयार केला, याला शोधणं म्हणता येत नाही. टांगेवाल्यासारखंच हे उदाहरण. आमच्या कंपनीतला कँटीनबॉय संध्याकाळी कपड्यांचा स्टॉल लावतो. त्याचाही तोच फंडा. हातपाय हलवत रहायचे. क्रिएटिंग ऑपॉर्च्युनिटीज. अनेक उदाहरणं ठाऊक आहेत आणि या मंडळींशी बोलून फार उत्साह येतो, उमेद येते.
या उलट अशी अनेक जणं माहितीत आहेत, ज्यांनी गरिबी, कंपनी बंद पडणं, जवळची व्यक्ती जाणं, योग्य संधी न मिळणं, लग्न न होणं, इत्यादी अनेक कारणांमुळे आपल्या आकांक्षा, इच्छांचा कप्पाच बंद करून टाकला. जिद्द बिद्द फंडेच झुगारून दिले आणि उरलेलं आयुष्य निव्वळ वैफल्यग्रस्त राहण्यात आणि इतरांना करण्यात घालवलं; घालवतायत. त्यांचं वाईटही वाटतं, पण चूकही वाटतं. They seal their own fate.
असो. पहिल्या कॅटेगरीतली माणसं नियमित भेटत राहूदेत अशीच मी नेहमी इच्छा करतो. It keeps you pushing towards your goals.
ता.क. ठाण्याला तलावपाळीला मागे 'नंदकुमार' लिहिलेला टांगा दिसल्यास एक फेरी जरूर मारा असं सुचवेन.
याद्या
12221
प्रतिक्रिया
66
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त हो...
ओहके
मस्त, मला असे व्यवसाय
क्लास! रियली.
In reply to मस्त, मला असे व्यवसाय by अभ्या..
लेखाइतकाच सुंदर प्रतिसाद.
In reply to मस्त, मला असे व्यवसाय by अभ्या..
मस्त
छान लेख.
अपुर्वा ती माणसे वगैरे भेटणे
धन्यवाद प्रमोद देर्देकर
In reply to अपुर्वा ती माणसे वगैरे भेटणे by प्रमोद देर्देकर
ठाण्यात बग्गिला टांगा म्हणतेत
In reply to धन्यवाद प्रमोद देर्देकर by वेल्लाभट
+१
In reply to ठाण्यात बग्गिला टांगा म्हणतेत by अभ्या..
मी पुण्यात
In reply to +१ by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
ठाण्यात बग्गी आणि टांगे
In reply to ठाण्यात बग्गिला टांगा म्हणतेत by अभ्या..
+१
In reply to अपुर्वा ती माणसे वगैरे भेटणे by प्रमोद देर्देकर
लेखन आवडले. खरच जिद्दीची
:)
मस्त लेख
उमदी माणसं!
येस!
चांगलं जीवन जगताहेत.स्वत:साठी
जबरदस्त माणसे. अशी माणसे
काहीच्या काही!!!!!!!!!
In reply to जबरदस्त माणसे. अशी माणसे by खटपट्या
सहीच
मस्तच!
आमच्या हापिसात एक अॅडमिन असिस्टंट आहे
अतिशय सकारात्मक धागा.
सुंदर धागा ! अशी केवळ
+१००
In reply to सुंदर धागा ! अशी केवळ by डॉ सुहास म्हात्रे
आवडली त्या माणसाची जिद्द!
या निमित्ताने इतर अनेक अशी
लेख आवडला आणि प्रतिसादही. अशी
एक जोशी काका
१ नंबर रे. मस्त अनुभव आणि
In reply to एक जोशी काका by समीरसूर
+१
In reply to १ नंबर रे. मस्त अनुभव आणि by आदिजोशी
_/\_
In reply to एक जोशी काका by समीरसूर
_/\_
In reply to एक जोशी काका by समीरसूर
या काकांना, लेखातल्या
In reply to _/\_ by जिन्गल बेल
अरे वा! क्या बात है!!
In reply to एक जोशी काका by समीरसूर
+1
In reply to अरे वा! क्या बात है!! by चतुरंग
सह्हीच! ह्या काकांचा नंबर
In reply to एक जोशी काका by समीरसूर
व्यनि केला आहे आपल्याला.
In reply to सह्हीच! ह्या काकांचा नंबर by यशोधरा
सुंदर प्रतिसाद ! स्पृहणिय
In reply to एक जोशी काका by समीरसूर
प्रेरणेसाठी नेहमी आभाळाएवढ्या माणसांकडेच पाहण्याची गरज नसते. आपल्या आस-पासच जगण्याची अशी स्वच्छ आणि सकारात्मक नजर देणारे बरेच असतात!+१०००वेल्लाभटबुवा
धन्यवाद चौराकाका. आवडतं मला.
In reply to वेल्लाभटबुवा by चौकटराजा
+१ चौराकाका!
In reply to वेल्लाभटबुवा by चौकटराजा
प्रतिसाद पटला...आवडला!
In reply to वेल्लाभटबुवा by चौकटराजा
लेख आणि प्रतिसाद दोन्ही _/\_
एकदम सकारात्मक!
खूप छान धागा.
जबरदस्त असतात अशी माणसे ,एक
इच्छा तिथे मार्ग आणि पेला
जॅाय राइड
मस्त धागा. एकसे एक लोकं आहेत
क्रिएटिंग ऑपॉर्च्युनिटीज
मस्त धागा अन् प्रतिसाद पण
फार सुंदर लेख आणि प्रतिसाद.
मस्त !
सर्वांना अनेक धन्यवाद :) इथे
छान लेख
"थुंक देना उसके मुंहपर जो
In reply to छान लेख by सिरुसेरि
लेखन आवडले.
सुन्दर लेख आणि प्रतिसाद.
आवडले
+१
In reply to आवडले by पैसा
अतिशय सुंदर
सगळ्यांचेच आभार ! :)