Skip to main content

इंडिपॉप - ९० चे दशक !

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी सोमवार, 26/09/2016 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
गोरी तेरी आँखें कहें रातभर सोई नहीं ......... माईरी याद वो आई !..... मेड इन इंडिया ........ आँखों में तेरा ही चेहरा .... तुम्ही विचार करत असाल ना की आज अचानक मला असा काय झालंय आणि मी ही गाणी एकामागून एक का म्हणायला लागलोय....... पण त्याला कारण आहे... ही आणिक अशी कितीतरी गाणी जी अंतर्मनात कुठेतरी ठसली आहेत ती काही केल्या डोक्यातून जात नाहीत ....... आजच्या धांगडधिंगा असणाऱ्या आणि अळवावरच्या पाण्यासारख्या संगीताच्या काळात आवर्जून सतत आठवणीत येणारी गाणी म्हणजे इंडिपॉप संगीत आणि तेही खास ९० च्या दशकातलं !

मी एक ढग - एकटाच ...... !!!

लेखक फिझा यांनी सोमवार, 26/09/2016 15:09 या दिवशी प्रकाशित केले.
मी एक ढग - एकटाच ...... !!! सखे सोबती जरी कितीक गर्दी गडगडणाऱ्या त्या ढगांची वर्दी कधी चिंब ओल्या पावसात कधी लख्ख कोरड्या उन्हात तरी , मी फिरतो, हसत जगतो, असतो एकटाच !! मनात माझ्या जुनेच सवंगडी नव्या देशातले जरी वारे सभोवती कधी हर्षुन जाई तर कधी उदास ना कसली खंत ना कसली आस तरी , मी फिरतो, हसत जगतो, असतो एकटाच !! नकळत देतो जीवा दिलासा स्वतःच गिळून घेतो उसासा वाऱ्याविना ही फिरतो उगाच ना जाणतो वाट जुनी कि नवी आज तरी , मी फिरतो, हसत जगतो, असतो एकटाच !!

मदत हवी आहे - वेळणेश्वर

लेखक अमृत यांनी सोमवार, 26/09/2016 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, दसर्‍याच्या सुट्ट्यात वेळणेश्वरला जाण्याचा बेत आहे. राहाण्याची सोय महाराष्ट्र पर्यटन विकास महामण्डाळाच्या हॉटेलात केली आहे. एकूण चार दिवसाची सहल करणार आहोत. त्यातील दिवस १ व ४ हे प्रवासातच जातील तरी उर्वरीत २ दिवसात काय काय बघता येइल. एकूण २ कुटुन्ब आहोत व २ लहानगे (वय ५ व २.५) तरी कृपया मार्गदर्शन कारावे. १. पुण्यावरून जाताना जास्त सोयीस्कर रस्ता कोणता? (ताम्हीणीतून दोनदा कोकणात उतरलो आहे पण या वर्षी ऑगस्ट महिन्यात ताम्हीणी सहलीत रस्त्याची झालीली दुर्दशा बघून शक्यतोवर तो टाळायची इछा आहे.) २. सातारा मार्गे गेल्यास रस्त्यात जेवणासाठी काही चान्गली ठिकाणं? ३.

साम दाम दंड भेद

लेखक राजेंद्र देवी यांनी सोमवार, 26/09/2016 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
साम दाम दंड भेद आमच्या घामाला दाम नाही हे रामा, आता जगण्यात राम नाही किती हि कष्ट केले तरी कनवटीला छदाम नाही नियतीला पण काही ना वाटे परिस्थितीशी साम नाही अहोरात्र धडपडतो पण वेदनेला बाम नाही भरल्या गोकुळात भरकटतो भेटत अजून श्याम नाही गतजन्मीच्या कर्माचा दंड हा ह्यात काही भेद नाही जगण्याशिवाय तरी आता या जगात दुसरे काम नाही राजेंद्र देवी

इनिग्मा

लेखक आबा यांनी सोमवार, 26/09/2016 00:07 या दिवशी प्रकाशित केले.

अनाठाई

लेखक सुमित_सौन्देकर यांनी रविवार, 25/09/2016 19:00 या दिवशी प्रकाशित केले.
निशाचर ह्रिदयाला, जाग या जन्माची जुडली कित्येकदा ही जणू... निद्रेची नशा सारून गेली अबोला थोडासा... आणि निराशेच्या सानिध्यात जगतो दिवस बाकी ... आतल्याआत घुटमळण्यात जातो बेधुंध होता कोणे एके काळी... आपल्याच ठोक्यांसवे आता हरवतो... शोधतो... अनोळखी स्पंदने उजाडता लागतो वेध तारकां परतण्याचा चंद्राच्या प्रकाशात छंद ... सूख वेचण्याचा विरळ होणारे छापिल नाव जपण्याची धडपड जरा कुठे पुसटता रेघ... अवेळी धडधड तिच स्पंदने , श्वासांची घालमेल हवीशी ठोका चुकावा पून्हा एकदा... भेटण्यापूर्वी शेवटाशी