Skip to main content

Internet वरील आवडलेले काहीबाही (विनोदी)

लेखक जव्हेरगंज यांनी मंगळवार, 17/01/2017 21:11 या दिवशी प्रकाशित केले.
Internet वरील आवडलेले काहीबाही (विनोदी) मायाजालात जेवढे खोदकाम करु तेवढे काही अद्भुत नमुने भेटत राहतात. ( photo, video, GIF, किंवा text सुद्धा.) पोट धरुन हसायला लावणारे काही नमुने मी इथे डकवत आहे. तुम्हाला आवडलेले काहीबाही तुम्ही डकवाल याच्या अपेक्षेत. [ इशारा : लिंकमधला मजकूर आक्षेपार्ह असू शकतो. ] १.The joy of discovery http://i.imgur.com/WShmo.gif "ये साल्या, बघतोच, तुझ्या तर.." "ये थांब" "थांब बिंब काय नाय, तुझ्या तर.." "ये खरंच, उडी मार.." "क्काय??" "उडी मार... " "च्यायला..." २.

(कुणाच्या फांदीवर कुणाची आर्ची)

लेखक स्वामी संकेतानंद यांनी मंगळवार, 17/01/2017 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
अत्यंत अर्थहीन, स्वैर आणि अजागळ विडंबन सादर आहे! कुणाच्या फांदीवर कुणाची आर्ची? कशासाठी चढवावे टेकू देऊन? झाड होते कुणासाठी मूळ रोवून? जमतात येथे कुणी मुव्हीज बघून! तरी कशी आणतात घरातुनी खुर्ची? लोक सारे येती येथे बुलेटवरून वृक्ष जाती वजनाने वाकून झुकून फांदीवर घेती सेल्फी झोकून झोकून म्हणती हे वेडे पीर, 'चढू फांदी वरची!' अंत झाला फोटोसाठी, जन्म एक सेल्फी पारध्याची वाणी म्हणजे बेचवच कुल्फी फांदी तीच परी तिची पडे गड्या ढलपी परश्यापरी आयुष्य हे फांदीमुळे खर्ची - स्वामी
काव्यरस

सूर्य नमस्कार यज्ञ

लेखक खग्या यांनी मंगळवार, 17/01/2017 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिकेत दर वर्षी जानेवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात सूर्यनमस्कार यज्ञ केला जातो. याचा प्रमुख उद्देश लोकांमध्ये योग आणि सूर्यनमस्कारांविषयी जागरूकता वाढवणे आणि अधिकाधिक लोकांना तब्येतीची काळजी घेण्यासाठी उद्युक्त करणे असा आहे. कोण आयोजित करत? सूर्यनमस्कार यज्ञ हिंदू सेवा संघातर्फे आयोजित केला जातो. हिंदू सेवा संघ हि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाप्रमाणेच लोकहिताला वाहिलेली एक संस्था आहे. हिंदी स्वयंसेवक संघाच्या अनेक शाखा जगभरात लागतात. बऱ्याचश्या शाखा शनिवारी अथवा रविवारी लागतात. आपल्याशी संलग्न लोकांना एकत्र आणून उत्तम विचारांची देवाणघेवाण व्हावी असा शाखांचा उद्देश असतो.

घेई छंद!

लेखक सिंधू वडाळकर यांनी मंगळवार, 17/01/2017 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
माणसाला अनेक छंद असतात. कुणाला वाचनाचा, कुणाला लिहिण्याचा, कुणाला झाडे लावण्याचा, कुणाला पशुपक्षी पाळण्याचा. छंदाशिवाय जीव म्हणजे सुकाणूशिवाय होडी होय. मला अनेक छंद आहेत आणि ते मी आजपर्यंत जोपासले आहेत. मानवी जीवनात अध्यात्माला अनन्यसाधारण महत्व आहे. श्रद्धेविना जीवन रुक्ष आहे. याला कारण म्हणजे लहानपणापासून मी घरातील अध्यात्मिक वातावरणात वाढले. माझ्या वडिलांना अध्यात्माची खूप गोडी होती. "जीवनात कुणाचेही मन विनाकारण दुखवू नये. कुणाचाही द्वेष, मत्सर करून नये. मन शुद्ध असावे. मग त्या मनात ईश्वराचे प्रतिबिंब पडते!" असे ते सांगत. रात्री वडील आम्हाला रामायण व महाभारतातील गोष्टी सांगत.

चिमणी

लेखक तिरकीट यांनी मंगळवार, 17/01/2017 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
अर्धी बोबडी चिमणी हाक डोळ्यांमधली चिमणी झाक अधुनमधुन फेंदारलेले नकटे नकटे चिमणे नाक....... चिमणे तोंड, चिमणे केस चिमणे हात, चिमणा वेश काही कारण नसतानाही रागवण्याचा चिमणा आवेश तुझे मन चिमणे चिमणे असेच फुलवत राहेन मी दोघेही राहु अगदि असेच.... चिमणी तु, चिमणा मी.....

बोहनी...

लेखक चिनार यांनी मंगळवार, 17/01/2017 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
नंद्या सकाळपासून खुशीत होता. आजपासून त्याला नवीन काम मिळालं होतं. राजाभाऊंकडून एक रिक्षा त्याने भाड्याने चालवायला घेतली होती. नंद्या तसा मेहनती,अंगापिंडाने मजबूत गडी. आजवर कधी हमाल,कधी बांधकामावरचा मजूर, कधी रंगरंगोटी कामगार असे बरेच कामं त्याने केले होते. पण महिन्याभरापासून नंद्या घरीच होता. बांधकामावर मिस्त्रीशी झालेल्या मारामारीनंतर नंद्या दहा-बारा दिवस जेलमध्ये होता. तिथून सुटल्यावर त्याला काहीच कामं मिळालं नाही. बायको चार घरी धुणीभांडी करायची म्हणून जेमतेम निभत होतं. नंद्या खिन्न मनाने घरात स्वतःला दोष देत बसायचा.

पानिपतात झालेले अब्दालीचे नुकसान

लेखक shantanu Paranjpe यांनी मंगळवार, 17/01/2017 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्याच तारखेला काही वर्षांपूर्वी भारत इतिहासातला एक मोठ युद्धसंग्राम झाला आणि त्याचे भारताच्या इतिहासावर दूरगामी परिणाम झाले. पण या युद्धात मराठे प्राणपणाने लढले आणि अमर झाले.

गोष्ट गरम.. गोष्ट गरम.. गोष्ट गरssssम!!

लेखक टुंड्रा यांनी मंगळवार, 17/01/2017 08:19 या दिवशी प्रकाशित केले.
*/

‘गोष्ट तशी छोटी’साठी गोष्टी लिहिणार्‍या माणसाशी बोलायला हवं असं फार फार वाटत होतं. त्यातही खासकरून आपल्याला रोज भेटणार्‍या मालिकांच्या किंवा सिनेमांच्या लेखकाशी बोलता आलं तर काय बहार येईल, असेही खयाली पुलाव पकवणं चालू होतं. गंमत म्हणून ‘मधुगंधा कुलकर्णीं’ना हळूच फेसबुकवर मेसेज टाकला. त्यांना रोज शेकड्याने मेसेज येत असतील, आपल्याला कोण विचारणार म्हणून त्याबद्दल विसरूनही गेले.

सिनेमा नावाचे हत्यार

लेखक पिंपातला उंदीर यांनी मंगळवार, 17/01/2017 08:11 या दिवशी प्रकाशित केले.
*/

सिनेमा नावाचे हत्यार A आपली मांड पक्की बसवण्यासाठी अमेरिकेने आपल्या 'सॉफ्ट पॉवर'चा पुरेपूर वापर केला आहे. 'सॉफ्ट पॉवर' ही संकल्पना सर्वप्रथम जोसेफ नॉय या अमेरिकन अभ्यासकाने मांडली. कोणतीही आर्थिक आणि लष्करी ताकद न वापरता राजकारणातली उद्दिष्टे साध्य करण्याची एखाद्या देशाची क्षमता म्हणजे 'सॉफ्ट पॉवर.

चित्रकथी

लेखक विशेषांक यांनी मंगळवार, 17/01/2017 08:07 या दिवशी प्रकाशित केले.
*/

अ‍‍ॅरि फिल्म्सचे हे एक ड्रीम प्रोजेक्ट होते. आपल्या 'गोष्ट तशी छोटी'साठी ही फिल्म त्यांनी आपल्या डेडलाइनमध्ये बनवली, जेणेकरून ती पहिल्यांदा ह्या व्यासपीठावर प्रदर्शित व्हावी. तेवढ्याकरिता खास धर्मावरमला दोन दिवस मुक्काम ठोकून ही फिल्म चित्रित केली गेली. तेलगू मित्रमैत्रिणींची मदत घेऊन .. रात्री उशिरापर्यंत जागून युद्धपातळीवर भाषांतर झाले.