Skip to main content

एस्टी विश्व प्रदर्शन -२०१७

लेखक औरंगजेब यांनी शुक्रवार, 13/01/2017 09:29 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर मंडळी एक अनोखै प्रदर्शन सध्या उपवन आर्ट फैस्टिवलमध्ये चालु आहे. ते म्हणजे एस्टी विश्व प्रदर्शन. एसटीची विविध मोडेल्स, संग्रहित तिकिटे, तक्रार वह्या , वाहकाच्या नोंदवह्या आदि सामान्य प्रवाशाला कधी न बघायला मिळणाऱ्या गोष्टी मांडून ठेवल्या होत्या. तसेच एसटीची कागदी मोडेल्स १:१०० ह्या प्रमाणात बनवून ठेवली होती. त्यामध्ये आपला लाल डब्बा पासून शिवनेरी पर्यंत आणि बेडफोर्ड च्या पहिला बस पासून नवीन वोल्वो बस पर्यंत मोडेल्स बघायला आणि विकायला ठेवली आहेत. सदर प्रदर्शन १५ जानेवारी पर्यंत चालू आहे. त्याचा अवश्य लाभ घ्यावा,

लॉलीपॉप - २

लेखक रातराणी यांनी शुक्रवार, 13/01/2017 09:07 या दिवशी प्रकाशित केले.
लॉलीपॉप - १ दुसऱ्याच दिवशी माझ्या डेस्कवर एक जार स्थानापन्न झाला. रंगीबेरंगी लॉलीपॉपने भरलेला. त्यानंतरचा पूर्ण आठवडा मी अद्विकाची फाईल पुन्हा पुन्हा वाचली. न जाणो एखादा दुवा निसटला असेल तर तो लक्षात येईल या आशेने. आदू येणार होती त्यादिवशी मी आठवणीने दुकानातून फुलं आणली. ती आधी बसली होती, त्या खुर्चीतून दिसतील अशा जागी एका कपाटावर फुलदाणीमध्ये ठेवली. यावेळेस मुद्दामचं खिडकीचे पडदे उघडले. कृत्रिम प्रकाश शक्य तेवढा कमी केला. रूममध्ये काय केल्याने एका चार वर्षांच्या मुलीला छान वाटेल तसे बदल केले.

दक्षिण घळ भाग ४

लेखक ज्योति अळवणी यांनी गुरुवार, 12/01/2017 23:41 या दिवशी प्रकाशित केले.
दक्षिण घळ भाग १ दक्षिण घळ भाग २ दक्षिण घळ भाग ३ दक्षिण घळ भाग ४ दाजींच्या मस्तकात तिडीक गेली . ते यशवंतावर धाऊन गेले. परंतु उतार वयातली त्यांची शक्ती आणि तारुण्यात पाय ठेवणाऱ्या यशवंताची शक्ती यात फरक तर होताच. त्यात बरोबर असलेल्या पोलिसांनी दाजीना धरले. दाजींचे डोळे आग ओकत होते. हात मोकळे असते तर एव्हाना त्यांनी यशवन्ताचा गळा दाबला असता, याची यशवंताला कल्पना आली.

सात खून माफ

लेखक जेपी यांनी गुरुवार, 12/01/2017 22:03 या दिवशी प्रकाशित केले.
रेल्वे आपला भोंगा वाजवत फलाट २ वर आली.रात्रीची १० वाजायला आलते. फलाटावर उतरलो तसा फुलारी समोर आला,सलाम ठोकुन माझ्या हातातील बॅगला हात घातला. "राहु दे आतली सुटकेस घे." किडमीडा फुलारी सुटकेस उचलत माझ्या मागे ओढत येत राहीला. मला त्याची पर्वा नव्हती,मरु दे साला.! ** १० वर्ष नंतर पुन्हा स्वत:च्या गावात आलतो. १० वर्षापुर्वी सोडल त्या पेक्षा फार बदलत नव्हत. गाडीत बसताना ताईच्या घरचा पत्ता दिला.