Skip to main content

बाप फितूर झाला.........

लेखक किरण कुमार यांनी बुधवार, 18/01/2017 18:17 या दिवशी प्रकाशित केले.
जीवनात दूखा:ने डोळ्यात पूर आला तू हासला जरासा ,थकवा दूर झाला तू जन्मलास अन मी जगलो असा नव्याने प्रारब्ध गवसला जो, निशब्द सूर आला उचलता हात बाळा, दिधला जरी धपाटा काहूर मनी माझ्या, भरुनी उर आला इवले हात रेखिती आभाळावर नक्षी तू रागावला कधी, चंद्रास खूर आला तूझी पावले उन्ही,बघता या मेघांनी भिजवण्या धरणी,पाऊस आतूर झाला तूझी ओढ इतूकी, कामास दूर सारी तूज भेटाया रोज बाप फितूर झाला

देवघर - मला स्फूर्ती देणारा पवित्र कोपरा!

लेखक सिंधू वडाळकर यांनी बुधवार, 18/01/2017 18:14 या दिवशी प्रकाशित केले.
आपुलकी, जिव्हाळा, दया, माया आणि आल्हादाच्या रेशमी धाग्यांनी नटलेली वास्तू म्हणजे आपले घर असते. अशा घरास गंगेचे पावित्र्य लाभलेले असते. माझे घर छोटे आणि दोन मजली आहे. वरच्या घरात एका कोपऱ्यात माझी एक आवडती खास जागा आहे. ती म्हणजे माझे देवघर! देवघरात मोजकेच देव आहेत. त्यात गणपती हे माझे आराध्य दैवत आहे आणि रेणुका देवी ही माझी कुलस्वामिनी आहे. या देवांची मी रोज उपासना करते. रोज तीन तासांची माझी उपासना असते. सुख दु:खाला मोकळीक करून देण्याची ही माझी जागा आहे. देवघरात गणपतीची छोटी आणि सुबक अशी मूर्ती आहे. त्याची मी आवर्तने करते. तसेच देवघरासमोर मी ध्यान धारणा करते. त्यामुळे मला शांती लाभते.

वडील

लेखक वृंदा१ यांनी बुधवार, 18/01/2017 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
कुणाच्या विचारांचा दर्जा कुणी ठरवू शकत नाही पण माझ्या वडिलांबद्दलच्या कवितांना घाणेरड्या प्रतिक्रिया आल्या. मला अशा लोकांकडे दुर्लक्ष करायचे असते हे माहीत आहे. मला खरेच त्यांची कीव...कीव येते.कुठलाही माणूस असे दुर्गंधीयुक्त विचार घेऊन मोठा होत नसतो.

"लीके"(एक माध्यम धार्मिक शिकवणीचं)

लेखक बाजीप्रभू यांनी बुधवार, 18/01/2017 07:49 या दिवशी प्रकाशित केले.
*/

आपल्या पैकी बरेचजण एखाद आठवड्यासाठी का होईना थायलंड देशात नक्कीच येऊन गेला असाल. एक बजेट फॉरेन टूर म्हणून पूर्वेकडील या निसर्गरम्य छोट्याश्या देशाला थोडे थोडके नव्हे तब्बल ६० लाख पर्यटक दरवर्षी भेट देतात. पटायातला एक बीच आयलँड, एक कॅबरे शो, रेड लाइट एरियाची व्हिजिट, झालंच तर एक जंगल सफारी आणि बँकॉकच्या मॉल्समधे शॉपिंग, हि मुख्यत्वे भारतीय पर्यटन कंपन्यांची स्टॅंडर्ड आयटीनरी.

मेमॉयर्स ऑफ गेइशा

लेखक पद्मावति यांनी बुधवार, 18/01/2017 07:23 या दिवशी प्रकाशित केले.
*/

झुकलेली नजर, ओठांवर मंद स्मित आणि एक लाजरा कटाक्ष…अगदी क्षणभरच.. पण त्या क्षणभरच्या नजरभेटीतूनही जी कुठल्याही पुरुषाला वेड लावू शकते, ओढ लावू शकते ती खरी गेइशा!!  स्पर्श नाही, अंगप्रदर्शन नाही किंवा सवंग हावभाव नाहीत...फक्त एक कटाक्ष. 'गेइशा'- जपानच्या इतिहासातले, त्याच्या संस्कृतिक जडणघडणीतले महत्त्वाचे अंग. सामाजिक जीवनाचा अभिमानास्पद नसला तरी एक अविभाज्य भाग. आता गेइशा म्हणजे कोण आणि काय?

विंगेत गलबला - अप्सरेचा पदन्यास - अर्चना जोगळेकर

लेखक रोशनी यांनी बुधवार, 18/01/2017 07:16 या दिवशी प्रकाशित केले.
*/

अर्चना जोगळेकर! मराठी चित्रपट सृष्टीतलं आणि कथ्थकच्या जगतातलं एक वलयांकित नाव. त्या गेले अनेक वर्ष न्यू जर्सी मध्ये राहत असून, "अर्चना नृत्यालय" चालवत आहेत. त्या हो म्हणतील असं खरं तर वाटलंच नव्हतं. एवढी मोठी व्यक्ती आपल्या लहानशा उपक्रमाला कशाला वेळ देईल असंही वाटलं. पण प्रत्यक्षात मात्र त्या अत्यंत गोड आहेत! अर्थात आम्ही मुलाखत घेताना प्रचंड घाबरलेलो होतोच! पण त्या अगदी भरभरून बोलल्या.

मै कोन हूँ ?

लेखक मूखदूर्बळ यांनी बुधवार, 18/01/2017 03:04 या दिवशी प्रकाशित केले.
मै कोन हूँ ? "मै कोन हूँ? " हां कधी कधी चित्रपटाच्या स्मृतीभंश झालेल्या नायकाला अथवा नाईकेला पडणारा प्रश्न मला पडतो आणि मग मी स्वत थोडासा गोन्धळतो मला हा प्रश्न का पडावा ह्या विचाराने आणि मग मी स्वताला शोधायला सुरूवात करतो. तसा मी सामान्य पापभिरू मध्यम वर्गीय गृहस्थ आहे.

बर्फाळलेले आईसलँड - भाग ३ - धुक्यात हरवलेली वाट

लेखक विहंग३००७ यांनी बुधवार, 18/01/2017 00:34 या दिवशी प्रकाशित केले.
आईसलँडमध्ये फिरण्यासाठी स्वतःचे वाहन भाड्याने घेणे सर्वोत्तम. इथली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था फारशी सक्षम नाही. रिकयाविक आणि परिसरात फिरण्यासाठी बसची व्यवस्था आहे. मात्र लांबवरच्या प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यासाठी सार्वजनिक वाहतूक अगदीच मर्यादित आहे. स्वतःचे वाहन नसल्यास एखाद्या कंपनीसोबत गाइडेड टूरने जाणे अधिक सोयीचे. मात्र अशा टूर्स काही मला हव्या असलेल्या ठिकाणी जात नव्हत्या. शिवाय त्यांचे तिकीटही अवाजवी महाग होते. शेवटी रिकयाविक एक्सकर्जन्स (Reykjavik Excursions) या कंपनीचा hiking on your own नामक तीन दिवसांचा पास विकत घेतला.