दु:खाच्या वाटेवरचे गाव
लेखनप्रकार
वेदिका कुमारस्वामी यांच्या कविता सध्या वाचतोय फेसबुकवर. कविता नव्या आहेत, नव्या दमाच्या आहेत. दम कोंडणार्या आहेत.
धग सोसवत नाही आणि तोंड फिरवायचीही सोय नाही.
यापुर्वी इतकी घालमेल झाली होती तेंव्हा जिएंची राधी वाचून खाली ठेवली होती. का चंद्रावळ किंवा स्वामी?
गळ्यात माझ्याच आतड्यांचे फास अडकवून अस्संच फरफटवत नेलं होतं ती गोलपिठ्यातली कुठली बरं कविता? की सगळ्याच?
ही जिवंत कविता आहे.
- ताजी, रक्ताळलेली, जाईजुईच्या काटेरी डोंगरांमधली, लुत भरलेल्या ओंगळ कुत्र्याची. हिरव्या रेषांच्या वाटांची, चमेलीच्या अंगाची.
- आज्जीची, अम्माची, हेगडेची, भद्रा नदीसारखं हसण्याची, कॉफीच्या बियांची.
- पण ती फक्त मळवट भरलेल्या यल्लुआईच्या लेकरांचीच नाही. ती कुणाची आहे न् कुणाची नाही हा हिशेब ज्याचा त्याचा.
तिची माय झालीय ती वेदिका (https://www.facebook.com/profile.php?id=100013445255879)
वाचा.
वाचने
1594
वाचनखूण
प्रतिक्रिया
3
कविता दिसत नाहीत. फक्त प्रोफाइल दिसत आहे. फेबुवर लॉगइन करावेचं लागेल का?
In reply to कविता दिसत नाहीत. फक्त by इना
हो.
उत्कृष्ठ कविता आहेत!!!
कविता दिसत नाहीत. फक्त