Skip to main content

ती सध्या काय करते ?

लेखक संजय क्षीरसागर यांनी शुक्रवार, 13/01/2017 20:56 या दिवशी प्रकाशित केले.
नाना पाटेकरशी एकदा चित्रपटकथेवर चर्चा झाली होती. तेव्हा तो म्हणाला होता की सर्वोत्तम कथा ती, की जीचा जीव एका वाक्यात सांगता येतो. ती सध्या काय करते ? एका वाक्यात सांगायची तर, ती सध्या काहीही करत असू दे, समोरासमोर आल्यावर, आपण जे तेव्हा बोलू शकलो नाही ते आठवून आणि अवघडून जाऊन, अजून दूर जाण्यापेक्षा, आज ते बोलून, दोघातलं प्रेम तितक्याच उत्कटतेनं आणि अपराधशून्य मनानं जपून, आपण एकमेकांशी सुहास्यवदनानं बोलू शकतो. इतकी साधी स्टोरीलाईन सतीश राजवाडेनी जी काय बेहद्द रंगवलीये ती भान विसरुन पाहात राहावी अशी आहे.

सुक्ष्म गीतकथा: सुक्ष्मकथांचा मजेदार उपप्रकार

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी शुक्रवार, 13/01/2017 17:52 या दिवशी प्रकाशित केले.
एक इनंती: आधी २० सुक्ष्मकथा-१ हा दुवा वाचावा. मग पुढे धकावं. सुक्ष्मकथेत अजून काय मजा आणता येईल याचा विचार करतांना एक नवीन उपप्रकार सापडला (मुळात ही कल्पना शैलेंद्र शिर्के यांची. कल्पनाविस्तार अन कथा मात्र माझ्या) संकल्पना अगदी सोप्पीये- कुठल्याही गाण्याच्या धृवपदाची पहिली ओळ (किंवा दोन्ही ओळी) घ्यायची, दुसऱ्या ओळीत असे शब्द घालायचे की गाण्याचा अर्थ पुर्ण बदलून जाईल. शिवाय एक वेगळीच नवीन सुक्ष्मकथा तयार होईल. उदा चंदनाच्या पाटावर, सोन्याच्या ताटावर, मोत्याचा घास तुला भरविते... ही झाली मु़ळ गाण्यातली पहिली ओळ.

महाराष्ट्राचे दुर्गवैभव आणि आपण

लेखक कर्रोफर नमुरा यांनी शुक्रवार, 13/01/2017 17:19 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र हा प्राचीन काळापासून एक समृद्ध, प्रगतीशील आणि पराक्रमी देश आहे, हे त्रिकाळ अबाधित सत्य आहे. प्राचीन काळी हा प्रांत ऋषीमुनींचे आणि महारथींचे दंडकारण्य म्हणून ओळखला जायचा. भक्ती आणि शक्तीचा सुरेख संगम हे येथील राष्ट्रीकांचे वैशिष्ट्य राहिले आहे. अगदी कला, स्थापत्य आणि निसर्गसौंदर्य हे देखील या भूमीला वरदान ठरले आहेत. अजिंठावेरुळचे स्थापत्य तर जगाला भुरळ घालत आहेत. लोणारचे खारयुक्त सरोवर हे खगोलतज्ञ आणि वैज्ञानिक यांचे आवडते ठिकाण. अनेक वैदिक, पौराणिक, मध्ययुगीन आणि अर्वाचीन दाखले याला प्रमाण आहेत.

निवडणुका २०१७, चर्चा आणि अंदाज

लेखक अनुप ढेरे यांनी शुक्रवार, 13/01/2017 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
निवडणुकांचा नवा सीझन थोड्याच दिवसांत सुरू होईल. त्याच्या चर्चा आणि अंदाज यासाठी हा धागा. महाराष्ट्रातल्या महापालिकांच्या निवडणुका आहेतच पण त्याहून महत्वाच्या निवडणुका इतर पाच राज्यांच्या विधानसभांसाठी आहेत. पंजाब, उत्तर प्रदेश, गोवा, मणिपुर आणि उत्तराखंड या पाच राज्यांच्या निवडणुका पुढल्या महिन्यात ४ तारखेपासून सुरू होतील. निकाल ११मार्चला लागतील. आम आदमी पार्टीसाठी गोवा आणि पंजाब अत्यंत महत्वाचे असतील. पार्टी दोन्ही राज्यात जोरदार प्रयत्न करत आहे असं दिसतय. ग्लोरिफाईड मुंसिपाल्टीचे मुख्यमंत्री केजरीवालांना आपलंचं महत्त्व वाढवायला ही सोनेरी संधी आहे.