मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रात्रीस खेळ चाले....

राजेंद्र देवी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
रात्रीस खेळ चाले.... गूढं त्या महाली केस सोडून ती बसलेली काळा मिट्ट अंधार अन काजव्याने पण मान टाकलेली अचानक एक टिटवी ओरडली आढ्याशी भुते खदखदली वारा नव्हता तरी अचानक तावदानाची दारे खडखडली रात्र खूपं वाढलेली कोल्हे कुत्री केकाटली झरोक्यातून सावली उतरली मांजराने बाहुली पळवली.... राजेंद्र देवी

वाचने 3285 वाचनखूण प्रतिक्रिया 12

चांदणे संदीप 12/09/2016 - 09:10
कविता ठीकच.... जरा शब्दक्रम वगैरे बदलून लयीत आणता आली तर पहा! Sandy

अत्रुप्त आत्मा 12/09/2016 - 09:29
छान आहे.. अ वांतर~वाचताना पांडूलेखाची आठवण आली! स मांतर~ पांडूला आवडेल ही जिल्बी. ;)