Skip to main content

पान

लेखक अज्ञात यांनी मंगळवार, 25/04/2017 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
पान म्हणालं की कलकत्ता सादा आठवतं, मग मसाला मग मगई... त्यापलीकडे कधी मजल गेली नाही! पण ह्या पाना आधी एक महत्वाचं पान म्हणजे आपलं... केळीचं पान! आठवतं का केळीचं पान, आता त्यावर जेवण मिळवणे म्हणजे जरा "नशीब वान आहेस लेका!" वगैरे म्हणावं लागतं! पारंपरिक गोष्टींचा रितिरिवाजांचा जसा ऱ्हास होत चाललाय, तसाच ह्या पानांवर जेवण केरण्याचा ही, बरोबर आहे म्हणा! आता जागा नसते ना, जिथे जागा असते तिथे भलत्याच गोष्टींनी जागा घेतलेली आहे आज काल! असो... केळीच्या पानावरचे जेवण लहानपणी खूप अनुभवले, त्यावर तरंगणारे पाणी, अगदी बरोब्बर मध्ये असलेल्या लांब देठाचा मोठेपणा! मोठेपणा म्हणजे...

चुकणारी आई

लेखक aanandinee यांनी मंगळवार, 25/04/2017 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
"तुम्ही दोघांनी जर पटपट खाल्लं तरच पार्कमधे जायचंय, नाहीतर नाही" तिने नेहेमीप्रमाणे मुलांनी लवकर खावं म्हणून सांगितलं. आर्यन आणि विहान वय वर्ष पाच आणि तीन, दोघांनी आईची धमकी कितपत गंभीर आहे याचा अंदाज घेतला. आर्यनने पहिला घास तोंडात टाकला आणि "आय डोन्ट लाईक डोसा" म्हणून तोंड वाकडं केलं. विहानने तर भरवलेला घास तोंडातून फू फू करून बाहेर काढला. "त्यांना नकोय तर जाऊदे ना कॉर्नफ्लेक्स खाऊ दे त्यांना" नवर्याचा एक्स्पर्ट ओपिनियन! तोही मुलांसमोरच! तिला सुचेना की आता आधी मुलांना ओरडावं की नवर्यावर चिडावं ! "आपल्या पोटातल्या गुड बॅक्टरीयासाठी आंबवलेले पदार्थ चांगले असतात.

ये, दिग्बन्ध तोडून ये,

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 24/04/2017 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
ये, दिग्बन्ध तोडून ये, आजच्या कविते ओसन्डत, फुफा॑डत, अनावर ये भारून टाक अवघ्या अस्तित्वाचे अवकाश कडाड कोसळ या अस्थिमज्जेच्या पि॑जर्यावर एक एक अणू व्यापून टाक जाणिवेचा-तुझे देणे चुकेपर्य्॑त घे आधार तोकड्या अक्षरा॑चा - या कागदावर उमटण्याआधी एकच क्षण था॑ब, कालच्या कवितेच्या कलेवरावर कफन घालून येतो
काव्यरस

आगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ३)

लेखक Anand More यांनी सोमवार, 24/04/2017 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीपूरच्या अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी असते मंजुनाथाचे मंदिर. हा मंजुनाथ भारतीपूरच्या पंचक्रोशीत आपली सत्ता गाजवत असतो. त्यासाठी त्याचा सहाय्यक असतो भूतराया नावाचा देव. तो अंगात येतो आणि लोकांवर वचक ठेवतो. मंजुनाथ सर्वशक्तिमान पण निष्क्रिय असतो तर भूतराया सेवक पण क्रियाशील असतो. या भूतरायाची कीर्ती इतकी मोठी की प्रत्यक्ष राष्ट्रपती त्याच्या दर्शनाला येऊन जातात आणि प्रसाद म्हणून कपाळभर कुंकू माखून घेतात. भूतरायाचा प्रभाव एव्हढा मोठा की भारतीपूरमध्ये कोणीही आपले वाद विवाद कोर्टात घेऊन जात नाही. सगळे वादविवाद भूतरायच्या मर्जीने सुटतात.

प्रिय सचिन

लेखक चिनार यांनी सोमवार, 24/04/2017 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रे सचिन...!! आजकाल तुझ्याविषयी बोलणं..लिहिणं...इतकंच काय तुला टीव्हीवर बघणंही सोडून दिलंय मी.. का म्हणजे काय?? त्रास होतो रे..खरंच खूप त्रास होतो... आज तुझा वाढदिवस आहे...म्हटलं बघूया, जमतंय का काही लिहायला.. लिहायला लागतंच काय रे??

अता ही भेट टळणे शक्य आहे ..

लेखक drsunilahirrao यांनी सोमवार, 24/04/2017 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
अता ही भेट टळणे शक्य आहे (तुझे मजला वगळणे शक्य आहे) जरासा जोर लावावास अजुनी पहा माझे निखळणे शक्य आहे नको इतकी मुजोरी आरशावर तुझेही रुप ढळणे शक्य आहे असे येऊ नये वेळीअवेळी (कुणी काही बरळणे शक्य आहे) जरा जपूनीच ये ग्रीष्मात इथल्या तुझी काया वितळणे शक्य आहे तुला पाहून येथे एकटीला फुलांचे बावचळणे शक्य आहे डॉ. सुनील अहिरराव
काव्यरस

ती एकदाच दिसली...

लेखक सत्यजित... यांनी सोमवार, 24/04/2017 05:01 या दिवशी प्रकाशित केले.
ती एकदाच दिसली अन् छंद होत गेला दिनदर्शिका-फुल्यांचा धरबंद होत गेला! होती कथा विराणी,झाली गझल रुमानी बहुधा पुन्हा व्यथेला,आनंद होत गेला! शर खोल-खोल रुतला नजरेतला तिच्या अन् एकेक मंद ठोका मग बंद होत गेला! केसांत मोकळ्या त्या मन गुंतवीत गेलो कमळात बंद भुंगा स्वच्छंद होत गेला! टिपतो सुगंध वारा..उबदार ओंजळींनी बागेतल्या कळ्यांचा गुलकंद होत गेला! ती गुणगुणत असावी बहुतेक शेर माझे प्रत्येक शब्द माझा मकरंद होत गेला! केंव्हातरी अचानक येतो सुगंध अजुनी हा कायदा ऋतूंचा,बेबंद होत गेला! —सत्यजित
काव्यरस

डिअरपिअर...मॅकबेथले... काळाची उधई गिळी टाकई!

लेखक माहितगार यांनी रविवार, 23/04/2017 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
(माफी नाम्यांची रांग आहे, विडंबन काळाची मांग आहे प्रेर्ना १ प्रेर्ना २) अरे डिअरपिअर कशास बघतोस स्वप्नात जुई...

पुस्तकदिनानिमित्त विडंबन- (बघ माझी आठवण येते का?)

लेखक स्वामी संकेतानंद यांनी रविवार, 23/04/2017 21:25 या दिवशी प्रकाशित केले.
सौमित्र आणि शेक्सपिअर दोघांची क्षमा मागून :- रात्री दिव्याखाली ’मॅकबेथ’ हाती घेऊन पहा बघ माझी आठवण येते का? पाने चाळ, पाचव्या ऍक्टचा पहा पाचवा प्रसंग मॅकबेथची सॉलिलॉकि वाचून टाक बघ माझी आठवण येते का? डोक्यावरून जाणारे इंग्रजी शब्द ऑक्सफ़र्डमध्ये बघ डोके आपटून घे, वैतागून जा नाहीच कळलं काही तर बंद कर ते,’सॉनेट्स’ घे त्या डोक्यावरून जातीलच,शब्दांची जुळवाजुळव करून अर्थ लावून पहा भंडावून जाशील तू, बघ माझी आठवण येते का? मग सुरू हो, शेक्सपिअरची सगळे साहित्य चाळून घे चाळत रहा पुस्तके संपेपर्यंत, काही कळणार नाहीच, शेवटी रडून घे कपाट बंद करू नकोस, दिवा मालवू नकोस, पुन्हा तेच मॅकबेथ हाती घे आता नवऱ्
काव्यरस

नातं..!

लेखक हर्षु यांनी रविवार, 23/04/2017 20:50 या दिवशी प्रकाशित केले.
नातं हे दोन व्यक्तींमध्ये असतं, मग ते कुठलेही असो. पण यातील मैञीच्या नात्यात आपण आपली सगळीच नाती जगु शकतो, बघु शकतो, आणि जेव्हा या सुंदर नात्यामध्येआपल्या नकळत का होइना पण, संध्याकाळच्या वेळी कमळ फुलावर बसलेला भ्रमर जसा सकाळपर्यंत त्यात कैद होतो, अगदी तसाच कटुपणा कैद होवु पाहतो तेहा मन नावाचा अवयव अगदीच हेलावुन जातो. नातं जोडण्यासाठी जश्या दोन व्यक्ती लागतात, तसेच ते टिकवण्यासाठी सुद्धा दोघांचे प्रयत्न सुद्धा गरजेचे असतात.