आमची फटाफट झणझणीत मिसळ
कृती:
आधी नेहमीसारखी तेल, मोहरी,जिरे, हिंग, कढीपत्ता घालून फोडणी करून त्यात वाफवलेली मटकी घातली. गोडा मसाला, तिखट, मीठ, किंचित आमचूर पावडर आणि साखर घालून ससरसरीत उसळ करून घेतली.
आता कट करायचं ठरवलं :)
कट्/तर्री: जरा जास्त तेलाची फोडणी करून त्यात कढीपत्त्याबरोबरच थोडी पुदिना पाने चिरून घातली. आलं-लसूण पेस्ट १ चमचा, ४ छान लालभडक पण ओल्या मिरच्या आणि २ छोट्या कांद्यांची पेस्ट त्यात घालून परतले. १ मोठ्या टोमॅटो ची प्युरी त्यात घालून तेल सुटेतो परतलं. त्यात धने जिरे पावडर, गरम मसाला, तिखट (सोसेल एवढं). मी १ टी-स्पून घातलं होतं.
मिसळपाव
कृती:
आंबे स्वच्छ धुवावेत. दोन बाजू कापून घ्याव्यात, त्यावर उभ्या आडव्या फोडी होतील अशा सुरीने रेषा माराव्यात. चमच्याने भांड्यात काढून घ्याव्यात. दोन्ही कडा पण कापून त्याच्या फोडी करून घ्याव्यात . कोयीचा रस काढून घ्यावा. दूध न तापवता गार करून घ्यावे. फोडी आणि रस एकत्र करावा.
माझ्या कडे लिहायला काही नाहीये सध्या, सीरियल्स, चित्रपट, गाणी आणि अन्वयाचे छोटे किस्से सोडले तर काहीच लिहिले नाहीये गेले वर्ष, दीड वर्ष... आणि तितक्यात एक लेख वाचला, लेखाची सुरुवात काहीशी अशी - 'तंत्रज्ञानाने ज्या पिढीला गुदगुल्या केल्या ती आमची पहिली पिढी.' आणि शेवट असा - 'दुःख गाव हरवल्याचं आपल्याला कधीच नव्हतं. गाव हरवला हरकत नाही. गावपण हरवायला नको होतं.'
ह्या लेखावरून मी परत गेलो ना...