Skip to main content

कल जो पी थी अजी ये तो उसका नशा है, तुम्हारी क़सम आज पी ही नही |३|

लेखक संजय क्षीरसागर यांनी बुधवार, 26/04/2017 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
इतकी प्रदीर्घ शेरोशायरी आजपावेतो कोणत्याही गज़ल पूर्वी झालेली नाही. पण हीच फैझची ख़ासियत आहे. त्याच्या सृजनात्मकतेचा ठाव घेता येत नाही. प्रत्येक ओळीगणिक तो आणखी जादूमय होत जातो आणि नशेची खुमारी वाढत जाते. कल जो पी थी अजी, ये तो उसका नशा है, तुम्हारी क़सम आज पी ही नही | प्रियकर प्रेयसीला समजावतोयं, मला जी नशा आहे ती कालच्या दारुची आहे. आज, तुझी शपथ, मी प्यालेलो नाही ! ________________ आज कुछ तो नशा, आपकी बात का है, और थोडा नशा, धिमी बरसात का है, हमें आप यूं ही, शराबी न कही ये, ये दिलपे असर, तो मुलाक़ात का, ...

मनाची मनोगते

लेखक चंद्रकांत यांनी बुधवार, 26/04/2017 20:20 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्यातील कुणीही मी: तो आणि ती एक मात्रा, एक वेलांटीची सोबत करीत लेखांकित केलेली वर्णमालेतील अक्षरे. पण कधी कधी काही अक्षरांना अक्षय आशय प्राप्त होतो. कुण्या अज्ञाताने कधीकाळी शिलाप्रस्तरावर कोरलेली अक्षरे अनपेक्षित हाती लागतात. काळाच्या उदरात सामावून पडद्याआड गेलेले संदर्भ नव्याने उलगडत जातात. विस्मृतीच्या निबीड अंधारातून कवडाशाचा हात धरून विसकटलेले प्रसंग, विखुरलेले संदर्भ चालत येतात आपल्यापर्यंत, कुठलीतरी कहाणी सोबत घेऊन. विस्मृतीच्या कोशात विरलेले अध्याय नव्याने वाचले जातात आणि आशयाच्या अथांग डोहात विहार करीत राहतात.

एक भटकंती रानवाटांची...

लेखक इरसाल कार्टं यांनी बुधवार, 26/04/2017 19:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रहो, आज गोष्ट सांगणार आहे माझ्या लोहोपे तलाव भेटीची. तर झाले असे कि, 50x7 हे आव्हान तीळसे येथील शिवमंदिराला भेट देऊन पूर्ण केल्यानंतर अस्मादिकांनी तानसा जलाशयावर स्वारी नेण्याचे आयोजिले होते मागच्या रविवारी. परंतु ऐन वेळी आमचे सहप्रवासी घोडेस्वार परगावी गेल्यामुळे तानसा अभयारण्य आणि प्रचंड जलाशयाला एकट्याने भेट द्यायचे धाडस होईना म्हणून आम्ही वेळेवर पंचक्रोशीतील गणेशपुरी-वज्रेश्वरी-अकलोली हि गरम पाण्याच्या कुंडांसाठी प्रसिद्ध तीर्थस्थळे पाहण्याचे योजिले.

बौद्धिक संपदा हक्क दिवस २०१७

लेखक खेडूत यांनी बुधवार, 26/04/2017 14:14 या दिवशी प्रकाशित केले.
h . . (प्रासंगिक) सोशल मिडीया आपल्या बोटावर नाचायला लागल्यापासून चांगलं काय झालं याचं मोजमाप प्रत्येकाचं वेगळं असेल. सोय आणि मनोरंजनाचे साधन म्हणून ते आवश्यक झालेय. पण दुष्परिणामही कमीअधिक प्रमाणात अनुभवायला मिळत आहेत. एक मोठा प्रॉब्लेम म्हणजे कसलीही खातरजमा ना करता, मूळ लेखकाला डावलून (कधी कधी तर वाचायच्या आधीच) पुढे ढकलण्याची प्रवृत्ती.

पनीर स्टफ्ड मिनी पेपर्स

लेखक रुपी यांनी बुधवार, 26/04/2017 07:08 या दिवशी प्रकाशित केले.
ही रंगीबेरंगी, नाजूक दिसणारी डिश डोळ्यांना सुखावतेच. शिवाय, पाहुणे येणार असतील तर मेनूमध्ये छोले किंवा इतर चमचमीत भाजीबरोबर 'बॅलन्स' करायलाही छान आहे.

मिपा कट्टा वृत्तांत: २३ एप्रिल २०१७, न्यूपोर्ट मॅाल, जर्सी सिटी

लेखक आषाढ_दर्द_गाणे यांनी बुधवार, 26/04/2017 02:52 या दिवशी प्रकाशित केले.
"जरासा उशीर होईल, पोचतोचे" राघवेंद्र ह्यांच्या आलेल्या फोनवरची माझी दिलगिरी ऐकून "पण तू जाऊन नक्की करणार काय तिथे? ओळख आहे का कोणाशी?" मित्राच्या वडिलांनी विचारले. "अहो काही नाही तर खफवर मारतो तश्या रँडमगप्पा मारून येईन..." मी. "कश्यावर?" मित्रवडील एक तर गोरज मुहूर्तावर न्यूयोर्कात आल्यापासून सबवेने वेळेचं गणित आधीच चुकवलेलं. वरुन 'मिसळपाव' काये, गेल्या आठवड्यातून ह्या आठवड्यात कट्टा कसा ढकलला गेला आणि मी सात तास बसमध्ये बसून वर्जिनियातून त्याच्या घरी नक्की कशाला उलथलो ह्या सगळ्याचे मित्रास (सहकुटूंब. त्याचे.) स्पष्टीकरण्यात कट्ट्याचा अकराचा मुहूर्त टळून गेलेला.

कास्तकारी :(

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी मंगळवार, 25/04/2017 23:39 या दिवशी प्रकाशित केले.
आज पाऊस येईन रोजच वाटतं वाट पाह्यता पाह्यता डोळ्यात पाणी दाटतं मळ्यातल्या विहरीपरी मनबीन आटतं जमिनीतल्या भेगांसंगं उर महं फाटतं चिंबओल्या वावराचं स्वप्न पहा वाटतं कुटका गिळून पडल्यावर झोपाच कुठं वाटतं कर्जाच्या ओझ्यानं सम्दं गणित हुकतं घरगुती चिंतायनं स्मशानगाव पेटतं कास्तकारी करणं आता पाप केल्यावानी वाटतं बैलावानी मलेबी मरून जा वाटतं

महाराष्ट्र दिन २०१७ : चारोळी स्पर्धा

लेखक साहित्य संपादक यांनी मंगळवार, 25/04/2017 19:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो. नुकतेच भरगच्च उपक्रम पार पडलेले असल्याने थोडासा विसावा घेऊन मिपाकरांना जरा हलक्या फुलक्या लिखाणासाठी आता मस्त संधी आहे. १ मे रोजी होणार्‍या महाराष्ट्रदिनानिमित्त मिपाकरांनी चारोळ्यांची बरसात करावी अशी इच्छा आहे. शीघ्रकवी, चारोळी स्पेशालिस्ट, विडंबन, सुडंबन स्पेशालिस्ट, विनोदी कवी, प्रेमकविता अन निसर्गकवितांची झडी लावणार्‍या कवी/कवयत्रींची मिपाला कधीच कमी पडली नाही. आता विषय सोपा, जिव्हाळ्याचा अन स्पेशल आहे. तेंव्हा किबोर्डावर नाचू देत आपली बोटे. येऊ देत काही चारोळ्या. नव्हे......

आगमन, निर्गमन पुनरागमन (भाग ४)

लेखक Anand More यांनी मंगळवार, 25/04/2017 18:54 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या आयुष्यात कन्नड साहित्य उशीरा आले. तोपर्यंत मराठी साहित्याने माझ्या मनावर गरूड केले होते. (इथे साहित्य हा शब्द मी कथा आणि कादंबरी इतक्या मर्यादित अर्थानेच वापरला आहे. त्यात वैचारिक लेखन गृहीत धरलेले नाही.) पण उशीरा येऊनसुद्धा एक मात्र स्पष्ट जाणवले की मी वाचलेले कन्नड साहित्य मी वाचलेल्या मराठी साहित्यापेक्षा खूप वेगळे आहे. बहुतांश मराठी कादंबऱ्या मला व्यक्ती आणि निसर्ग किंवा व्यक्ती आणि व्यक्ती किंवा व्यक्ती आणि त्याचा समाज यांच्यापैकी कुठल्यातरी एकाच नातेसंबंधांवर भाष्य करणाऱ्या वाटल्या.

सुगंध

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 25/04/2017 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
या ओंजळीतून त्या ओंजळीत फुले सहज निघून जातात... उरल्या सुगंधाचे अत्तर फुलांच्या आठवणीत दरवळत राहते! -शिवकन्या
काव्यरस