अक्षय्य तृतीया
अक्षय्य तृतीया म्हणलं कि मुहूर्ताची सोनेखरेदी, आंब्याच्या सीझन मुळे दुपारच्या जेवणाला आमरस पुरी अश्या गोष्टी आठवतात. मला मात्र ह्या दिवशी कायम 'घोसाळ्याचा (घोसावळ्याचा) वेल आणि बालपणीचे दिवस' आठवतात.
ह्या दिवशी कुठलंही झाड लावलं तर ते उत्तम येतं असं बाबा म्हणायचे. चैत्र-वैशाख मध्ये तापलेली जमीन आणि पुढे दीड महिन्याने सुरु होणारा पावसाळा हे त्यामागील शास्त्रीय कारण असेल कदाचित. तेव्हा मात्र शुभ मुहूर्तावर झाड लावलं कि छान येतं असंच वाटायचं.
अक्षय्य तृतीयेच्या काही दिवस आधी बाबांबरोबर पुण्याच्या मंडईत जाऊन घोसाळ्याच्या बिया आणायच्या. वाटीत पाणी घेऊन २ दिवस त्यात ठेवायच्या.
मिसळपाव