Skip to main content

इमान...भाग ४

लेखक चिनार यांनी मंगळवार, 16/05/2017 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या तीन भागांची लिंक http://www.misalpav.com/node/39750 http://www.misalpav.com/node/39761 http://www.misalpav.com/node/39789 "उल्लू बनवतं का बे सायच्या मले?" गब्ब्यांन बबन्याच्या कानाखाली मारली. "काय झालं बे? काऊन मारतं मले? "इमानाची वेळ काय सांगतली मले तू?" "सात वाजता हाय ना सायंकाळच्या." "सात वाजता?" "हो मंग." "मंग हे काय लिहेल हाय इथं? एकोणीस वाजता? घडाळ्यात एकोणीस वाजताना तुया बापानं पायलते का कधी?" "अबे च्यामायबीन!!

(ती पहा पडली गझल)

लेखक सूड यांनी मंगळवार, 16/05/2017 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
ती पहा पडली गझल ती,पिंक पडल्यासारखी दादही मिळते मला का पानठेल्यासारखी!? पावसाचे थेंब..वणवा, काय आणि मी लिहू... वाचकांची जाण मेल्याहून मेल्यासारखी! कोपऱ्यावरती विडंबन काय कोणी टाकते रंगते मैफील तिथली जान आल्यासारखी! हो!जरा साशंक होतो,पोस्ट क्लिकतानाच मी उडवतील का टेर माझी मोरु झाल्यासारखी! काय तो पडला जरासा जीव भांड्यामाजी या प्रतिक्रिया जल्लोष करते,बाद केल्यासारखी -व्रात्यजित
काव्यरस

शामभट्टाची "युरोप" वारी .. इटली, स्वीस, फ्रान्स लेखांक २

लेखक चौकटराजा यांनी मंगळवार, 16/05/2017 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
दिवस दुसरा--- पहाता पहाता अबुधाबी कधी आले कळलेच नाही. प्रवासी बाहेर पडले . मुम्बई वरून आम्हाला अबुधाबीला घेऊन आलेले विमान मुम्बईवरून आम्हाला अबुधावीला घेउन आलेले विमान. रात्री दोन वाजून पस्तीस मिनिटे स्थानिक वेळेनुसार अबुधाबी -रोम फ्लाईट होती. मधे जरासा वेळ रिकामा होता. विमानतळावर घड्याळे , सेंट्स ई ची दुकाने आहेत. एक सुसज्ज असे उपाहार गृह ही आहे. तिथे सुखरूप पोहोचलो आहोत असा वाय फाय वापरून मेसेज द्यावा तर विमानतळाचे वाय फाय काम देत नव्हते.

(ही पहा पाडली गजल)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी मंगळवार, 16/05/2017 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
आता लक्षात ठेउन वेगळ्या धाग्यावर कविता पाडणे आले पेरणा सांगायलाच पाहिजे का? ही पहा पाडली गजल, ही पहा पाडली गजल, मी ही वेड्यासारखी दाद त्यांनी द्यावी ज्यांना, मी दाद देतो सारखी, उंच डोंगर, श्रावणसरी, यावरी काही लिहू, शब्द येती ना समोरी, डिक्षनरीही बारकी, कोप-यावरती जिन्याच्या, पिंक कोणी टाकली, रंगते टाईल इथली, पान ठेल्यासारखी, हो!

ज‌र‌तारी

लेखक शिवोऽहम् यांनी मंगळवार, 16/05/2017 07:56 या दिवशी प्रकाशित केले.
घ‌न‌ नीळ आर्त दु:खाचा उग‌व‌ला जीर्ण आभाळी डोहात‌ कालिया डोले ज‌ल‌ ग‌र्द‌ दाट‌ शेवाळी क्ष‌ण‌ दीर्घ‌ खोल‌ विव‌रातिल‌ अंधार‌युगाचा साक्षी निस्तेज‌ होत‌ न‌क्ष‌त्रे स्व‌र‌ म‌ंद्र‌ मार‌वा प‌क्षी र‌ंध्रात‌ काळीमा झ‌र‌ता आळ‌वी अनामिक‌ कोणी मृग‌तृष्णा अंत‌र्यामी ज‌र‌तारी चिर‌विर‌हीणी उन्मुक्त‌ विषातिल‌ ग‌हिरे ते शीत‌ल‌ म‌ंद‌ उखाणे मुर‌लीने भुल‌ता कान्हा अश्व‌त्थ‌ गात‌से गाणे

ती पहा पडली गझल...

लेखक सत्यजित... यांनी सोमवार, 15/05/2017 23:59 या दिवशी प्रकाशित केले.
ती पहा पडली गझल ती,जीव गेल्यासारखी दादही यावी इथे,तर..लाच देल्यासारखी!? पावसाचे थेंब..वणवा,तू नको काही लिहू... जाणिवांची जाग मेल्याहून मेल्यासारखी! कोपऱ्यावरती गुलाबी पिंक कोणी टाकते रंगते मैफील इथली पान-ठेल्यासारखी! हो!जरा साशंक होतो,पाय अडखळताच मी जिंदगी जल्लोष करते,बाद केल्यासारखी! काय मी जगलो जरासा!जिंदगी वेडावली लागली मागेच माझ्या,ती झमेल्यासारखी! —सत्यजित
काव्यरस

शब्द. ..

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 15/05/2017 21:28 या दिवशी प्रकाशित केले.
सगळे शब्द कधी कधी साथ सोडून निघून जातात दूर दूर रानात एकटे पळून जातात.. मन घिरट्या घालत रहातं वटवाघळांसारखं पटकन फांदि न मिळणाय्रा.. प्रयत्न करतो मी खूप. शब्दांना पुन्हापुन्हा माझ्या दावणीला बांधायचा. पण ते गेले एकदा,की जातातच. पुन्हा परत भेटेपर्यंत! शब्दांचा हा पाठशिवणीचा खेळ. हेच माझं अटळ प्राक्तन आहे की काय असं वाटेपर्यंत... ते त्याच खेळाचा भाग म्हणून मला करवंदीच्या जाळीअडून डोकावणाय्रा उनाड पोरासारखे लांबून हळूच बघायला लागतात. मी म्हणतो त्यांना "साल्यांनो, या की लवकर माझ्या गळाभेटीला? का असे दुष्टपणे बघता माझ्याकडे.. लांबून.. अगंतूकासारखे?

विरगावचा भोवाडा

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी सोमवार, 15/05/2017 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे मी लहान होतो तेव्हा दरवर्षी आखाजीच्या आसपास चैत- वैशाख महिण्यात आमच्या विरगावला भोवाडा व्हायचा. अजूनही भोवाड्याची परंपरा विरगावला कायम असली तरी पूर्वीसारखं दरवर्षीचं सातत्य आता उरलं नाही. चैत-वैशाख म्हणजे उन्हाळा. उन्हाळ्यात शेतकर्‍यांना फारशी कामं नसतात. म्हणून खेड्यापाड्यांवर उन्हाळ्यातली लोकरंजन भोवाड्याची लोकपरंपरा आताआतापर्यंत टिकून राहिली असावी. मात्र अलिकडे रंजनाचे अनेक माध्यमं उपलब्ध झाल्याने हा लोकपरंपरेचा प्रकार क्षिण होऊ लागला. भोवाडा सुरू होण्याच्या पंधरा दिवस आधीपासून गावकर्‍यांमध्ये भोवाड्याचा उत्साह दिसून येत असे.

इमान...भाग ३

लेखक चिनार यांनी सोमवार, 15/05/2017 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या दोन भागांची लिंक http://www.misalpav.com/node/39750 http://www.misalpav.com/node/39761 झालं ना !! गब्ब्या फ्यामिलीले घेऊन इमानात जाणार हे गोष्ट साऱ्या गावात पसरली.

डोळ्यांची/नजरेची काळजी कशी घ्यावी ?

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 15/05/2017 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
डोळ्यांची/नजरेची काळजी कशी घ्यावी ? मलासे वाटते मनुष्यजातीच्या आजवरच्या इतिहासात कधी नव्हे एवढी दृष्टीविषयक व्याधींची समस्या आजच्या घटकेला निर्माण झालेली आहे. काही काळ आधीपर्यंत नेत्रविकार तज्ञांकडे वयस्क आणि वृद्ध लोक जास्त आलेले दिसत. आताशा लहान वयाच्या मुला-मुलींचा भरणा जास्त दिसतो, ही बाब अत्यंत चिंतादायक आहे. हल्ली कुणाकडेही जा, लहान मुले मोबाईल वा टीव्हीला चिकटलेली दिसतील. अगदी आठ-दहा महिने वयाच्या बाळांना देखील दूध पीताना वा काही खाताना कार्टून लावून दिले नाही, तर ती खात-पीत नाहीत, असे त्यांच्या आया सांगताना दिसतात.