Skip to main content

आगरी विवाहसोहळ्यातील पारंपरिक वडे

लेखक जागु यांनी गुरुवार, 18/05/2017 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
आगरी जमातीमध्ये लग्न म्हणजे एक धुमशान सोहळा. दाग-दागिने, थाट-माट, असंख्य पाहुण्यांची गजबज त्याच बरोबर आगरी लोकांचे लग्नातील खास जेवण व भोकाचे वडे हे विशेष असते. हे भोकाचे वडे उरण येथे जास्त प्रचलित आहेत. लग्न ठरताच लग्नाच्या तयारीच्या चर्चेत वड्यांची चर्चा अग्रेसर असते. ऐपत व आप्तांच्या गोतावळ्यानुसार वड्यांच्या मापनाचा अंदाज घेतला जातो.

कोणता कोर्स निवडावा?

लेखक उपयोजक यांनी गुरुवार, 18/05/2017 14:32 या दिवशी प्रकाशित केले.
जून महिना येतोय.अॅडमिशनचा महिना.माझ्या एक मित्राला जो १२ वी झालाय,त्याला कोर्स निवडण्यासाठी थोडी मदत करा. इलेक्ट्रीकल/इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंशी त्याची खटपट चालू असते.कधी दुरुस्त होतात तर कधी ज्ञान कमी पडतं.घरची परिस्थिती तशी बेताची असल्यानं एखादा अल्पमुदतीचा(३/६ महिने)तांत्रिक कोर्स करुन अर्थार्जन करण्याचं ठरवलंय. थोडी शोधाशोध करुन तीन कोर्स निवडले आहेत. १ होम वायरींग २ मोटर आर्मेचर वायंडींग ३ नेटवर्कींग(CCNA) यापैकी कोणत्या कोर्सला चांगली मागणी आहे?नोकरी कुठे उपलब्ध होऊ शकते? ज्याला सखोल ज्ञान आहे.त्या व्यक्तीला मागणी असणार हे उघडच आहे,तरीही बाजारभाव हा सुध्दा बघितलाच पाहिजे.घेत

रीमा लागूू . . . . भावपूर्ण श्रध्दांजली !

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी गुरुवार, 18/05/2017 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
रीमा लागू यांचे हृदयविकाराने निधन . . . . अनपेक्षित . . अचानक . . . या बातमीनं त्यांच्या एक से बढकर एक भूमिका डोळ्यासमोर येत आहेत . . . . नाटक ,चित्रपट, टेलिव्हिजन या सगळ्या माध्यमातून आपली वेगळी छाप सोडणारी अष्टपैलू अभिनेत्री आता आपल्याला परत दिसणार नाही याचं मनापासून वाईट वाटतं आहे . . . . विनोदी ,गंभीर, कारुण्यपूर्ण अशा कुठल्याही भूमिकेसाठी ती नेहमीच योग्य होती . . . . नावातच "मा"असल्याने आईची भूमिका तिने यथायोग्य वठवली . . . . . "माझं घर माझा संसार" मधली तिची वास्तवाजवळ जाणारी भूमिका दुसऱ्या कुणालाही शोभून दिसली नसती . . .

इमान...भाग ५

लेखक चिनार यांनी गुरुवार, 18/05/2017 09:55 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या चार भागांची लिंक http://www.misalpav.com/node/39750 http://www.misalpav.com/node/39761 http://www.misalpav.com/node/39789 http://www.misalpav.com/node/39798 गब्ब्यानं पाच-दहा मिनिट टाईमपास केला. आतमध्ये जाची त्याची काही हिम्मत होयेना. त्याची बायको म्हनली, "आव चाला की आतमंदी" "हाव..जाऊ ना" गब्ब्यानं तिकीट अन आधार कार्ड शोधाले बॅग उघडली. पाच मिनिट झामल झूमल केल्यावर त्याले पाकीट सापडलं.

पुरणपोळी

लेखक सविता००१ यांनी गुरुवार, 18/05/2017 00:21 या दिवशी प्रकाशित केले.
. प्रत्येक घरात बनवल्या जाणार्‍या खास पदार्थांची एक खास अशी कृती असते आणि तो पदार्थ तसाच बनला तरच तो घरच्या सगळ्यांना आवडतो. माझं घरही याला अपवाद नाहीच. आता पुरणपोळी हा काही मुद्दाम लिहिण्याचा प्रकार नव्हे. कारण प्रत्येक घरी ती बनतच असते. त्यामुळे इथून तिथून सर्वसाधारण सारखीच पाककृती असणार. तरीही विकत मिळतात तशा अगदी पातळ पुरणपोळ्या आमच्या घरात कुणालाच आवडत नाहीत. पोटात पुरण अगदी ठासून भरलेली आणि साजूक तुपासाठी अजिबात हात आखडता न घेतलेली ही पुरणपोळी माझ्याकडे बनते. तीच कृती तुमच्याकरता मी इथे देतेय.

फौजी

लेखक Vinayak sable यांनी बुधवार, 17/05/2017 22:14 या दिवशी प्रकाशित केले.

वादळ उगा निमाले..

लेखक राघव यांनी बुधवार, 17/05/2017 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
छंदात मांडते ती, शब्दार्थ जाणीवेचा.. कवितेस ना कळाले, "स्व"-रूपात काय होते! जागून शब्द गेले..लिंपून आस गेली.. ते दग्ध वासनांचे उसनेच पाय होते.. आक्रंदतात सारे, जड-सोबती जीवाचे.. जन्मांतरी न तुटले, ते पाश काय होते? वादळ उगा निमाले पणतीस पाहण्यासी.. आता फिरून उठणे, कष्ट:प्राय होते..! -- माझ्यासवेच होते, मय-विश्व कल्पनांचे.. पण प्रेरणा कुणाची? ते भाव काय होते?? राघव

फौजी

लेखक Vinayak sable यांनी बुधवार, 17/05/2017 22:13 या दिवशी प्रकाशित केले.

फौजी

लेखक Vinayak sable यांनी बुधवार, 17/05/2017 22:13 या दिवशी प्रकाशित केले.