Skip to main content

खानदेश...!

लेखक हर्षु यांनी गुरुवार, 11/05/2017 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
काहि दिवसांपुर्वी एका लग्नाच्या निमीत्ताने जळगाव ला जाण्याचा योग आला. मराठवाड्याबाहेर जाण्याची तशी हि तिसरी - चौथी वेळ, पण आधी बघीतलं ते पुणंच. तिथले ते प्रवेश करताच दिसनारे माॅल्स, अजस्ञ रस्ते माझ्या शहरी मनाला खुप भावायचे. पण माझ्या ह्या खानदेश वारीनं माझ्या डोळ्यवरली ती माॅल ची झापडं पार उतरवली. तसं फार काहि नाहि पाहिलं मी तिथं, पण जे दिसलं ते नक्कीच मनाला सुखावनारं होत.

भाग ३ श्रीसाईसच्चरित - शब्दार्थ आणि भावार्थ

लेखक aanandinee यांनी गुरुवार, 11/05/2017 21:15 या दिवशी प्रकाशित केले.
। ॐ कृपासिंधु श्रीसाईनाथाय नमः । भाग ३ अध्याय १, ओवी ४३ ते ७७ जेवणाअखेरी आपण जसे डेझर्ट घेतो तसा गुरुमहिम्याचा गोड घास हेमाडपंतांनी मंगलाचारणाच्या शेवटी ठेवला आहे. गुरुकृपेचा नवलावा वर्णन करताना त्यांच्या वाणीला अधिकच गोडवा आला आहे. 'मै तेरा तू मेरा, भाव यही दृढ हो' हे हेमाडपंतानी आचरणात उतरवलं आहे. हेमाडपंत म्हणतात की सद्गुरु आपल्याला मोक्षाकडे कसा नेईल तर 'ढकलत नेईल'. आई जशी लेकराचं कल्याण करणारच मग लेकराची इच्छा असो किंवा नसो!

बिडी जलायले.....: नाशिकचा उद्योग ०६

लेखक सुधीर मुतालीक यांनी गुरुवार, 11/05/2017 19:42 या दिवशी प्रकाशित केले.
( उत्तरार्ध ) : नाशिकच्या आर्थिक आणि सामाजिक बदलाबरोबर नाशिकचा भूगोल बदलायची ही सुरुवात होती. कारण पारंपरिक किंवा जाती किंवा वर्ण व्यवस्थेवर आधारित करण्याच्याच्या व्यवस्थेला नाशिकपुरते तरी बिडी व्यवसायानेच एका अर्थाने सुरुंग लावला. विशेषतः बहुजन समाजातल्या विशेषतः मागास जातीतील कुटुंबाना त्यांच्या पारंपरिक व्यवसायाव्यतिरिक्त पैसे मिळवण्याची पहिली संधी बिडी उद्योगानेच दिली ही एका अत्यंत महत्वाच्या स्थित्यंतराची सुरुवात होती. आपापली कामे झाल्यावर उरलेल्या वेळात सुरुवातीला बिडीच्या कारखान्यात जाऊन काम करण्याची संधी विशेषतः बहुजन समाजाच्या लोकांना मिळत असे.

इमान... भाग १

लेखक चिनार यांनी गुरुवार, 11/05/2017 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
"आपल्याले येकडावं तरी इमानात बसाचं हाय गड्या." डोस्क्यावरून उडणाऱ्या इमानाकडं पाहत गब्ब्या म्हनाला. "येडा झाला का बे तू..तुले कोन घीन का इमानात?" "काऊन? तिकीट काडल्यावर तं घ्याच लागीन नं त्याईले." "असं नाय घेत बे कोनाले. इंग्लिश लोकं असतेत तिथं." "म्हंजे?? अन तुले काय म्हायती बे?? तिकिट काडून यष्टयीत बसतो तसं इमानात बसाचं." "यष्टयीसारखं नसते बे..यष्टयीत नीरा कोंबतेत लोकाईले..हा त्याच्या उरावर..थो दुसऱ्याच्या मांडीत..तीन शिटावर सहा-सहा लोकं बसतेत. इमानात जेवढ्या शिटा तेव्हढेच माणसं असते. म्हणून तर आपल्यासारख्याले घेत नाही आतमध्ये.

ख्रिस्त

लेखक अरूण गंगाधर कोर्डे यांनी गुरुवार, 11/05/2017 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
शांततेचे गात गाणे अवतरलासी तू भूवरी या पिचलेल्या गरिबांचा क्रूस वाहिलास खांद्यावरी या प्रेम दिधले तू जगाला वेदना पचवूनीया का न समजली दयार्द्रता तुझी तुला खिळवणाऱ्या राक्षसांना अजूनही संहार होतो भाविकांचा प्रेमळ जनांचा क्रूरपणे गिळता तयांना दिसेल का क्रोध लाजताना नसती जरी सगळेच प्रेषित तुझ्यापरी देवाचे सुत का प्रयत्नांना आज त्यांच्या कुचेष्टेचे बिरुद लाभे हात मी निढळावरी लावुनी उभा इथे शतकानुशतके वाट तुझी पाहताना देह पंचत्वी विलीन होतसे
काव्यरस

जिंदगी या बायकांची,राळ आहे का?

लेखक सत्यजित... यांनी गुरुवार, 11/05/2017 00:10 या दिवशी प्रकाशित केले.
वृत्तपत्रातून इतका जाळ आहे..का? बातम्यांचा एवढा दुष्काळ आहे का? शेत आहे काळजाचा एक तुकडा पण कर्ज म्हणजे नांगराचा फाळ आहे का? वास्तवाच्या विस्तवाशी खेळतो आहे तो कुणी त्या अंजनीचा बाळ आहे का? फुंकली जाते तरी गंधाळते रे ती... जिंदगी या बायकांची,राळ आहे का? आजही तो त्या विटेवर थांबला आहे त्या विटेखाली जगाचा गाळ आहे का? —सत्यजित
काव्यरस

मी....

लेखक यांनी बुधवार, 10/05/2017 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्यात मी ,तुझ्यात मी तरी उरुनी राहिलो शेष मी बंदिस्त मी ,अन मुक्त मी कैदेतले ही स्वातंत्र्य मी शांत मी ,उद्विग्न मी ह्या भावनांचे काहूर मी आरंभ मी, अन अंत मी पोहोचायचे ते गंतव्य मी त्या गंतव्या पल्याड मी त्याचा ठाव घेणारा शोध मी शून्य मी ,संपूर्ण मी राहतो पुन्हा अपूर्ण मी अनादी मी ,अनंत मी सचित्तातला आनंद मी असलो सर्वत्र विखुरलेला तरीही माझ्यात पूर्ण मी नादात घुमतो झंकार मी अनाहत नाद ओंकार मी ----© ओंकार जोशी

प्रेमाचं गणित

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी बुधवार, 10/05/2017 18:12 या दिवशी प्रकाशित केले.
तुझं शंकुसारखं धारदार नाक शुभ्रवर्णी दंतमाला अन हसल्यावर उमटणारा गालावरचा पॅराबोला इंटिग्रेशनच्या चिन्हासारखे तुझे लिमिटबद्ध लांबसडक केस डोळ्यांमधले कूटप्रश्न अन देहबोलीचे अॅनालॉग संदेश
काव्यरस

मिपाकरांचा "शेती" विषयक माहितीच्या आदान प्रदानासाठी व्हॉट्स-अप गृप.....

लेखक मुक्त विहारि यांनी बुधवार, 10/05/2017 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपाकरांनो, काल पासून शेती ह्या विषयात रस असलेल्या, मिपाकरां साठी, एक व्हॉट्स-अप गृप स्थापन करण्यात आला आहे. ज्यांना शेतीची आवड असेल, अशा व्यक्तींनी खालील मिपाकरांशी संपर्क करावा. १. सुखी (मोबाईल नंबर =====> ९७६६३१४९५१) २. अभिजित अवलिया (मोबाईल नंबर ====> ९१५८००९८४६) आपलाच, मुवि

पिझ्झारट्टू

लेखक सरनौबत यांनी बुधवार, 10/05/2017 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
साऊथ इंडियन (दाक्षिणात्य) पदार्थ म्हणलं कि इडली, डोसा, उत्तपा आणि वडा सांबार ह्याच गोष्टी पट्कन माझ्या डोळ्यासमोर येतात. हे पदार्थ मुख्यतः पुण्यातील प्रसिद्ध शेट्टी हॉटेल्स (वैशाली, रूपाली त) खाल्ले. त्यामुळे ह्या व्यतिरिक्त इतर दाक्षिणात्य पदार्थांचे माझं नॉलेज अतिशय मर्यादित. पूर्वी आतासारखं इडली-डोश्याचं तयार पीठ मिळायचं नाही. त्यामुळे ह्या गोष्टी घरी करायला पूर्वतयारी लागायची. प्रत्येकाचा इडली रवा आणि उडीद डाळीच्या प्रमाणाचा 'फॉर्म्युला' असायचा. ज्याची इडली एकदम 'हलकी' (वजनाला, दर्जाने नव्हे!) त्यांच्याकडून तो फॉर्म्युला मिळवायचा.