विंटर स्पोर्ट - स्कीईंग...भाग२
भाग १
पहिल्या लेसनमध्ये काहीच पडझड न झाल्यामुळं मी दुसऱ्या लेसनची उत्साहात वाट बघत होते. लौकर उठून पटापट आवरून निघालो, जरा आधी पोचलो तर जाऊन थोडी उतारावर थांबायची प्रॅक्टिस करता येईल असा माझा विचार होता. पण पीक सीजन असल्यामुळं स्काय लिफ्टसाठी भली मोठी रांग होती. डोंगराच्या पायथ्यापासून ते स्की एरियापर्यंत पोचायला ८ मिनिटे लागतात. यथावकाश आमचा नंबर लागून आम्ही स्की एरियामध्ये पोचलो तोपर्यंत आमच्या टीम ने थोडी प्रॅक्टिस करायला सुरुवातही केली होती.
मिसळपाव