मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हिंदोळे

बिपीन सुरेश सांगळे ·
लेखनविषय:
हिंदोळे आज तिचं लग्न होतं . तिचं - जिच्याशी त्याला लग्न करायचं होतं . होतं ! कारण सकाळीच तिचं लग्न लागलं होतं आणि आता तर संध्याकाळ झाली होती . दिवसभर त्याने कसातरी तळमळत काढला होता . तो बाहेर पडला. हवा अजूनही उष्ण श्वास सोडत होती . त्याच्या मनातही उष्ण खळबळ. तो उगा इकडे- तिकडे भटकत राहिला . दुकानं , माणसं, गर्दी पहात . त्याच्या डोक्यात मुळात काही घुसतच नव्हतं . तो चालत एका बारपाशी आला . जुनाट ,कळकट बार .रया गेलेला . आधी त्याच्या ते लक्षातही आलं नाही . इतकं त्याचं डोकं गच्च झालेलं होतं . त्याच्या नकळत तो आत शिरलादेखील . एक मात्र होतं - आत गार्डन होतं . निवांत बसण्याची सोय होती.

भल्याभल्यांसाठी आव्हान ठरणारं रोलँ गॅरोस

पराग१२२६३ ·
लेखनविषय:
पॅरीसमधील रोलँ गॅरोस टेनिस संकुलात (Roland Garros Tennis Complex) यंदाच्या टेनिस हंगामातील दुसरी ग्रँड स्लॅम स्पर्धा सुरू झालेली आहे. क्ले कोर्टवर खेळवली जाणारी ही एकमेव ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा. इथल्या लाल मातीची कोर्ट्स अग्रमानांकितापासून बिगरमानांकित खेळाडूंची कायमच शारीरिक, मानसिक कसोटी पाहत आलेली आहेत. त्यामुळे रोलँ गॅरोस संकुलातील मध्यवर्ती कोर्ट असलेल्या फिलीप चॅर्टिएर कोर्टावर (Philippe Chartier) आजवर अनेक धक्कादायक आणि अनपेक्षित निकाल पाहायला मिळालेले आहेत.

बाजारगप्पा-भाग-४

मारवा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
३- आता बघा सर्वात अगोदर आपली मॅक्स लॉस अमाऊंट जी आहे ती पुर्णपणे आपल्याला अंतिमतः सहन करता येइल अशी आपण घेत आहोत. आणि त्या मॅक्स लॉस पर्यंत पोहोचणंच च आपण फार लांबवत आहोत. कारण की आपण भाग २ मधील तक्ता बघा ज्या न्युट्रल स्टेज ला आपण सुरुवात करतो तिथे आपले एकुण नंबर ऑफ ट्रेडस ३० आहेत. म्हणजे त्याचा रिस्क पर ट्रेड १००० रुपये आहे.आणि रीस्क पर ट्रेड इन % जी आहे ती ०.३३% इतकी आहे.

बाजारगप्पा-भाग-३

मारवा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मागील दोन्ही भाग वाचला नसेल तर विनंती आहे की पहील्या भागापासुन वाचुन घ्या नाहीतर काहीच कळणार नाही. तर मागील भागात आपण एक मनी मॅनेजमेंट कशी करावी ते बघितले त्यालाच आता पुढे नेऊन जाऊ. तर मागे म्हणालो तसे मनी मॅनेजमेंट आणि माइंडसेट हे क्लोजली इन्टरकनेक्टेड आहेत. जसे शरीर आणि मन. पण शरीर समजा मनी मॅनेजमेंट आहे आणि माइंडसेट मन च आहे की. तर तुम्ही बघा सुरुवात शरीराकडुन करणे सोपे आहे तुम्ही आंघोळ केली तुमच्या मनाला फ्रेश वाटेल तुम्ही संभोग केला तुमच्या मनाला आनंद होइल. तर शरीराकडुन सुरुवात करत मनाला नियंत्रित करणे तुलनेने सोपे आहे. आणि दोन्ही एकच आहेत.

परत एकदा हिमालयाच्या कुशीत - ४

प्रसाद गोडबोले ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
२२ मे २०२४ आज ध्यानाचा तिसरा दिवस. आज इथं येऊन चार दिवस पुर्ण झाले. आता असं वाटतं की जणु आपण कित्तीतरी काळापासुन इथेच होतो. आयुष्याला एक रीतसर दिनचर्या प्राप्त झाली आहे, नित्यनेम प्राप्त झाला आहे. एखाद्या जागी तुम्ही फोटो घ्यायचे बंद केलेत की समजुन जावं की आता तुम्ही तिथं रुळला आहात! आता संपुर्ण वेळ ध्यान , योग आणि चिंतन बस इतकेच ! ध्यानगृहातुन दिसणारा नजारा : (इथे समोर जे छत दिसत आहे त्या इमारतीचे नाव होते रामकुटीर. सर्वात अफलातुन व्यु होता त्या तिथुन, पण मला तिथे रहायचा योग आला नाही.

तो

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
दूरवरून दिसणारा अथांग तो! नेहमी ओढ लावणारा! राजापूरकडून देवगडला संध्याकाळी येत असताना पश्चिमेकडे दूरवर चमकताना दिसणारा तो! नीट बघितल्यावर दूरवर दिसणारी त्याची लांब पसरलेली निळी पट्टी! त्याची भव्यता आणि त्याचा विस्तार! कधी कधी अगदी जवळ येईपर्यंत न दिसणारा आणि ऐकूही न येणारा तो! इतका अजस्र असूनही त्याचं त्याच्या मर्यादेतलं असणं! सध्या कोकणात देवगडला एका निवांत जागी राहण्याचा व परिसरामध्ये फिरण्याचा योग आहे. इतका शांत आणि अप्रतिम निसर्ग. निसर्गाच्या जवळ येणं एक प्रकारे ध्यानाचा अनुभव देऊन जातं. आज देवगड- कुणकेश्वर किनारी रस्त्याने सायकल चालवण्याचा आनंद लुटला. अक्षरश: लुटला. स्वर्गसुख.

जल्लोष (निवडणूक निकाल स्पेशल)

आजी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
निवडणूक मग ती विधानसभेची असो की लोकसभेची, मी खूप उत्सुक, उत्साही आणि अधीर होते. मतदानाचा दिनांक जाहीर होतो आणि तो माझ्या पक्का लक्षात राहतो. ती तारीख जवळ येत चालली की माझा उतावीळपणा वाढत जातो. "आपली नावं आहेत ना मतदारयादीत? चेक करा. तुम्ही खात्री करून घेतली आहे ना? मतदान केंद्र नेहमीचंच ना? सकाळी लवकर जावून मतदान करुन येऊया हं! उशीर नको. आपला पहिला नंबर हवा. पहिला चहा, ब्रेकफास्ट मतदानानंतर करायचा." .. अशी कटकट मी घरच्यांच्या कानाशी सुरु करते आणि तेही होकार देऊन देऊन बेजार होतात.

टूलकिट्स : २०२४ ते २०२९

प्रसाद गोडबोले ·
प्रस्तावना : तुर्तास आम्ही आमच्या हिमालयातील भटकंतीवर सविस्तर, प्रांजळ आणि कोणत्याही प्रकारे राजकारण विरहीत अशी लेखमालिका लिहिण्यात व्यग्र होतो मात्र तिथेही काही लोकांनी येऊन प्रतिसादात स्कोअर सेटलिंग करायला सुरुवात केली तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने डोक्यात चमकुन गेली. मी ज्या आश्रमात रहात होतो तेथुन जवळच्याच एका पुरातन मंदिरात खुद्द स्वामी विवेकानंद ह्यांनी त्यांच्या साधना काळात येऊन तपश्चर्या साधना केलेली होती .

बाजारगप्पा-भाग-२

मारवा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
तर मागील भागात आपण बघितलं की काही सार्वकालिक सत्ये आह्ते बाजाराविषयीची त्याच चर्चेला थोडं पुढे नेत पुढील महत्वाचे सत्य बघु या. ३-ट्रेडींगमध्ये दिर्घकाळ सातत्याने यशस्वी होण्यासाठी पामुख्याने तीन घटकांची आवश्यकता असते.1-money management 2-mindset 3-method. सर्वसाधारणपणे तुम्ही कुठल्याही दिर्घकाळ सातत्याने यशस्वी ट्रेडर्स ची पुस्तके किंवा मुलाखती बघितल्या वा चर्चा केल्यास वरील तीनही घटकांच्या आवश्यकतेबाबत सर्वामध्येच एकमत असते आणि ते खरेच आहे. यात प्रत्येक घटकाचे योगदान किती टक्के असते यावर वेगवेगळ्या ट्रेडर्स मध्ये मतभेद आढळतील.