चेलिया
लेखनप्रकार
चेलिया
परवा रात्री माझी मुलगी बँकॉक वरून आपल्या मामा कडून परत येत होती तिला आणायला मी छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेलो होतो. विमान पोहोचे पर्यंत तेथे काय करायचे म्हणून सहारला वळायच्या रस्त्यावर गाडी उभी केली आणि समोर असलेल्या हॉटेलात कॉफी प्यावी म्हणून गेलो. तेथे असलेल्या पेनिन्सुला आणि पर्शियन दरबार या तारांकित हॉटेलच्या शेजारी असलेले एक छोटेसे हॉटेल म्हणजे हॉटेल न्यू एअरपोर्ट.
सौ. बरोबर होती तिला घेऊन या हॉटेलात शिरलो. गल्ल्यावर एक मुसलमान मालक होता त्याने हसून स्वागत केले.
पहिल्यांदा कॉफी प्यावी असा विचार होता पण समोरची फळे पाहून एक मोसंबीचा रस प्यावासा वाटला म्हणून तो मागवला. दाट आणि रुचकर असा मोसंब्यांचा रस पिऊन मन तृप्त झाले. तेथील वेटर आम्हाला अजून हा पदार्थ घ्या, तो पदार्थ घ्य,, असा आग्रह करत होता. मेनूकार्ड पण हे भले मोठे होते आणि जागेच्या मानाने दर अतिशय किफायतशीर होते. जेवण झाले आणि मोसंबीचा रसही पिऊन झाला असतानाही बायकोने फ्रुट सॅलड विथ आईस्क्रीम मागवले. ते एका भल्या मोठ्या काचेच्या बाउल मध्ये आले. फोटो खाली दिला आहे.
किंमत १४५ रुपये फक्त
खरं तर एवढ्या मोठ्या भांड्यातील फ्रुट सॅलड म्हणजे माझे अक्खे जेवणच होईल असे होते. आंब्याच्या रसात आणि कस्टर्ड मध्ये फळांचे तुकडे ज्यात चिबूड चिकू सफरचंद पेअर आणि बिया नसलेले कलिंगड होते. वर क्रीमची पेरणी त्यावर ड्राय फ्रुट्स टूटीफ्रूटी व्हॅनिला आईस्क्रीम आणि वर चेरी. हे सर्व खात असताना त्या मालकाशी गप्पा मारल्या. त्यांच्या मेनू कार्डात लखनौ पासून हैदराबाद पर्यंत सर्व ठिकाणचे पदार्थ होते पावभाजी पासूनमुघलाई लखनवी हैदराबादी चायनीज कॉंटिनेंटल असा भरगच्च मेनू होता. वेटर पासून मालकापर्यंत सर्व जण अतिशय अगत्यशील होते. आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी हॉटेल रात्री अडीच पर्यंत चालू असते.
उस्मानभाईना (मालक) विचारले तुम्ही लखनौचे का?
त्यावर उस्मानभाई म्हणाले कि आम्ही चेलिया समाज गुजरातच्या पालनपुरचे. हा समाज कोणता याची मला काहीही माहिती नव्हती. ते म्हणाले साहेब आमच्या समाजाची मुंबई पासून गुजरात पर्यंत असंख्य हॉटेले आहेत. मुंबई अहमदाबाद महामार्गावर दर दोन चार किमी अंतरावर आमच्याच लोकांची हॉटेले आहेत.
या चेलिया समाजाबद्दल मला बरीच उत्सुकता लागून राहिली होती. मी त्याना अजून प्रश्न विचारले त्याची त्याने प्रांजळपणे उत्तरे दिली. ती अशी
आमचे लोक अतिशय मेहनती प्रामाणिक आहेत पण शिकलेले नाहीत. बहुसंख्य हॉटेले हि समाजातील लोकांच्या पैशावरच उभी राहिलेली आहेत. कोणताही लेखी करार नसताना हि बहुसंख्य हॉटेल व्यवस्थित चालू असून त्यात फसवाफसवी किंवा पैसे बुडवणे अजिबात होत नाही. खेड्यातील लोक सुद्धा आपले पैसे हॉटेलच्या धंद्यात टाकून त्यातून उत्पन्न आणि रोजगार मिळवतात. कुणीही हॉटेल चालू करायचे म्हणाला आणि पैसे नसले तरी समाजातील श्रीमंत लोक त्या हॉटेलात भागीदारी पत्करून त्याला भांडवलाची मदत करतात. धंद्यात मेहनत खूप आहे पण कष्ट करायची तयारी असेल तर त्याचे फळ तुम्हाला अल्ला देतोच.
आमच्या समाजातील गरीब मुलेच आमच्याकडे वेटर म्हणून कामाला येतात. येथे सर्व काम शिकून एक दिवस आपले स्वतःचे हॉटेल उभे करायचे हे स्वप्न घेऊन. अशाच मुलांनी आता महाराष्ट्र कर्नाटक पासून केरळ पर्यंत हॉटेले उभी केली आहेत. गुजरात मध्ये तर अनेक हॉटेलस शुद्ध शाकाहारी आहेत. जेथे जशी सेवा पाहिजे तशी आम्ही पुरवतो. आम्ही आमच्या हॉटेलात बीफ ठेवतच नाही. आमचा समाज हा शिया मुसलमान शाखेच्या मोमीन जमातीत मोडतो. साधारणपणे लग्नं जमातीतच होतात. आमचे लोक फारसे शिकत नाहीत हि खंतहि त्यानी बोलून दाखवली कारण अशिक्षित म्हणून सरकार दरबारी फार नाडले जातो आणि जेथे तेथे कोणत्याही परवान्यासाठी सरकारी अधिकारी सारखे पैसे मागतात पण आजचे नवीन तरुण शिकायला लागले आहेत हि एक समाधानाची बाब आहे.
जालावर खोदकाम करताना या समाजाबद्दल एक दुवा सापडला. आणि त्यात आश्चर्य म्हणजे उस्मानभाई सांगत होते तीच माहिती मिळाली. जाणकार हा दुवा वाचू शकतात. आपल्या देशाच्या विविधतेमधील हा एक समाज ज्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही त्याबद्दल माहिती व्हावी म्हणून हा लेख लिहिला आहे.
http://indiatoday.intoday.in/story/chelia-muslims-of-north-gujarat-become-synonymous-with-restaurant-business-in-western-india/1/306088.html
जाता जाता -- कट्टा करण्यासाठी हि एक अतिशय उत्तम जागा आहे. मुंबई पुण्यातून आपण आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाण्यासाठी फार लवकर निघतो आणि मग विमानतळावर पोहोचल्यावर काय करायचे हा एक मोठा प्रश्न पडतो. हे हॉटेल केवळ अर्ध्या किमी अंतरावर आहे त्यामुळे देशाबाहेर जाताना किंवा येताना कट्टा करण्यासाठी अतिशय उपयुक्त जागा आहे. शिवाय तेथील साकीनाक्याच्या रहदारीची कटकट टाळायची असेल तर मुंबईच्या लोकांना अंधेरी किंवा घाटकोपर हुन मेट्रोने येता येईल. हे हॉटेल मेट्रो स्थानकाच्या समोरच आहे.
वाचने
10496
वाचनखूण
प्रतिक्रिया
36
अरे वा! हॉटेल तर उत्तम असावे
छान
वा . . . . . नवीन माहिती मिळाली !
छान
चांगली माहिती. हॉटेल मध्ये
अरे वा! बरं झालं समजलं या
काय आठवण काढलीत. मस्त आहे हे
छान अनुभव.
In reply to छान अनुभव. by अत्रे
सगळीकडेच असे काही नसते,
In reply to सगळीकडेच असे काही नसते, by अभ्या..
माहितीसाठी धन्यवाद. (बादवे मी
In reply to माहितीसाठी धन्यवाद. (बादवे मी by अत्रे
हॉटेल चालवायचे तर राजकारणी
In reply to हॉटेल चालवायचे तर राजकारणी by सुबोध खरे
हॉटेल चालवायचे तर राजकारणी
In reply to हॉटेल चालवायचे तर राजकारणी by अत्रे
तसा काही नसते. सरळ येऊन कुणीच
छान माहिती
डॉक, लेख आवडला. मस्त लिहिलेय.
एक वेगळीच माहिती मिळाली. छान
लेख आवडला.
उपयुक्त माहिती .
1980 च्या दशकात हि जात
In reply to 1980 च्या दशकात हि जात by वरुण मोहिते
अशाच गुजरात मधून आलेल्या
In reply to अशाच गुजरात मधून आलेल्या by अभ्या..
खुप दिवसांनी ह्या हॉटेलची
In reply to अशाच गुजरात मधून आलेल्या by अभ्या..
सोलापुरात अशाच एका
In reply to सोलापुरात अशाच एका by आदूबाळ
मुन्नाभाई MBBS ची आठवण झाली
In reply to सोलापुरात अशाच एका by आदूबाळ
हा ना, पण बावाजी लैच टेरिफिक
In reply to अशाच गुजरात मधून आलेल्या by अभ्या..
बोहरा??
छान लेख.
डाॅक लेख
उपयुक्त माहिती.
उपयोगी माहिती. नोंद करून
हॅाटेलमध्ये जाण्याची शक्यता
लवकरात लवकर ह्या ठिकाणाला भेट देणार....
फोटो दिसत नाही.
नोंद घेण्यात आलेली आहे. पुढील
फोटो दिसत नाही.
छान धागा.
उत्तम