#अनुभव#
नमस्कार ;
माझे हे पहिलेच लेखन सूचनांचे स्वागत
अवाजवी टीका खपवून घेतली जाणार नाही नोंद घेणे.
गेल्या वर्षीच्या जानेवारीची गोष्ट. वाडवडिलांची पुण्याई जमिनीच्या रूपात भेटलेली त्यामुळे आमचा शेती हा बाजूउद्योग सुरू असतो . दिवसा संगणक दुरुस्ती व रात्री भिजवणी असा रुटीन ठरलेला होता .
हरभरा जोमात आलेला पण पावसाने थोडा दगा दिला त्यावर उपाय म्हणून तुषार सिंचन सयंत्र जोडण्याचा निर्णय एकट्याच्या बहुमताने मंजूर केला. आता खरी पंचायत अशी होती की मायबाप
महावितरण रात्री 12 वाजता "थ्ररी फ़ेज" लाइट सूरू करते , म्हणून मी व आमचे मित्र संभाजी राव दोघे 11 वाजता रानात हजर झालो.
आता तुमच्या पासून काय लपवायच ,खर म्हणजे मी पहिल्यापासून हलक्या काळजाचा त्यात रात्रीची वेळ आणि वरून लाइट नाही त्यामुळे जीव मुठीत धरून शेकोटी शेजारी 12 वाजण्याची वाट पाहत बसलो होतो.
लाइट आल्यावर संभा मोटार चालू करायला विहिरीकडे गेला व मी तुषार जोडणी करायला म्हणून हरभऱ्याच्या उभा राहिलो. अचानक मला खालच्या बांधावर हालचाल जाणवली भीतीने अंगावर काटा उभा राहिला बघतो तर एक मानवी आकृती जवळ येत होती अंधारात चेहरा दिसत नव्हता पण कोणीतरी शेजारचा शेतकरी असेल अस वाटल.संभा आला का म्हणून मागे वळून बघितले तर संभाच्या विजेरीचा उजेड दिसला आणि माघून धाड असा आवाज आला वळून बगतो तर आकृती गायब. जिवाच्या आकांतानी मी पळत पळत संभाजीला जवळ गेलो व तिथेच माजी बेशुद्ध पडलो
सकाळी जाग आली तेव्हा घरी होतो आज वर्ष झालं तरी शेतात रात्री पाय ठेवत नाही
मनाचे भास म्हणा किंवा भ्रम पण
घडल ते असच घडलं
याद्या
5036
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
अहो पण सकाळी विचारलंत की नाही
अप्रतिम लिहीलं आहे. अगदी
काय हे सर . . . .
In reply to अप्रतिम लिहीलं आहे. अगदी by सतिश गावडे
अवाजवी टीका खपवून घेतली जाणार
In reply to काय हे सर . . . . by माम्लेदारचा पन्खा
मंडळ आपलं आभारी आहे
मंडळाचे पण आम्ही आभारी आहोत.
In reply to मंडळ आपलं आभारी आहे by भित्रा ससा
नशिबवान आहात. घरगुती
मी पवनचक्कयांवर इंजिनिअर
अगागा!
तेच तर.. एवढं स्पष्ट लिहिताय
In reply to अगागा! by पैसा
??
संभ्याची डायरी..
खतरनाक :)
In reply to संभ्याची डायरी.. by योगी९००
हा! हा! हा! ह.ह.पु.वा.
In reply to संभ्याची डायरी.. by योगी९००
हा! हा! हा! ह.ह.पु.वा.
In reply to संभ्याची डायरी.. by योगी९००
अगगगगा!
In reply to संभ्याची डायरी.. by योगी९००
लोक! =))
In reply to संभ्याची डायरी.. by योगी९००
ऑ! ह्या लेखनात टीका
खरंच भित्रा?