मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

'रमलप्रतिमा (भाग २) अर्थात नवीन काही AI चित्रे ( Prompt सह)

चित्रगुप्त ·
यापूर्वीच्या सांजशकुनाच्या रमलप्रतिमा: एक नवाच उद्योग (भाग-१) दिलेल्या चित्रांनंतर गेल्या काही दिवसात आणखी बरेच प्रयोग केले, त्यापैकी काही चित्रे: चित्र १. . चित्र २. . A cinematic view of a picturesque landscape featuring an ancient castle in greek architectural style.

दावत-ए-ईद पेटा इंडिया चा एक स्तुत्य उपक्रम

मारवा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज बकरी ईद चा सण आहे. मुस्लिम धर्मियांचा एक महत्वाचा सण याला इद-अल-अधा असे ही म्हटले जाते.या सणामागील परंपरा साधारण अशी आहे. विकीपेडीया मधुन् अब्राहमच्या जीवनातील मुख्य परीक्षांपैकी एक म्हणजे त्याच्या प्रिय पुत्राचा वध करण्याची देवाची आज्ञा स्वीकारणे आणि त्याचे पालन करणे. कथेनुसार, अब्राहमला स्वप्न पडत होते की तो आपल्या मुलाचा बळी देत ​​आहे. अब्राहामला माहित होते की ही देवाची आज्ञा आहे आणि त्याने आपल्या मुलाला सांगितले, जसे कुराणमध्ये म्हटले आहे,"अरे बेटा, मी तुझा वध करतोय असे स्वप्न मला पडत आहे".

देशद्रोहींच्या उड्या आणि देशप्रेमींनाच सात्विक संतापाचीही चोरी?

माहितगार ·
देशद्रोहींच्या उड्या आणि देशप्रेमींनाच सात्विक संतापाची चोरी? देशद्रोही दरोडेखोर भारतदेशाचे तुकडे करण्याचे भाषण स्वातंत्र्य मागत उड्या मारत मिरवून घेताना असे कुणि देशद्रोही दरोडेखोर माझा मुलगा मुलगी निघाले तरी उभ्या चितेवर चढवण्याची शिक्षा असावी एवढेही म्हणावयची देशप्रेमींनाच चोरी? देशद्रोहींच्या उड्या आणि देशप्रेमींनाच सात्विक संतापाचीही चोरी? - सात्विक संतत्प्त माहितगार

अरण्यऋषीचं वनोपनिषद

चक्कर_बंडा ·
लेखनविषय:
काव्यरस
'जंगलाचं देणं' जणु 'चकवाचांदणं' 'केशराचा पाऊस' ओते 'शब्दांचं धन' 'नवेगावबांधचे दिवस' जशी फुटे 'चैत्रपालवी' 'निळावंती' उलगडे तशी 'मृगपक्षीशास्त्रा'ची पोथी 'पक्षी जाय दिगंतरा' झाडांच्या कवेतून 'घरट्यापलीकडे' उभा 'रातवा' पाऊसथेंब पिऊन 'आनंददायी बगळे' करविती 'निसर्गवाचन' 'सुवर्णगरुड' झेपावे 'चित्रग्रीवां''च्या गर्दीतुन 'पक्षीकोश' उलगडतो 'पाखरमाये'ची गणितं 'मत्स्यकोशा'च्या जोडीने सुटे 'वृक्षायुर्वेदा'चं कोडं 'जंगलाची दुनिया' ही सारी 'रानवाटां'ची कहाणी अरण्यऋषीच्या साहित्यसोबतीने फळासं पावली... #चक्कर_बंडा रूढार्थाने ही कविता नाही तर एक प्रयोग आहे आपल्या आवडत्या साहित्यिकाच्या सर्व प्रकाशित तथा

याझिदींसाठी प्रार्थना करा कि स्वप्नात त्यांना बायबलमधील देव भेटो!

माहितगार ·
लेखनप्रकार
इसीसच्या आत्मा आढळून आल्याची अधून मधून वृत्ते असतात तरीही त्यांच्या इराक मधील याझिदी मुर्तीपूजकांवरील जुलमांचे मुख्यपर्व संपल्याला जवळपास दहा वर्षे झाली. त्यांच्यावरील छळ काळात मिपावर एक धागा लेख लिहिला होता. इसीसचा हेतु याझिदी कुराणमधील देव स्विकारत नाहीत तो पर्यंत चक्कचक्क पराजित याझिदींचा गुलाम म्हणून वापर करणे होता, याझिदी स्त्रीया आणि कुटूंबांचे पुढे काय झाले?

सत्तावीस वजा किती बरोबर शून्य?

आजी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
भर दुपारची वेळ.उन्हाची काहिली. मी माझ्या आवडत्या खिडकीपाशी, माझ्या आवडत्या कोचावर बसले होते. समोरच्या टीपाॅयवर पाय पसरून. अगदी आरामात. एसी लावून. आणि थोड्याच वेळात लक्षात आलं अचानक खोलीत काळोख पसरलाय. बाहेरही काळोख झालाय. उन्हं लपून गुडूप झालीत. आकाश काळ्याभोर ढगांनी घेरलंय. ओहो, क्षणातच एक एक टपोरा थेंब जमिनीवर पडायला लागला. मी एसी बंद केला. मला आता कृत्रिम खोट्या गारव्याची गरज नव्हती. मला नैसर्गिक,खरा, आतून शांत करणारा थंडावा मिळणार होता. पावसाला सुरुवात झाली. धरती आणि पावसाचं लग्न लागलं. आसपासची झाडं सळसळत,आनंदानं डोलत अक्षता टाकत होती.

सांजशकुनाच्या रमलप्रतिमा: एक नवाच उद्योग (भाग-१)

चित्रगुप्त ·
तीनचार दिवसांपूर्वी एका नवीनच गोष्टीचा शोध लागला, आणि मग त्या उद्योगाला लागलो. त्यातून जन्मलेल्या काही रमलप्रतिमा इथे देतो आहे.

द सेकंड स्पार्क - भाग २ - उत्तरार्ध

प्रसाद गोडबोले ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
" पण इतकी काँपुटिंग पॉवर किंव्वा स्पेसच नाहीये ह्या जगात ! मला नाही वाटतं की जगातील सर्वच्या सर्व कॉम्प्युटर्स एकत्र केले तरी इतकी माहीती प्रोसेस करता येईल ! राईट ? मग ज्या गावाला जायचे नाहीच , त्याची चौकशी का करा ? नाहीच आहे येवढी कॉम्प्युटेशनल पॉवर तर मग हे सगळे कल्पनेचे घोडे नाचवण्यासारखे च नाही का ? आपल्याला कधी कळाणारच नाही की तुम्ही ज्याला ए.आयची सिंग्युलॅरिटी कशी असेल ते." .... " लेट मी इंट्रोडुस - ओळख करुन देतो - प्रो.

उत्तर -२

भागो ·
लेखनविषय:
उत्तर -२ फ्रेड्रिक ब्राऊन ह्यांनी "Answer” कथा १९५४ साली लिहिली. त्यानंतर म्हणजे १९५६ साली असिमोव ह्यांनी “The Last Question” ही कथा लिहिली. दोन्ही कथा सुपर सुपर संगणकाच्या थीम वर आधारित आहेत. फ्रेड्रिक ब्राऊनची कथा केवळ २६० शब्दात संपते तर असिमोवची कथा जवळजवळ सात पाने व्यापते. ही कथा मानवाच्या अब्जावधी वर्षाच्या कालावधीत घडते. असिमोवने लिहिलेली कथा थोडक्यात अशी आहे. ह्या कथेत एंट्रॉपी ह्या गूढ गहन विषयावर प्रश्न विचारले आहेत.

द सेकंड स्पार्क - भाग १

प्रसाद गोडबोले ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
"इफ युनिव्हर्स इज द आन्सर, देन व्हॉट इज द क्वश्चन ?"
भव्य कॉरीडॉर . इन्कॅण्डेसंट पण पांढरा लख्ख प्रकाश. संपुर्ण एकांत . आपल्या व्यतिरिक्त कोणीच नाही. अन आपल्याला आपल्याच श्वासाव्यतिरिक्त कशाचाही आवाज येणार नाही इतकी शांतता. समोर कोरी पांढरी शुभ्र भिंत अन अशा त्या भिंतीवर लिहिलेले ते सुप्रसिध्द वाक्य . समोर बस बसायला एक साधीशी खुर्ची. बाकी कोणीच नाही. प्रोफेसर गोडसे त्या वाक्यासमोर आले अन क्षणभर थबले . त्यांच्या चेहर्‍यावर मंद असे हास्य पसरले... "हं, लेट मी थिंक " इतकेच म्हणुन ते समोरील खुर्चीवर जाऊन विचार करत बसले. कितीतरीवेळ निघुन गेला असेल देव जाणे.