Skip to main content

मद्यचषक१

लेखक चामुंडराय यांनी शनिवार, 14/10/2017 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेर्ना : ओळखा पाहू लार्ज पेग कुणा मिळे पतियाळा दोन थेंबांचे शिंतोडे कुणा पामराला ।। धृ ।। किक कैसी नशा कसली मद्य ते दुर्मिळ भासतसे स्कॉच ची जरी हाव नसे देशीच फक्त नशिबाला ।।१।। टोस्ट करी ऑन द रॉक्स कुणी चखणाच, हाय! कुणा मुखाला व्हिस्की, रम अन टकीला कधी मिळेल मज पिण्याला? ।।२।। मला देशी त्याला विदेशी मद्यनशा ही जबरी कसाबसा प्याला हाती धरी सोनेरी पेय्य तो प्यालेला ।।३।। - चामुंड रायणे

योग ध्यानासाठी सायकलिंग ३: दूसरा दिवस- धायरी (पुणे) ते भोर

लेखक मार्गी यांनी शनिवार, 14/10/2017 16:49 या दिवशी प्रकाशित केले.
योग ध्यानासाठी सायकलिंग १: अपयशातून शिकताना योग ध्यानासाठी सायकलिंग २: पहिला दिवस- चाकण ते धायरी (पुणे) ३: दूसरा दिवस- धायरी (पुणे) ते भोर २९ सप्टेंबर. काल चांगली झोप झाली. आज ह्या प्रवासाचा दुसरा दिवस. आज एक घाटही आहे. पण आता बोगद्यामुळे कात्रज घाट फक्त साधा चढ उरला आहे. तरीपण सुरुवातीला सलग बारा किलोमीटर चढ असेल आणि त्यानंतर सलग पंचवीस किलोमीटर उतार आणि मग थोडा चढ- उतार असेल.

सफर ग्रीसची: भाग ११ - गूढरम्य डेल्फी १

लेखक निशाचर यांनी शनिवार, 14/10/2017 07:31 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ९ - अथेन्समधील पहिला दिवस भाग १० - प्राचीन तंत्रज्ञान प्रदर्शन आणि अक्रोपोलिस संग्रहालय प्राचीन काळी ग्रीक संस्कृतीत जगाचं केंद्र मानण्यात आलेली डेल्फी (Delphi)! ग्रीक देव झ्यूसने पृथ्वीचं नाभीस्थान शोधण्यासाठी पूर्व आणि पश्चिम दिशांहून सोडलेले दोन गरूड ज्या ठिकाणी भेटले ती ही जागा. प्राचीन ग्रीकांचं हे सगळ्यांत महत्त्वाचं धर्मस्थळ अथेन्सपासून १८० किमीवर पार्नासस पर्वताच्या (Mount Parnassus) उतारावर वसलेलं होतं. ग्रीसमधील पुरावशेष पाहण्यात रस असेल तर अथेन्स आणि ऑलिंपिया बरोबर डेल्फीची वारी करणे भाग आहे.

सांगायला हवं

लेखक आशु जोग यांनी शनिवार, 14/10/2017 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
हाच लेख पूर्वी टाकला होता पण तो कुठे गेला कळेना, म्हणून आपल्यासाठी पुन्हा उद्धव काळ खूप लोक उद्धवराव आणि बाळासाहेब ठाकरे यांची तुलना करतात पण मला उद्धवरावांचे नेतृत्त्व बाळासाहेबांपेक्षा उजवे वाटते. बाळासाहेबांची सेना मूळात तेव्हाच्या सत्ताधार्‍यांच्या आज्ञेवरून स्थापन झाली, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना सत्ताधारी पक्ष लोकलज्जेस्तव जी कामे स्वतः करू शकत नाही ते करण्यासाठी कुणीतरी मदतीला हवे होते. नीट लक्षात घ्या, संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन झाले ते काँग्रेसच्या विरोधात. शिवसेना स्थापन झाली काँग्रेसी मुख्यमंत्र्यांच्या मदतीसाठी.

फुलांची फुल स्टोरी...

लेखक हेमंत ववले यांनी शुक्रवार, 13/10/2017 18:29 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळी जवळ येत आहे. दिवाळीमध्ये धन्वंतरी पुजनामध्ये खाली मंत्र म्हंणण्याचा प्रघात आपल्याकडे आहे. श्रीमत भागवतामध्ये (३/१५/१९) मध्ये सदर श्लोक पहायवयास मिळतो. सेवंतिका बकुल चंपक पाटलाब्जै पुन्नाग जाती करवीर रसाल पुष्पै:| बिल्वप्रवाल तुलसी दल मालतीभिस्त्वां पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद यात अनेकविध फुले तसेच वनस्पती, वृक्षांचा उल्लेख येतो. व या व अशा प्रकारच्या फुलांच्या समर्पणाने जगदीश्वर प्रसन्न (प्रसन्न म्हणजे आनंदीत) होतो. अशा आशयाचा हा श्लोक आहे. याचा अर्थ फुले समर्पण भाव जागा करु शकतात असा होतो. लहान मुलांच्या निरागस, निर्लोभ स्वभावाला अनेकदा आपण फुलांची उपमा देतो.

बुलेट घेतल्यापासूनचे सुखद क्षण

लेखक वामन देशमुख यांनी शुक्रवार, 13/10/2017 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
रोज ऑफिसला बुलेटवरच जातो. मनमोकळ्या स्वभावाच्या माझ्या बॉसशी ऑफिसात गप्पा मारताना सहजच म्हणालो, हैद्राबादपासून तीन-चारशे किलोमिटरच्या परिघात मी सर्वत्र बुलेटवर फिरलोय. एक स्कोडा, एक व्हॉल्वो, दोन टोयोटा आणि इतर किरकोळ, ही कौटुंबिक वापराची वाहने असलेल्या बॉसच्या डोळ्यात मनोमन कौतुक आणि (मी प्रवासाला वेळ काढू शकतो म्हणून की काय,) किंचित हेवा तरळला. त्यानं माझ्या पाठीवर थाप मारली व म्हणाला, “तू साला बहोत ऐश करता है!” *** ऑफिसला जाताना मालकिणीला शाळेत सोडतो.

प्रशांत दामले यांच्यावर केलेली कविता ..

लेखक वैभवदातार यांनी शुक्रवार, 13/10/2017 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
|| गौरवगीत || 'टूरटूर' पासून सुरुवात केली मागे वळून नाही पाहिले 'मोरूच्या मावशी' नंतर 'ब्रह्मचारी' केले भट साहेबांच्या साथीने नाटकात पाऊल ठेवले नटांमध्ये श्रेष्ठ तुम्ही प्रशांत दामले 'लिम्का बुकात' नाव तुमचे 'गेला माधव कुणीकडे' रवींद्र नाट्य मंदिरात एक आगळे नाट्य घडे 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' जागतिक विक्रम तुम्ही केले नटांमध्ये श्रेष्ठ तुम्ही प्रशांत दामले गाणे असते श्रवणीय तुमचे गळा तुमचा गोड सूर असती तुमचे पक्के मिळे तालाचीही जोड 'मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं' गाण्याने मनावर गारूड केले नटांमध्ये श्रेष्ठ तुम्ही प्रशांत दामले खाण्याची तुम्हा भारी हौस चा

कासव - जेथे जातो तेथे मी माझा सांगाती

लेखक सई कोडोलीकर यांनी शुक्रवार, 13/10/2017 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
कासव बघितला. बघताना बोरकरांची 'जेथे जातो तेथे' आठवत राहिली. जेथे जातो तेथे मी माझा सांगाती पुढे आणि पाठी मीच माझ्या मीच माझी वाट मीच माझा दिवा हि-याचा ताजवा मीच माझ्या मीच माझी रुपे पाहतो पाण्यात आणितो गाण्यात मीच त्यांना मीच मला कधी हासडितो शिव्या कधी गातो ओव्या मीच मला अशी माझी चाले नित्य मम पूजा लोकी माझ्या ध्वजा मिरवितो नाही कधी केली तुझी आठवण म्हणालास पण मीच तू रे कधीतरी मन आजारतं. कधी नुसत्या सर्दी-पडश्यावर भागतं, कधी दीर्घ मुदतीचा ताप येतो. फतकल मारून बसतो, हटत नाही. अश्यावेळी हायबरनेट व्हावंसं वाटतं.

सज्जनगडच्या परिसरात (Arround Sajjangad )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 13/10/2017 10:36 या दिवशी प्रकाशित केले.
सृष्टिमध्ये बहुलोक, परिभ्रमणे कळे कौतुक। असे लिहीणार्‍या समर्थांचा सज्जनगड सगळ्यांनाच चिरपरीचीत आहे. समर्थांच्या समाधीचे दर्शन घ्यायला आणि पावसाळ्यातील उधाणलेला निसर्ग पहाण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक आणि पर्यटक सज्जनगडाला गर्दी करतात. पुर्वी परळीच्या वाटेने पायर्‍या चढण्याचे दिव्य आता करावे लागत नाही. निम्या उंचीपर्यंत गाडी जाते. थोडक्या पायर्‍या चढून आपण गडमाथ्यावर पोहचतो. हल्लीच प्रसिध्दीस आलेले कास पठार आणि ठोसेघरचा धबधबा जवळच असल्याने एका दिवसात कास, ठोसेघर आणि सज्जनगड अशी घड्याळाची शर्यत करीत पाहिले जातात.