Skip to main content

योग ध्यानासाठी सायकलिंग ४: तिसरा दिवस- भोर- मांढरदेवी- वाई

लेखक मार्गी यांनी सोमवार, 16/10/2017 23:15 या दिवशी प्रकाशित केले.
योग ध्यानासाठी सायकलिंग १: अपयशातून शिकताना योग ध्यानासाठी सायकलिंग २: पहिला दिवस- चाकण ते धायरी (पुणे) योग ध्यानासाठी सायकलिंग ३: दूसरा दिवस- धायरी (पुणे) ते भोर ४: तिसरा दिवस- भोर- मांढरदेवी- वाई ३० सप्टेंबर. आराम चांगला झाला. पहाटे लवकर जाग आली. जवळूनच निरा नदी वाहते आहे! काल रात्री लक्षात आलं नव्हतं, पण आता नदीचा निनाद ऐकू येतोय! मी लवकर उठल्यामुळे घरातले सगळेच लवकर उठले.

मेरे हर दर्द को मेहसूस किया है मैंने.. ..

लेखक Swapnaa यांनी सोमवार, 16/10/2017 22:56 या दिवशी प्रकाशित केले.
ग़ज़ल मेरे हर दर्द को मेहसूस किया है मैंने, ना पूछ कीसीको क़्या पाया हे मैंने मेरे इतनि सी हँसी को झूठा नक़ाब पहनाया हे मैंने, ना समज कहीं गवाया है मैंने मेरे चंद अश्कों का सौदा करलिया है मैंने, तन्हाई में जीना सीख लिया है मैंने मेरे टूटें भरोसें के कातिल को जाना है मैंने, उफ़ तक करना भुला दिया है मैंने मेरे हिस्सें की छाँव छोड़ दी है मैंने, धुप के थपेड़ों कों पीना शुरू किया है मैंने मेरे ख़यालों की नैया जबसे ठानी है मैंने, कलम के सहारें चलते रेहना है मैंने मेरे हौंसलें कों बुलंद किया है मैंने, गिर के भी फिर से ख़ुद को संभाला है मैंने कवी - स्वप्ना
काव्यरस

आठवणीतील दिवाळी

लेखक शिवम काटे यांनी सोमवार, 16/10/2017 21:35 या दिवशी प्रकाशित केले.
लहान असताना दिवाळीची चाहूल महिना-दीड महिना आधीच लागायची. हलकी हलकी गुलाबी थंडी पडायला सुरुवात झालेली असायची. शाळेत सहमाहीचा जवळपास सर्व अभ्यासक्रम शिकवून झालेला असायचा. शिक्षक मुलांची उजळणी घेण्याच्या उद्योगात गुंतलेले असायचे कारण सहामाही परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालेलं असायचं. बच्चेकंपनीला तर कधी एकदाची परीक्षा होते आणि कधी मामाच्या गावाला आजी-आजोबांकडे पळतोय अस व्हायचं.

मोरोपंतांची १०८ रामायणे

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी सोमवार, 16/10/2017 20:32 या दिवशी प्रकाशित केले.
(माझा हा पुढील लेख ’ऐसीअक्षरे’मध्ये पूर्वी प्रकाशित झाला आहे.) पंडितकवि मोरोपंत हे व्यवसायाने पुराणिक. बारामतीतील प्रसिद्ध सावकार आणि पेशव्यांचे संबंधी बाबूजी नाईक ह्यांच्या आश्रयाने ते बारामतीला आले आणि तेथेच प्रवचने-कीर्तने करून त्यांची उपजीविका झाली. रामभक्त असलेल्या मोरोपंतांचे शब्दसंपदेवर कमालीचे प्रभुत्व होते. हत्तीने शुंडादंडावर पुष्पमाला खेळवावी तितक्या सहजतेने मोरोपंत भाषेशी खेळतात असे त्यांच्या बाबतीत म्हणले गेले आहे. त्याचप्रमाणे कविता रचण्याचेहि मोठे कसब त्यांच्यामध्ये होते.

ग्राम"पंचायत" लागली..!! -3

लेखक विशुमित यांनी सोमवार, 16/10/2017 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/40963 http://www.misalpav.com/node/41040 नानांचे भाऊ कधीच त्यांच्या कारभारपणाच्या आड आले नाहीत. नाना तीन नंबरचे, पण सगळे भाऊ त्यांच्याशी अदबीने वागत. धाकटा तात्या अजून पण त्यांच्या समोर थांबत नाही. भावजयांची त्यांच्या समोर एक शब्द बोलायची टाप नव्हती. मोठ्या दोन भावांनी मागच्या वर्षीच कचरेवाडीला कायमचा टाटा बाय बाय केला आहे. पुतणे मात्र सगळे चमत्कारिक. नेहमी धोतराला पाण्यात पाहत.

फुतूर (खूळ)

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी सोमवार, 16/10/2017 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
फुतूर दिमाग के कभी खत्म नही होते . दुधिया कोहरे मे लिपटकर जब रात आये तो उस कोहरे मे तुम्हारा चेहरा बुझते हुए टिमटिमाते बिजली के बल्ब कि तरह नजर आने लगता है, धुंदलासा दिमाग उस तस्विर को आपही मुकम्मल कर लेता है क्या ये फुतूर है, या तुम भी मुझे याद कर रही हो? . फुतूर दिमाग के कभी खत्म नही होते . वक्त की सुई मुसलसल भागती रहती है और ये दिमाग है के तेरे दाये गाल के उस टिप्पेके भवरे में अटका पडा है जिसमे पुरी कायनात घुमती रहती है . फुतूर दिमाग के कभी खत्म नही होते . वैसे तो तुझसे दूर रहकर खुश नही रह पाता मगर जब तेरे शहद रंग चहरे पे खिली कमसिन हसी ये दिमाग अपनी पोटली से निकालकर नजर मे भर देता है, बिन

वसुबारसेनिमित्त मी केलेली कविता...

लेखक वैभवदातार यांनी सोमवार, 16/10/2017 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
वसुबारस आजि असे करुया प्रेमभरे गाईचे पूजन सवत्स धेनू दारी आली सांभाळू आपण आपले गोधन श्रीकृष्ण सांभाळी गोमातेला दत्ताचरणी आश्रय दिधला कामधेनू म्हणती भक्त तिजला पुरवी सर्वांच्या मनोकामनेला गोमूत्राची महती वर्णितो आयुर्वेद घ्यावे पंचगव्य हो धार्मिक कारणे रोग निवारणे प्यावे शरीर शुद्धी हो नैवेद्य दाखवू आरती करुया गाई वासराचे महत्त्व सांगू वसुबारसेचे महत्त्व जाणून गोवत्सांचे रक्षण करु -- शब्दांकित (वैभव दातार )

आज गुरुद्वादशी निमित्त मी केलेली कविता ...

लेखक वैभवदातार यांनी सोमवार, 16/10/2017 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
सदा तुझे रूप पाहो माझे नयन | तू सगुण निर्गुण | गुरुदत्ता ||धृ. || तुझे गुणगान ऐकोत माझे श्रवण | भजन कीर्तन | गुरुदत्ता ||१ || सदा माझे मुखी असो तुझे नाम | तूंचि निजधाम | गुरुदत्ता ||२ || सुगंधी फुले मी तुजला अर्पियेली | पावन होई घ्राण | गुरुदत्ता ||३ || काया वाचा मने घडो तुझी सेवा | दर्शन देसी केव्हा? गुरुदत्ता ||४|| श्रीपाद वल्लभ स्वामी अक्कलकोट | नमितो वैभव | गुरुदत्ता ||५|| -- शब्दांकित (वैभव दातार ) गुरुद्वादशी

फुलवर (कॉलीफ्लॉवर)

लेखक पगला गजोधर यांनी सोमवार, 16/10/2017 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य: १ मध्यम कॉलीफ्लॉवरचा गड्डा बारीक गुच्छ काढलेला (गुच्छ साधारण जायफळाच्या आकाराएवढी) फोडणीसाठी: १ टेस्पून तेल (अर्ध नेहमीचं व अर्ध मोहोरीचं (ऐच्छिक), किंवा एकाच प्रकारचं तेल वापरू शकता ), १ टी स्पून चिमटी मोहोरी, १ कढीपत्त्याची डहाळी वाटण : ४ हिरव्या मिरच्या (**जास्त तिखट नको असेल तर डिसीड करून घ्याव्या) ८ लसूण पाकळ्या, १ इंच आले साल काढून कोथम्बीर छोटा बचकाभर, नखभर हळद लिंबाची फोड एक्स फॅक्टर (ऐच्छिक) : एक टीस्पून फिश सॉस , तीळ गार्निशसाठी ============================================================== पूर्वकृती : एका उघड्या पातेल्यात (कॉलीफ्लॉवरचे बारीक गुच्छ बुडतील व वर साध