Skip to main content

दत्तू किटे

लेखक गुल्लू दादा यांनी मंगळवार, 17/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
Header2 २३ जुलै २०१७, वार रविवार. रविवारी रात्री आमच्या मेस (खानावळ) बंद असायच्या. नाइलाजाने (नाइलाजाने कसलं हो! आम्ही तर चातकासारखी वाट बघायचो रविवारची) आम्ही बाहेर जेवायला जायचो. खिसे भरलेले असले की सतत बाहेर जेवायला जाता येतं. पण घरचे बरोबर दुखती नस पकडत, महिन्यात येणाऱ्या ४ रविवारी बाहेर जेवता येईल इतकाच चंदा पाठवला जायचा. अध्येमध्ये बाहेर जेवायला गेलं की मित्रांकडे उधारी व्हायची. कधीना कधी द्याव्या लागणाऱ्या उधारीमुळे पुढील सगळेच दिवस तंगीत जायचे.

स्मृतिगंध

लेखक प्रभाकर पेठकर यांनी मंगळवार, 17/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
Header2 दिवाळी तोंडावर आली होती. शनिवार-रविवारला जोडून सोमवारची सुटी आल्याने आज नीरजाने फराळाचा घाट घातला होता. सकाळपासून चिवडा आणि चकल्या बनवून झाल्या होत्या. आता जरा निवांत बसावं आणि घोटभर चहात श्रमपरिहार शोधावा, असा विचार करून नीरजाने चहा टाकला. आता उद्या बेसनाचे लाडू बनवू या, की मग बस झालं. बाकी सर्व बाजारातून तयार आणायचं. हल्ली पूर्वीसारखी श्रमाची कामं जमत नाहीत आणि तेवढा उत्साहही नाही राहिला. रवी - तिचा नवरा - नेहमी तिला चिडवायचा की आता तू म्हातारी झालीस. कशाला हे सर्व घरी करायचं?

दृकश्राव्य विभाग :- एका दुर्गवेड्या माणसाची मुलाखत!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 17/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
Header2 श्री. मारुती गोळे हे एक सामान्यांच्या गर्दीतलं असामान्य नाव! नुकताच त्यांनी आग्रा ते राजगड केवळ ३४ दिवसांत पायी चालत जाण्याचा अभिनव उपक्रम केला आहे. त्यानिमित्ताने आपल्या बुवांनी घेतलेली ही मुलाखत. ही मुलाखत जुळवून आणण्यासाठी ज्ञानोबाचे पैजार ह्यांचे विशेष आभार!

बबन म्हात्रे

लेखक वकील साहेब यांनी मंगळवार, 17/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
Header2 काही व्यक्ती जन्मतःच विक्षिप्त असतात. विक्षिप्त म्हणजे काय की, त्यांचं नक्की काय चालू असतं त्यांचं त्यांनाच ठाऊक नसत. त्यांना जायचं असेल खुर्दला, तर बुद्रुकचा पत्ता विचारतील. एम.बी.ए. करायचं असेल, तर इंजीनियरिंगचा फॉर्म घेऊन येतील. विचार उजव्या विचारसरणीचे असतील, तर डाव्यांच्या सभांना गर्दी करतील. त्यांना एकाच वेळी सर्व काही हवं असतं. सर्व माहीत करून घ्यायची भूक.

शब्द

लेखक केतन पटवर्धन यांनी मंगळवार, 17/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
Header2 शब्दांना नसते वय शब्दांना कसले भय! शब्दांना उलगडताना शब्दातच मिळते लय!! शब्दांत सुख आभास शब्दांत वेदना खास!

लोकसाधना : एका रुजव्याची गाथा

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 17/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
Header2 १९८२ साली एक दांपत्य पुण्याहून दापोलीजवळच्या चिखलगाव इथे वास्तव्यास आलं. मुलगा बी.ए.एम.एस. होता, मुलगी एम.ए. होती. पुण्यासारख्या शहरात व्यवस्थित चाललेलं, चालू शकणारं जीवन सोडून हे तरुण जोडपं धड रस्ते, वीज नसलेल्या गावात आलं. गावातच जन्म झालेला त्यातला मुलगा. वयाच्या सहाव्या वर्षी शिक्षणासाठी घराबाहेर पडला होता. पुढे याच्याकडे राहा, त्याच्याकडे राहा अशा एकूण २४ घरांमध्ये राहून त्याने शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर पुण्यात आला. वैद्यकीय शिक्षण घेऊन बी.ए.एम.एस.ची पदवी प्राप्त केली.

अनुक्रमणिका

लेखक साहित्य संपादक यांनी मंगळवार, 17/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
body { border-style: solid; border-width: 46px; -moz-border-image: url(https://s19.postimg.org/duq51oez7/rangoli1.jpg) 46 repeat; -webkit-border-image: url(https://s19.postimg.org/duq51oez7/rangoli1.jpg) 46 repeat; -o-border-image: url(https://s19.postimg.org/duq51oez7/rangoli1.jpg) 46 repeat; border-image: url(https://s19.postimg.org/duq51oez7/rangoli1.jpg) 46 repeat; background-image: url("https://s19.postimg.org/6zq471hib/akashkandil4.jpg"); background-size: contain; background-repeat: repeat; } p.o

संपादकीय : अभिनिवेशाच्या टोप्या, सत्त्व ते निकें आणि अंकाचं इर्जिक

लेखक आदूबाळ यांनी मंगळवार, 17/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
a मिपाकरहो, नमस्कार! आपल्या मिपाचा २०१७ दिवाळी अंक घेऊन आज आपल्यासमोर येत आहोत. सभोवताली माहितीचा आणि संपर्काचा विस्फोट होत असताना मिपासारख्या संस्थळांचं नक्की स्थान काय आहे, असा प्रश्न हल्ली वारंवार मनात येत असतो. मिपावर सकस लेखन तर वाचायला मिळतंच, आणि इच्छा असेल तर मिपाचा उपयोग समाजमाध्यमासारखाही (सोशल नेटवर्कसारखाही) करता येतो.