मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भेटीलागी जिवा

बिपीन सुरेश सांगळे ·
लेखनविषय:
भेटीलागी जिवा दरवर्षीप्रमाणे पालख्यांचं पुण्यात आगमन होतं. त्याच्या काळजात कळ आणणारा दिवस . दरवर्षी आषाढवारीसाठी पालख्या पंढरपूरला जातात . तुकाराम महाराजांची पालखी देहूमधून तर ज्ञानेश्वर महाराजांची आळंदीमधून प्रस्थान ठेवते . मात्र पुण्यात त्या एकत्र येतात . एक दिवस थांबतात आणि पुढे मार्गस्थ होतात . वेगळ्या मार्गाने ! ... शहरात सगळीकडे उत्सवी वातावरण असतं . मांडव , पाण्याची - जेवण्याची व्यवस्था . एक ना दोन अनेक गोष्टी . धांगडधिंग्याची गाणी वजा असतात . मंडळाच्या कार्यकर्त्यांना कधी नाही ते भजनांची ओढ लागलेली असते . भेटीलागी जिवा लागलीसे आस ...

चहा!

श्रीगणेशा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
चहा, जिव्हाळ्याचा विषय. चहा तयार करणं बऱ्याच अंशी एक कला आहे. थोडंसं गणित व शास्त्रही आहे म्हणा त्यात. चवीत सातत्य राखायचे असेल, तर त्यातील प्रत्येक घटकाची भूमिका, प्रमाण, आणि वेळ समजावून घेणं गरजेचं. एखादी सुंदर संगीत रचना जर करायची असेल, तर आधी तुम्हाला संगीत वाद्यांशी, प्रत्येक सुराशी समरस व्हावं लागतं, अगदी तसंच. चहापूड (पूड=पावडर) मधील अर्क शोषण्याचं काम पाण्याचं. चहापूड टाकण्याआधीच पाणी उकळतं असणं गरजेचं. आणि चहापूड उकळत्या पाण्यात टाकल्यावर, फक्त काही मिनिटेच थांबावं, नाहीतर कडवटपणा उतरण्याची शक्यता असते.

कृष्णाच्या गोष्टी-५

Bhakti ·
लेखनविषय:
कृष्ण बलरामांचे वृंदावनातील अनेक पराक्रम मथुराधीश कंसाच्या कानी गेले. प्रलंबवधानंतर कंस थोडा घाबरलेला होता. त्यातच मथुरेला भेट देणाऱ्या नारदाने कंसाला सांगितले रामकृष्ण दुसरे तिसरे कोणी नसून वसुदेव देवकीचेच सातवे पुत्र आणि आठवे पुत्र आहेत आणि यादवांच्या कुलगुरूंच्या म्हणजेच गर्ग ऋषींच्या भविष्याप्रमाणे वसुदेवाचा कृष्ण हा आठवा पुत्र तुझा काळ ठरणार आहे. कंस वसुदेवावर भयंकर चिडला याबाबतीत काय करावे यासंबंधी निर्णय घेण्यासाठी यादव,वृष्णी आणि भोज या कुलातील मांडलिक गणप्रमुखांची एक गुप्त सभा एका मध्यरात्री त्याने बोलवली.

वाईचा कमळगड

चक्कर_बंडा ·
पावसाळा सुरू झाला की वेध लागतात ते गर्द धुक्यातून डोकावणाऱ्या डोंगर-किल्ल्यांवर पावलांचे ठसे उमटवण्याचे. पण आठवडी सुट्टीच्या दिवशी जायचं तर एक तर प्रचंड गर्दी सहन करायची तयारी ठेवावी लागते व असं अनवट ठिकाण शोधावं लागतं जिथे केवळ पावसाळ्यात तयार होणारे निसर्गप्रेमी बेडूक सहसा येणे टाळतात. याचं उद्दिष्टातून, यावर्षीच्या वर्षाऋतू भ्रमंतीची सुरवात करण्यासाठी सापडलेला एक सुंदर किल्ला म्हणजे ”कमळगड”.

कृष्णाच्या गोष्टी-४

Bhakti ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
*रासलीला अ कृष्ण जीवनातील गोपीकृष्ण हा जसा टीकेचा विषय असतो तसा तो मधुराभक्तीचा प्राण आहे. महाभारतात या लीलांचा उल्लेख नाही.गोपीकृष्ण बद्दल अनेक प्रकारचे विचार आपल्याला वाचायला मिळतात.

पुस्तक परिचय: ययाति

श्रीगणेशा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
---- ययाति ---- वि. स. खांडेकर -- ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले, मराठीतील पहिले साहित्यिक. ययाति -- वि. स. खांडेकरांनी १९५९ मधे लिहिलेली, पौराणिक संदर्भ आणि सामाजिक आशय असलेली कथा. या कादंबरीसाठी १९७४ साली त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. ---- अगदी ओघवतं, प्रवाही लिखाण. साधे शब्द, पण तरीही कथेतून सामाजिक आशय अगदी प्रखरपणे मांडलेला. कथेच्या शेवटी मन विषण्ण, व्यथित होतं. कथा संपते, पण वाचकाला स्वतःशी संवाद करायला भाग पाडूनच. एवढं प्रभावी लिखाण दुर्मिळच. प्रत्येक व्यक्तिरेखा अगदी भिन्न स्वभाव, आणि विचारांनी साकारलेली.

तुमची निष्ठा कुठे ?

प्रसाद गोडबोले ·
आज संसदेत काही नवनिर्वाचित सदस्यांनी खासदारकीची शपथ घेतली. त्यात निदर्शनास आलेली काही वाक्ये :
ओवेसी - जय भिम. जय मीम. जय तेलंगाना . जय फलस्तीन . अल्लाहु अकबर.
राहुल गांधी - जय हिंद. जय संविधान
छत्रपालसिंग गंगवार - जय हिंदुराष्ट्र. जय भारत.
(हे म्हणल्यावर लगेच विरोधी पक्षाच्या बाजुने - "ये संविधान विरोधी है" अशा अर्थाच्या घोषणा ऐकु आल्या. मात्र पॅलेस्टाईनच्या जयजयकारानंतर विरोधी पक्ष पैकी "ये संविधान विरोधी है" असे कोणी म्हणल्याचा व्हिडीओ दिसला नाही. )
निलेश लंके - जय हिंद. जय महाराष्ट्र.

" क्रॉसिंग द फ्लोर "

चौकस२१२ ·
फातिमा फातिमा वेस्टमिस्टर पद्धतीमध्ये स्वतःच्या पक्षाच्या धोरणांविरुद्ध संसदेत मतदान करणे याला " क्रॉसिंग द फ्लोर " (शब्दशः अर्थ घ्यावा ) म्हणले जाते सध्या इस्राएल कि पॅलेस्टाईन यावर पाश्चिमात्य देशातील मुस्लिम धर्माच्या आमदारांचे वागणे हा एक अभ्यासाचा विषय आहे अर्थात "धर्म आधी देश नंतर " हे धोरण हि मंडळी राबवतात हे सरळ सरळ दिसून येते ( अर्थात डावखुरे या कडे दुर्लक्ष करतीलच ) विशेषतः हि मंडळी डाव्या मजूर पक्षातून निवडून येतात , त्यामुले त्या पक्षात हि मंडळी म्हणजे "अवघड जागी दुखणें किंवा "धरलं तर चावत , सोडला तर पळत " असा काहीसा प्रकार , गठ्ठा मते मिळवण्यासाढी हे पाहिजेत पण

भिंत तुझी माझी...

kool.amol ·
लेखनविषय:
मी खऱ्याखुऱ्या भिंतिविषयी बोलतो आहे. आभासी नव्हे. भिंत हा एक भारी प्रकार आहे. भिंतीविषयी उगाच एक नकारात्मक भावना जोडलेली आहे. भिंतीवर कितीतरी सुंदर गोष्टी सुद्धा असतात. म्हणजे छानशा पेंटिंग्ज, देवाचा फोटो, एकत्र कुटुंबाचा फोटो, वगैरे. ह्या भिंतीविषयी सुचण्याचे कारण म्हणजे, आज बाजारात फिरत असताना रस्त्यावर पोस्टर विकणारी एक बाई दिसली. कधी काळी मला हे पोस्टर्स फार आवडायचे. माझ्या रूम मध्ये वाकुल्या दाखवणाऱ्या tom च एक पोस्टर होतं. त्यानंतर एका रूम मध्ये आधी राहणाऱ्या एका मुलाने काही अप्रतिम म्हणावेत असे ऐश्वर्या रॉयचे फोटो लावले होते. काही महाभाग फारच शौकीन असायचे.