मोबाईल फोन आणि कर्करोग : वादग्रस्त गृहितक
मोबाईल फोनच्या वापराने कर्करोग होतो का नाही ? भयंकर पेचात टाकणारा हा प्रश्न ! आजकाल प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा कारण जगातील बहुसंख्य लोक आता ‘मोबाईलधारी’ झालेले आहेत. मग काय आहे या त्रस्त करणाऱ्या प्रश्नाचे उत्तर ? जरा थांबा. न्यायालयात उलट तपासणी घेणारा वकील जेव्हा गुळूमुळू किंवा मोघम उत्तर देणाऱ्या साक्षीदाराला ‘हो’ का ‘नाही’ असे खडसावून विचारतो तसे मला किंवा शास्त्रज्ञांना विचारू नका ! कारण, आजच्या घडीला तरी या प्रश्नाचे उत्तर ‘हो’ आणि ‘नाही’ या दोन पर्यायांच्या मध्ये कुठेतरी आहे.
उत्तर समजण्यासाठी जगात आजपावेतो झालेल्या संबंधित संशोधनाचा थोडक्यात आढावा घेतो.
मिसळपाव