मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बिना ओव्हन तंदुरी चिकन / पनीर टिक्का

केडी · · पाककृती
Tandoori Chicken-1 साहित्य ६ ते ८ चिकन चे लेग पिसेस तंदुरी मसाला १५ ते २० लसूण पाकळ्या १ इंच आलं ४ चमचे घट्ट दही अर्ध्या लिंबाचा रस २ चमचे तेल (सरसो असेल तर उत्तम) १ चमचा लाल मिरची पावडर १ चमचा काश्मीरी लाल तिखट १ चमचा गरम मसाला १ चमचा काळीमिरी पावडर १ चमचा आमचूर पावडर १/२ चमचा खायचा लाल रंग (ऐच्छिक) १ चमचा चाट मसाला (ऐच्छिक) मीठ चवीनुसार २ मोठे चमचे तूप १ ते २ कोळशाचे तुकडे कृती चिकन चे लेग पिसेस स्वच्छ धुवून कोरड्या फडक्याने पुसून घ्यावेत. त्यावर सुरीने दोन्ही बाजूला चिरा मारून घ्याव्यात. तंदुरी मसाल्याचे जिन्नस मिक्सर मधून बारीक करून घ्या. त्यात चवीनुसार मीठ घालून, हा मसाला चिकन च्या लेग पिसेस ला व्यवस्थित लावून घ्यावा. एका प्लास्टिक च्या पिशवीत हे पिसेस ठेवून ते रात्रभर किंवा किमान ४ ते ५ तास मुरात ठेवावेत (फ्रिज मध्ये). Step1 Step2 Step3 Step4 गॅसवर ग्रिल पॅन ठेऊन तो चांगला तापला कि त्यावर ब्रशने थोडं तेल लावून, चिकन चे पिसेस ठेवावेत. गॅस आधी ३ ते ४ मिनिटे मोठा ठेवावा. मग कमी करून, वरून झाकण ठेऊन साधारण १० ते १२ मिनिटे भाजून घ्या. पिसेस उलटे करून, पुन्हा गॅस मोठा करून ३ ते ४ मिनिटे मोठ्या आचेवर भाजून घ्या. [हे करत असताना चिकन हलवू नये, नाहीतर ते पॅन ला चिकटेल]. गॅस कमी करून हि दुसरी बाजू पुन्हा १० ते १२ मिनिटे भाजून घ्या. भाजताना वरती झाकण ठेवावे. Step3 step4 Step7 step8 शेवटी दोन्ही बाजूला थोडं ब्रशने तूप लावून एक ते दोन मिनिटे भाजावे आणि चिकन च्या सर्वात मांसल भागात सूरी खुपसून ते नेट शिजलंय कि नाही ते तपासून, चिकन पिसेस एका भांड्यात काढून घ्यावेत. भांड्यावर झाकण ठेवावे [असे केल्याने चिकन मॉईस्ट राहील. ह्याला रेस्टिंग युअर मीट असे म्हंटले जाते]. सगळे चिकन चे पिसेस अश्या पदतीने खरपूस भाजून घ्यावेत. चिकन भाजून होत आल, कि गॅसवर जाळी ठेवून त्यावर कोळसे ठेवावे. ते लाल झाले कि एका वाटीत काढून घ्यावे. हि वाटी चिकन च्या भांड्यात ठेवून, वरून १ चमचा तूप सोडून भांडण्यावर झाकण ठेवावे. अश्या पद्धतीने चिकन ला तुपाची धुरी द्यावी. वरून चाट मसाला भुरभुरून, गरमागरम चिकन तंदुरी / पनीर टिक्का कांदा, लिंबू सोबत खायला घावे! Step9 Step11 Step12 पनीर टिक्क्या साठी :- शाकाहारी मंडळींनी हाच मसाला आणि पद्धत वापरून पनीर च्या जाड कापलेल्या क्युब्स ला लावून कांदा आणि ढोबळी मिरची वापरून पनीर टिक्का सुद्धा छान लागतो. पनीर चे तुकडे, कांदा आणि ढोबळी मिरचीचे तुकडे, बांबू स्कुवर्स मध्ये ओवून भाजून घ्यावेत. हे फार तर १ तास मुरत ठेवावे. अर्थातच चिकन एवढा वेळ भाजायचे नाही, पनीर सगळ्या बाजूने थोडंसं शिजलं, कि भांड्यात काढून तुपाची धुरी द्यायची. Chicken Tandoori 2

वाचन 12282 प्रतिक्रिया 16