Skip to main content

II ना होतो नवा मी , ना होती ती जुनी II ( मिपा मित्रानो "जेनी" नाही बरं का ... जुनी )

लेखक सिद्धेश्वर विलास पाटणकर यांनी शुक्रवार, 30/06/2017 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
ना होतो नवा मी ना होती ती जुनी गोष्ट चालूच होती होती फक्त राजा न राणी II सांगे आषाढ पाऊस नको सोडून जाऊस संगे थांब तू जरासा वाटे हृदयास दिलासा II किती दिल्या आणा भाका चुके काळजाचा ठोका वर्षे क्षणात लोटली आता क्षण वाटे मोठा II असा काय घात झाला झाली दुसरीच राणी राजा दूर दूर गेला सोडून साऱ्या आठवणी आता कुणासंगे बोलू मन उदास उदास आषाढ पावसाचा जोर देई राजाचा रं भास फुटकं नशिब त्ये माझं संगे आठवणींचं ओझं म्या चालली चालली जिथं नेतील तिथं ढग II सिद्धेश्वर विलास पाटणकर C
लेखनविषय:

वाचने 617
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया