Skip to main content

इतिहास व्याख्यान - पाक्षिक सभा

लेखक मनो यांनी शनिवार, 28/10/2017 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
मी भारत इतिहास संशोधक मंडळात काही गोष्टींविषयी शुक्रवार दि. ०३ नोव्हेंबर २०१७ संध्याकाळी ६.३० वाजता एक व्याख्यान देतो आहे. इतिहासात रस असलेल्या सर्वानी जरूर या, तुमचे स्वागतच आहे. इतर तपशील, विषय, स्थळ इत्यादी ===================== श्री राजा शिवछत्रपती महाराज आणि ज्ञानियांचा राजा श्री ज्ञानेश्वर हे महाराष्ट्राचे दोन मानबिंदू. भारत इतिहास संशोधक मंडळातल्या शुक्रवार ०३ नोव्हेंबरच्या पाक्षिक सभेत या दोन्ही विषयी एकत्रित आजपर्यंत अप्रकाशित आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचे कागद आणि चित्रे याविषयी श्री मनोज दाणी यांच्या व्याख्यानाचा योग जुळून येत आहे.

ग्राम"पंचायत" लागली..!! -5

लेखक विशुमित यांनी शनिवार, 28/10/2017 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ "मंगेश कारभारी इकडे या", नानांनी त्यांच्या २ नंबरच्या भावाच्या नातूला हाक मारली. आजोबा वारल्या नंतर चुलत्याबरोबर समांतर कारभारपण त्याच्या वाट्याला आले होते. अर्थातच हा युतीचा कारभार कुरबुरीचा होता. उभ्या आयुष्यात पोपटमामा नानांशी बोललेला मी पाहिला नाही. कारण सिम्पल होते. त्याचे लग्न नानांनी त्याला पोरगी न दाखवताच परस्पर लावून दिले होते.

चोर कोण?

लेखक नेत्रेश यांनी शनिवार, 28/10/2017 13:01 या दिवशी प्रकाशित केले.
अस्सा संताप आला होता! चोरी, आणी ती ही माझ्या अंगणात? बघतोच आता. तर मंडळी, आज शुक्रवार, तेव्हा ऑफीसमधुन संध्याकाळी जरा लवकर परतलो. घरी कुणीच नव्हते. मागे पाहीले तर उन्हाने सर्व झाडे कोमेजलेली वाटली. अंगणात गेलो तेव्हा या आठवड्यात माळ्याने टांग दील्याचे दीसले, हा येवढा परसातल्या पानांचा कचरा. ते वाढलेले काम पाहुन जरासा मुड ऑफ झाला. हल्ली असे बर्‍याचदा करायला लागलाय , तरीच त्याला शेजार्‍याने काढले असणार. मनातच त्याला दोन शीव्या घातल्या. या आठवड्यानंतर त्याला काढुन शेजार्‍याकडे येणार्‍या माळयाला ठेवायचा विचार करायला हवा. तर सुकत आलेल्या झाडांना पाणी घालण्याचे काम चालु केले.

हॅरी पॉटर - भाग चार

लेखक nishapari यांनी शनिवार, 28/10/2017 00:30 या दिवशी प्रकाशित केले.
हॉगवार्ट्सच्या संस्थापकानंतर महत्वाची पात्रं पुढीलप्रमाणे - १ - एल्बस डम्बलडोर एल्बस डम्बलडोर हे हॉगवॉर्ट्सचे वर्तमान मुख्याध्यापक . त्यांच्या काळातील सर्वात शक्तिमान जादूगार म्हणून हे प्रसिद्ध आहेत . शालेय जीवनात , हॉगवॉर्ट्स मध्ये विद्यार्थी असताना सातही वर्षे त्यांनी आपल्या असामान्य प्रतिभेची चमक दाखवली , संशोधने करून जादुई जगताला उपयोगी ठरतील असे अनेक शोध लावले ...

हॅरी पॉटर - भाग तीन

लेखक nishapari यांनी शुक्रवार, 27/10/2017 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
हॉगवर्ट्स मध्ये जादूच्या अनेक शाखांचं शिक्षण दिलं जातं . त्यातले काही महत्त्वाचे विषय म्हणजे - १ . ट्रान्सफिगरेशन / रूपांतरण , २ . चार्म्स / मंत्रविद्या ३ . पोशन्स / काढेशास्त्र ४ . हिस्ट्री ऑफ मॅजिक / जादूचा इतिहास ( यात जादूगार समाजाच्या इतिहासात घडून गेलेल्या घटनांचा समावेश होतो ) ५ . ऍस्ट्रॉनॉमी / खगोलशास्त्र . ६ . हर्बॉलॉजी / वनस्पती शास्त्र ७ . डिफेन्स अगेन्स् डार्क आर्ट्स / गुप्त कलांपासून संरक्षण आणि 8. फ्लाईंग लेसन्स / जादुई झाडुवरून उडणे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याला हे सगळे विषय असतात . यातला उडणे हा विषय फक्त पहिल्या वर्षाकरता असतो .

याद किया दिल ने

लेखक sayali यांनी शुक्रवार, 27/10/2017 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
पु.ल यांनी इटलीतल्या सोरेन्तो गावातल्या समुद्राच्या निळाईच वर्णन करताना लिहिलं आहे. हूरहूरत्या सांजेचं ते सौंदर्य बघताना जर चांगला पुरिया धनश्री ऐकायला मिळता तर न जाणो आनंदाने कोंदल्यामुळे माझ्या प्राणांनी कुडीचा निरोप घेतला असता. तसा अनुभव लडाखचा पंगॉंग लेक बघितल्यावर आला. एखाद्या सरोवरत आल्यासारखे वाटले. विशाल असा निळाशार लेक दिसला त्याला चार शेड्स होत्या. हिरवा, राखाडी, फेंट निळा आणि डार्क निळा. थंडी व वारा झॉंबत होते. देवाच्या करणीने क्रुतद्न्यता दाटून आली. कॅण्टीन मधील चायनीस पदार्थ रासना तृप्त करत होती.

शिक्षणाचा अधिकार : एक प्रेसेंटेशन

लेखक साहना यांनी शुक्रवार, 27/10/2017 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
शिक्षणाचा अधिकार ह्या विषवल्ली विरुद्ध जे माझे काम चालू आहे त्यासाठी मिपा वरील अनेक वाचकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक व्यक्तींनी ह्याविषयावर आणखीन माहिती मागितली होती. ह्या विषयावर काम करणारे RealityCheckIndia आणि प्राणसुत्र ह्या दोघांनी या विषयावर फार चांगले प्रेसेंटेशन बनवले आहे. मिपा वाल्यानी ह्याचा पुरेपूर लाभ घ्यावा.

राजांचे मावळे - 2

लेखक लाल गेंडा यांनी शुक्रवार, 27/10/2017 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
भाग पहिला घोडखिंड : मल्हारी मल्हारी सगळ्यांच्या पुढे होता कारण त्याला हा रस्ता तळहाताच्या फोडाप्रमाणे माहीत झाला होता. मुसळधार पाऊस आणि त्यामुळे झालेला गुढघाभर चिखल. आता ते सगळे एका छोट्या पठारावर पोचले होते. थोडाच वेळ का होईना पण ते सगळे उघड्यावर आले होते. न सांगताच मावळे राजांच्या आजूबाजूला पसरले. मल्हारी अजून पुढेच होता आणि त्याच्या मागेच राजे पळत होते. राजांच्या उजव्या आणि डाव्या बाजूला प्रत्येकी 2 2 मावळे होते आणि मागे बाजी. पालखीवाले सगळ्यात मागे पडले होते ते आता हळू हळू अंतर कमी करत होते.

पावसात "रतनगड ते हरिश्चंद्रगड"

लेखक दिलीप वाटवे यांनी शुक्रवार, 27/10/2017 01:28 या दिवशी प्रकाशित केले.

पावसात "किल्ले रतनगड ते हरिश्चंद्रगड"

सुरूवात...

सप्टेंबर-ऑक्टोबर महिना म्हणजे पावसाळा संपल्या नंतरच्या ट्रेकींगच्या मोसमाची सुरुवात होण्याचा काळ. १० सप्टेंबरला नाखिंदा घाट, कोथळीगड आणि कौल्याच्या धारेचा पावसाळी ट्रेक संपवून घरी परतताना बसमध्ये जाहीर केलं की "०७-०८ ऑक्टोबरला 'आजोबा ऊर्फ आजा पर्वत' पाथरा आणि गुयरीदार अशा दोन घाटांसह करायचा आहे" त्यावेळी बसमधल्या प्रत्येकाने या ट्रेकला येण्याची तयारी दाखवली. पण हा ट्रेक अवघड प्रकारातला असल्यानं सर्वांना नेणं काही शक्य नव्हतं.

अनवट किल्ले २१: नरसिंह, बलभीमाचा सहवास, मच्छिंद्रगड( Macchindragad )

लेखक दुर्गविहारी यांनी गुरुवार, 26/10/2017 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
सांगली आणि सातारा या जिल्ह्यांच्या सीमेवर, नरसिंहाचे प्राचीन भुयारी देवस्थानाच्या आणि कॄष्णेच्या एन पात्रातील बेटाची सोबत असलेला एक अतिशय सोपा पण रम्य परिसर लाभलेला किल्ला म्हणजे मच्छिंद्रगड. आज याचीच भटकंती करायची आहे. या किल्ल्याबरोबरच परिसरातील सागरेश्वर अभयारण्य, नव्याने विकसीत केलेले पर्यटनस्थळ चौरंगीनाथ हेही पहाता येतील.